क्रीडा स्पर्धांची तिहेरी पर्वणी !

     

आपल्या भारतात विविध परीक्षा कश्या  प्रकारे घेण्यात याव्यात ? मुळात परीक्षा घ्याव्यात का ?  की त्यास दुसरा काही अपवाद करता येईल येईल याबाबत  तज्द्न्य व्यक्तीमध्ये मतमतांतरे सुरु असताना जगभरातील क्रीडारसिक मात्र जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्याची आतुरतेने वाट बघत आहेत आहे आणि याला कारणीभूत आहे , एकाच वेळी तीन तीन वेगवेगळ्या क्रीडाप्रकारच्या तीन जगातील पातळीवरच्या स्पर्धा या कालावधीत होणार आहे  26  जुन ते 18 जुलै या दरम्यान सायकलस्वारांची परीक्षा बघणारी मात्र तरीही प्रत्येक सायकलस्वाराची किमान एकदा तरी सहभागी होण्याची इछा असणारी टूर दी फ्रांस ही स्पर्धा होणार आहे . तर 28   जुन ते 18 जुलै या दरम्यान तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात विम्बल्डन स्पर्धा खेळवली जाणार आहे . हे कमी की काय म्हणून म्हणून इतिहासात पहिल्यांदा क्रिक्रेटमधील टेस्ट या प्रकाराची जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आपला भारत आणि न्यझीलँड या देशात खेळवली जाणार आहे ती  18 ते 22 जून दरम्यान . सध्या फ्रेंच ओपन ही स्पर्धा सुरु आहेच . 13 जूनपर्यंत सुरु असणारी ही स्पर्धा गेल्या मंगळवारी अर्थात 26 मे  रोजी मोठ्या दिमाखात सुरु झाली आहे . 

        कविवर्य कुसुमाग्रजांच्या कोलंबसचे गर्वगीत या कवितेत सांगितलेली  दृदम्य इच्छाशक्तीच मानवाने या एका मागून एक होणाऱ्या क्रीडास्पर्धांतून दाखवून दिली आहे . या सर्व स्पर्धांवर कोरोनाचे सावट आहेच कोरोनाविषयी असणारे सर्व सुरक्षेचे नियम पाळत या क्रीडास्पर्धा होत असल्या तरी जग कोरोनाबरोबर जगायला शिकत आहे याची साक्ष यामुळे मिळत आहे . या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनात एक वर्ष विलंबाने होणाऱ्या टोकियो ऑलम्पिकच्या यशस्वी आयोजनाची बीजे रुजली आहेत यात मिळालेला धडा पुढे ऑलम्पिक आयोजनात नक्की उपयोगी पडेल सध्या हे ऑलम्पिक नकोच अशा जपानी व्यक्तीचा सूर असल्याचा बातम्या चॅनेल न्यूज एशिया, रशिया टुडे या येणाऱ्या वृत्तवाहिन्यांचा  बातम्यातून जाणवत आहे . या क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन झाल्यास या काहिस्या नकारात्मक सुरात अल्पशी का होईना सुधारणा झाल्याचे दिसून येईल . हे नक्की 

क्रिकेटच्या टेस्टच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा सामना न्यझीलँड या देशाशी होणार आहे . अन्य दोन स्पर्धामध्ये कोणत्याही  संघ स्पर्धेत उतरत नसला तरी वैयक्तिक स्वरूपात भारताचे खेळाडू सहभागी होणार आहे  भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन या स्पर्धांमध्ये फारसे समाधानकारक नसले तरी अन्य खेळाडूंचे  उंचावणे यासारखे पुण्याचे काम ते कोणते ?. त्यामुळे खिलाडूवृत्ती असणाऱ्या कोणत्याही  भारतीयाने या स्पर्धाचा मनमुराद आनंद घेयला हवा मी तर घेणार आहे आणि आपण ? 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?