हे पण घडतयं जगामंदी!

 

  आपल्या भारतात कोरोनाने उच्छाद मांडला असताना अमेरीकेत एका वेगळ्याच कारणाने लोक यमसदनास जात आहे. ते कारण म्हणजे बंदूकीतून होणारा बेछूट गोळीबार. गेल्या आठवड्यात अमेरीकेत विविध ठिकाणी झालेल्या गोळीबारात दोन दिवसात 15 जणांनी पृथ्वीवरून  निरोप घेतला . एका जागतिक अहवालानूसार जगात वर्षभरात जेव्हढ्या बेछूट गोळीबाराचा घटना घडतात, त्यापैकी 50% एकट्या अमेरीकेत घडत असतात .सन.2019 मध्ये 465 आणि सन 2020 मध्ये 628 घटना घडल्याची अमेरीकन पोलीसांकडे नोंद आहे. 
   अमेरिकन केंद्रीय संविधानाच्या दुसऱ्या घटना दुरुस्तीनूसार तेथील नागरीकांना शस्त्रात्रे बाळगणे हा मुलभूत अधिकार आहे. अमेरीकेच्या काही राज्यात वाँलमाँट सारख्या सुपर स्टोअरमध्ये शस्त्रात्रे मिळतात. यामध्ये बदल होण्याची नितांत आवश्यकता असल्याचे तेथील पोलीसांचे म्हणणे आहे. पुर्वी अमेरीकेत गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली असताना स्वसंरक्षणार्थ अमेरीकन नागरीकांना शस्त्रास्त्रे बाळगण्याचा अधिकार देण्यात आला. आजमितीस ही परीस्थिती पुर्णतः बदलली असून त्यावेळी स्वरक्षणार्थ दिलेली सवलतीने आज अमेरीकेतील सगळ्यात मोठ्या समस्येचे स्वरुप धारण केले आहे.
वाढत्या ताणतणांवांमुळे , मोडीत निघालेल्या कुटुंबव्यवस्थेमुळे मनस्वास्थ बिघडलेल्या व्यक्तींच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. या अस्वस्थ मनस्थितीला व्यक्त करण्यासाठी वाट मोकळी करुन देण्यासाठी हातातील शस्त्राद्वारे विरोध करणाऱ्या व्यक्तीला संपवले जात आहे. 
अमेरीकेत शस्त्रात्रचा मुलभूत अधिकार रद्द करण्याची वारंवार मागणी केली जात आहे. मात्र शस्त्रात्र निर्मिती करणारी यंत्रणा अमेरीकेतील राजकारणात महत्तवाचा पदावर कार्यरत असल्याने, त्यावर आवश्यक ती कार्यवाही होत नाहीये. मुलभूत अधिकार जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक आहेत, ते कमी करता येणे अशक्य असल्याचा युक्तीवाद यासाठी करण्यात येतो.
लंकेत सोन्याचा वीटा या न्यायाने अमेरीकेतील समस्येकडे बघता येणे अशक्य आहे. आजमितीस अनेक भारतीय अमेरीकेत वास्तव्यास आहेत. अमेरीकेतील वाढत्या गोळीबाराचा घटनेमुळे ते बळी पडू शकतात. ते बळी पडल्यामुळे भारतातील त्यांचे नातेवाइक अडचणीत येवू शकतात. त्यामुळे हा प्रश्न भारतीयांसाठी महत्त्वाचा आहे. आणि याच हेतूने मी आपले लक्ष वेधण्यासाठी मी याबाबत लिहले आहे .जे आपणास आवडले असेल, असे मानून सध्यापुरते थांबतो, नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?