बातमीतील पाकिस्तान (भाग 6)

 

आपल्या भारतात मान्सुम आणि कोरोना विषयक बातम्यांनी माध्यमे ओसाडून वहात असताना पाकिस्तानमध्ये तीन घडामोडी घडल्या आहेत.त्यातील दोन भारत पाकिस्तान याविषयी तर एक पाकिस्तान अफगाणिस्तान विषयक आहे. पाकिस्तान आपले शत्रू राष्ट्र आहे. पाकिस्तानची अनेक महत्तवाची शहरे भारतीय सीमेपासून हाकेच्या अंतरावर आहेत. पाकिस्तानातील  प्रमुख 7 नद्यांपैकी काबूल या नदीचा अपवाद वगळता अन्य सर्व 6 नद्या भारतातून वहात जात पाकिस्तानी जनतेची तहान भागवतात. त्यामुळे आपणास त्या माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग त्यांचा विषयी माहिती करुन घेवूया. 
पहिले भारताचा संदर्भ असलेल्या घडामोडी बघूया तर मित्रांनो भारत पाकिस्तान संदर्भात दोन घडामोडी घडल्या .त्यातील पहिले म्हणजे पाकिस्तानने अनिधिकृतपणे आपल्या नियंत्रणात ठेवलेल्या आझाद काश्मीरमध्ये विधीमंडळाच्या निवडणूकींची घोषणा केली आहे. 21 जून पर्यत उत्सुक उमेदवार उमेदवारी अर्ज भरु शकतात.अर्ज माघारी घेणे, मतदार यादी निश्चिती यासाठी 3 जूलै.हा दिनांक निश्चित करण्यात आला आहे. तर 25 जूलै रोजी 45 सदस्य संख्या असणाऱ्या आझाद काश्मीरसाठी मतदान होइल.या 45 मध्ये आझाद काश्मीरच्या नागरीकांसाठी 33 जागा आहेत तर 12 जागा काश्मीरमधून बाहेर पडलेल्या लोकांसाठी जागा राखुन ठेवलेल्या आहेत. भारत या भागास आपला भुभाग मानत असल्याने भारताने यास विरोध केला आहे. या भागात या पूर्वी जूलै 2016 मध्ये निवडणूका झाल्या होत्या . त्यावेळी त्यावेळच्या पंतप्रधानांचा  नवाज शरीफांचा पक्ष अर्थात पाकिस्तान मुस्लीम लिग सत्तेत आला होता. काही दिवसापूर्वीच पाकव्याप्त काश्मीरचा दूसरा भाग असणाऱ्या गिलगिट बाल्टीस्तान या भागात स्थानिक निवडणूकांमध्ये सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीके इंसाफ या पक्षाला विक्रमी बहूमत मिळाले होते काही आंतरराष्ट्रीय अभ्यासकाच्या मते या निवडणूकांमुळे पाकिस्तानचा आम्ही काश्मीरच्या स्वातंत्र्याविषयी लढतो हा दावा कमकुवत होवू शकतो. यामुळे पाकिस्तानने काश्मीरचा अनिधिकृतपणे ताबा घेतल्याचे अधिक ठळकपणे दिसून येईल. बघूया काय होते ते. भारत या भागास आपला भुभाग मानत असल्याने जम्मू काश्मीर विधीमंडळात आणि संसदेत सुद्धा त्याचे प्रतिनिधीत्व आहे असे आपण मानतो. आझाद  काश्मीरची लोकसंख्या 28 लाख आहे, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. असो.

आता बघुया भारत पाकिस्तानविषयक दुसरी घडामोड .
तर  2016 मार्च 3 पासुन पाकिस्तानाच्या तूरुंगात असणारे भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभुषण जाधव यांच्या बाबत पाकिस्तानी संसदेत नुकतेच एक विधेयक मांडण्यात आले.कुलभुषण जाधव यांना इराणमार्गे पाकिस्तानात येवून, बलूचिस्थानात दहशतवादी कारवाया करण्याचा आरोपाखाली, अटक करण्यात आली आहे.  अटक केल्यावर त्यांचावर पाकिस्तानी लष्करी न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली . या शिक्षेच्या विरोधात हेग (नेदरलँड { जो देश त्या देशातील एक भाग असणाऱ्या हाँलड या भागामुळे हाँलड या नावानेसुद्धा ओळखलाजातो}  या देशाची राजधानी) येथे असणाऱ्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतातर्फे खटला दाखल करण्यात आला. जिथे एका न्यायाधीशाचा अपवाद वगळता सर्वांनी लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेस स्थगिती देत त्यांच्यावर पाकिस्तानातील नागरी न्यायालयात खटला चालवण्याचे आदेश दिले.【या खटल्यात पाकिस्तानची वर्तणूक, अत्यंत घुर्णास्पद होती] . या आदेशानुसार खटला लष्करी न्यायालयातून मुलकी न्यायायलात आणण्यासाठीचे विधेयक पाकिस्तानी संसदेत मंजूर करण्यात आले.भारताचा हा मोठा विजय समजण्यात येत आहे. या खटल्यासाठी कुलभुषण जाधव यांच्यासाठी भारतीय वकील देण्याची भारताची मागणी  पाकिस्तानने फेटाळली आहे. त्यांना पाकिस्तानी वकिल पुरवण्याची शिफारस पाकिस्तानने केली आहे. भारतीय वकीलाची मागणी पाकिस्तानने फेटाळल्यावर अन्य देशाचे नागरीकत्व असलेल्या वकीलाची मागणी भारताकडून करण्यात येत आहे. असो. 


    आता बघूया पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधील घडामोड.
तर चालू वर्षी  सप्टेंबर 11 रोजी अमेरीका  अफगाणिस्तानमधून पुर्णतः बाहेर पडल्यावर पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया वाढू शकतात. त्यासाठी आपण काही राजकीय तडजोडी  स्विकारल्या पाहिजेत..असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. मुळात या अफगाणिस्तानातील दहशतवादी कारवायांचा मुळाशी असलेल्या तालीबानच्या निर्मितीमध्ये पाकिस्तानने महत्तवाची भुमिका बजावली होती.युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाने अफगाणिस्तानवर आक्रण केल्यावर पाकिस्ताने यु एस एस आर विरुद्ध लढण्यासाठी अमेरीकेच्या मदतीने.अफगाणिस्तानात तालीबाननावाचा भस्मासूर जन्माला घातला. तेच पाकिस्तान आता अफगाणिस्तानमधील तालिबानमुळे पाकिस्तानला धोका असल्याचे सांगत आहे. अमेरीका बाहेर पडल्यावर आता जेमतेम असणारे अमेरीकाप्रणीत असणारे अफगाणिस्तानातील सरकार पुर्णतः संपू शकण्याची शक्यता तज्ज्ञ
व्यक्त करत आहेत  या सरकारच्या मदतीसाठी भारतातर्फे अनेक विकासप्रकल्प उभारले जात आहे. त्याबाबत अडचणी निर्माण होवू शकतात. हे सरकार संपल्यावर .अफगाणिस्तानचा ताबा पुर्णतः तालीबानकडे जावू शकतो. त्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी बोललेल्या विधानाकडे दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही.असो.
लेखाच्या सुरवातीलाच सांगितल्याप्रमाणे पाकिस्तानमधील घडामोडींचा.आपल्यावर परीणाम होतोच.तो आपणापर्यत पोहोचवण्याचा हा  माझा छोटासा प्रयत्न आपणास आवडला असेल असे मानून सध्याए थांबतो नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?