बातमीतील श्रीलंका

     

श्रीलंका आपल्या भारताच्या दक्षीणेला असणारे एक बेट स्वरुप राष्ट्र , जे भारत स्वतंत्र झाल्यावर एका वर्षाने स्वतंत्र्य झाले. आपल्या रामायण या महाकाव्यात उल्लेख असणारे राष्ट्र , नैसर्गिस सृष्टीसौंदर्याने भरभरून राहिलेले राष्ट्र म्हणजे श्रीलंका .
तर हा श्रीलंका हा देश गेल्या पंधरवाड्यात तीनदा विविध कारणांमुळे चर्चेत आला. पहिली गोष्ट म्हणजे बांगलादेशाने श्रीलंका या देशाला दिलेले साँफ्ट लोन  , दिसरी घडामोडी म्हणजे श्रीलंकेच्या पश्चिम किनाऱ्यावर एका मालवाहू जहाजाला झालेला अपघात आणि त्यामुळे श्रीलंकेच्या पर्यावरणावर झालेला अनिष्ट परीणाम . तर तिसरी घटना म्हणजे श्रीलंकेने स्पेशल इकाँनाँमिकल झोन उभारताना चीनला दिलेल्या अवास्तव परवानग्या .


         आता बघूया या सर्व घडामोडी क्रमाक्रमाने प्रथम बांगलादेशाने श्रीलंकेला दिलेले साँफ्ट लोन. श्रीलंकेकडे आजमितीस फक्त 4 दशलक्ष इतकेच परकीय चलन आहे. मात्र त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यापार करण्यासाठी अधिक परकीय गंजाजळीची आवश्यकता आहे. ती पुर्ण करण्यासाठी बांगलादेश श्रीलंकेला 200 दशलक्ष डाँलरची मदत करणार आहे. ज्यामुळे भारताखेरीज दक्षीण आशियातील देशांना अर्थसाह्य करणारा दूसरा पर्याय निर्माण झाला आहे.श्रीलंका बांगलादेशाला 2ते३ व्याजाने हे कर्ज करारात सांगितल्या मुदतीत श्रीलंकन रुपयात देखील चूकवू शकतो. अन्य स्त्रोताकडून कर्ज घेतल्यास यासाठी श्रीलंकेला यासाठी 6ते7 इतक्या दराने कर्ज घ्यावे लागले असते. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा खुपच मोठा वाटा आहे. कोरोनामुळे पर्यटन बंद असल्यामुळे तसेच श्रीलंकेची प्रमुख निर्यात असलेली चहाची निर्यात देखील कोरोनामुळे अडचणीत आल्यामुळे श्रीलंकेवर सदर परीस्थिती ओढवली आहे. सध्याचा काळात इतर अर्थव्यवस्था नकारात्मक वाढ दाखवत असताना बांगलादेशची एकमेव अर्थव्यवस्था ही अर्थव्यवस्थेत सकारात्मक वाढ दाखवत आहे. तसेच बांगलादेशची निर्यात सुद्धा विनाअडथळा सुरु आहे. बांगलादेशकडे आजमितीस 45 अब्ज परकीय चलन आहे(भारताकडे 485अब्ज)जे बांगलादेशाचा विचार करता खुपच उत्तम आहे. म्हणूनच बांगलादेश श्रीलंकेला मदत करु शकतोय. बांगलादेशाकडून मदत घेण्या आगोदर श्रीलंकेने याबाबत भारताकडे विचारणा केली होती. मात्र श्रीलंकेच्या चीन समर्थनार्थ असणाऱ्या गेल्या कही काळातील घडामोडी बघून भारताने याबाबत असमर्थता दर्शवली चीनकडून या आधीच श्रीलंकेने या आधीच प्रचंड कर्ज घेतल्याने त्यांनी तो पर्याय घेतला नाही.
आता वळूया दुसऱ्या बातमीकडे . तर गेल्या आठवड्यापासून श्रीलंकन इकाँनाँकल झोनमध्ये अडकलेल्या आणि आग लागलेल्या जहाजातून अखेर तेल गळती सुरू झाली आहे. पर्यटनावर अर्थव्यवस्था असणाऱ्या श्रीलंकेला त्यामुळे प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सिंगापूर येथे नोंदणीकृत असणाऱ्या या जहाजातून धोकादायक रसायनाची वाहतूक करण्यात येत होती..ज्यामध्ये काही कारणाने गळती झाल्यामुळे त्यामध्ये आग लागली. ही आग विझवण्याचे श्रीलंकन.सरकार आणि भारतीय नौदल प्रचंड प्रमाणात प्रयत्न करीत होते. या जहाजाचे तूकडे पडून.त्यातील प्लँस्टिक श्रीलंकन किनाऱ्यावर येवून तेथील सजीवसृष्टीस अपाय करतच होते. त्यात हे नवे संकट उद्भवले आहे. आता हे जहाज पाण्यात डुबत असून त्यावेळी ही तेलगळती सुरु झाली.या आधी जहाज प्रशासनाने कतार येथील एका बंदरावर  आणि भारतातील कांडला बंदराच्या प्रशासनाने हे धोकादायक रसायन ठेवून घेण्याची विनंती केली होती. मात्र दोन्ही ठिकाणी पर्याप्त सुविधा नसल्याने त्यास परवानगी नाकारण्यात आली.  ते जहाज सिंगापूरसाठी प्रवास करण्यासाठी जात असताना  श्रीलंकेजवळ मान्सुमच्या वा,ऱ्यामुळे काहीसे भरकटले , आणि ही दुर्घटना घडली .


आता बघूया तिसरी घडामोड 
तर आर्थिक गटांगळ्या खाणाऱ्या श्रीलंकन संसदेने त्यातून वर  येण्यासाठी कोलंबो बंदराजवळ 256 एकरमध्ये स्पेशल इकाँनाँमिक्स झोन (सेझ)ची चीनच्या सहकार्याने  निर्मिती  करण्यास मंजूरी दिली आहे. मात्र या प्रस्तावात चीनला अवास्तव परवानग्या दिल्या आहेत. या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी चीनकडून पासपोर्ट घ्यावा लागणार आहे. तसेच याठिकाणी चीनचे चलन यूआन वापरता येणार आहे. श्रीलंकेला चीनची वसाहत बनवण्याचा मार्ग यातून जात असल्याचे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे.. या प्रस्तावामुळे सध्या श्रीलंकेचे राजकारण ढवळून निघत आहे. या आधीच श्रीलंकेतील हब्बनपोर्टा हे बंदर चीनकडे 99 वर्षाच्या कराराने हस्तांतरीत झाले आहे. काही दिवसापूर्वी भारत जपानच्या सहकार्याने कोलोंबा बंदराच्या पुर्वेकडील भाग विकसीत करण्यासाठी उत्सुक होता . मात्र त्यावेळी श्रीलंकेने जनमत हे करण्यास उत्सुक नाही , असे कारण देत हा प्रस्ताव नाकारला होता.
.काही दिवसापूर्वी सयुक्त राष्ट्रसंघात श्रीलंकेत तामिळींवर झालेल्या अत्याचारांच्या संदर्भात एक मानविधीकारचा प्रस्ताव चर्चेस येणार होता , त्यावेळेस भारताने प्रस्तावाचा विरोधात श्रीलंकेच्या बाजूने मतदान करावे म्हणून मागणी करत होता. तोच श्रीलंक आता भारतविरोधी भुमिका घेत आहे असो 
जागतिक राजकारणात कोणीच कोणाचा कायमस्वरूपी  मित्र अथवा शत्रू नसतो हेच खरे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?