हळव्या मनाचा बाल साहित्य निर्मितीकार ... साने गुरुजी .


आजकाल लहान मुले फारसी वाचत नसल्याची तक्रार सातत्याने करण्यात येते. या विषयावर चर्चा करताना काही जण आता मुलांना  वाचायला बालसाहित्य कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर विपूल प्रमाणात बालसाहित्य निर्माण करणाऱ्या साने गुरुजींची आठवण आल्याशिवाय रहात नाही. आज 11 जानेवारी 2021 रोजी त्यांची 71वी पुण्यतिथी त्या निमित्ताने त्यांना भावपुर्ण आदरांजली .
      साने गुरुजींचे श्मामची आई हे पुस्तक खुपच प्रसिद्ध असले तरी त्यांचे फारसे प्रसिद्ध नसणारे बालसाहित्य प्रचंड आहे. बालमनावर उत्तम संस्कार करत असतानाच त्यांचे मनोरंजन करण्याचे दुहेरी कार्य त्यांचा लेखनातून  उतरलेले सहजतेने दिसते. अनेकदा संस्काराचा नावाखाली मुलांना नकोसे वाटेल असे बोजड साहित्य मुलांचा माथी मारले जाते. किंवा मनोरंजनाखाली  काहीही संस्कार  करत नसलेले साहित्य त्यांचा माथी मारले जाते. दुसऱ्या प्रकारचे उत्तम उदाहरण म्हणजे पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध झालेली कार्टून्स .तर पहिल्या प्रकारात विविध अध्यात्मिक प्रवचने देणाऱ्या पुस्तकांचा समावेश करता येईल. साने गुरुजींचे बालसाहित्य मात्र या दोन्ही टोकांचा ठिकाणी न जाता त्याचा सुवर्णमध्य साधणारे होते, असे मला वाटते. भा. रा. भागवत, दिलीप प्रभावळकर, साने गुरुजी या सारखे  मोजकेच बाल साहित्य लिहणारे लोक मराठीत आहेत.(किमानपक्षी मला माहिती आहेत) या सर्वांचे मुकुटमणी म्हणून कोणाला मान देयचा झाल्यास मी तो साने गुरुजींना देइल. मी लहानपणी नाशिकच्या सावना मधील बाल विभागात त्यांची कित्येक पुस्तके वाचली आहेत. खुपच उत्तम पुस्तके होती ती. असो. 


   वेगवेगळ्या भारतीय भाषांतील साहित्य अन्य भाषिकांना  उपलब्ध करुन देण्याचा त्यांचा प्रयत्न खरोखरीच स्त्युत होता. आज  मुळची इंग्रजी भाषेतील  मात्र मराठीत अनूवादीत झालेली अनेक पुस्तके दिसतात. मात्र मराठीत्तेर  भारतीय भाषेतील मराठीत भाषांतरीत झालेली पुस्तके फारच कमी आहे. स्वामी विवेकानंद यांच्या वैयक्तिक आणि कौटूंबिक जीवनावर आधारीत मुळचे बंगालीतील "अजाना अचाना विवेकानंद"  किंवा मुळचे मराठीत असणारे अरुण खोपकर यांचे  गुरुदत्त तीन अंकी शोकांतिका हे फ्रेंच आणि इंग्रजी भाषेत अनुवादीत झालेल्या पुस्तकांचा या यादीत समावेश होवू शकतो. PIB ARICHER या ट्युब चँनेलवर विविध भारतीय भाषेतील हिंदीत अनुवादीत झालेल्या कथेचे व्हिडीओ आहेत. (यावर जून्या अर्थमंत्र्यांची अर्थसंकल्पीय भाषणे, जून्या पंतप्रधांनाची स्वातंत्र्यदिनाची भाषणे देखील आहेत. मी अनेकदा हे चँनेल बघतो) मात्र ते सरकारी आहेत..खाजगी क्षेत्रात झालेला असा प्रयोग मला तरी झालेला दिसत नाही. नाही म्हणायला मुंबईतून उत्तरप्रदेशात जाणाऱ्या एका रेल्वेचे नाव हिंदीतील एक प्रसिध्द काव्यसंग्रह असलेल्या "गोदान" वर आधारीत आहे. मात्र हे नाव काव्यसंग्रहाऐवजी गायीसी जोडले जाणेच शक्य आहे, असे मला वाटते.असो. सांगायचा मुद्दा असा की साने गुरूजींचे हे कार्य पुढे नेले गेले नाही.
साने गुरुजीनी साहित्यसेवेबरोबर मंदिर प्रवेश सत्याग्रह , राष्ट्रसेवा दल असे सामाजिक कार्य देखील केले. मात्र हे समाजमाध्यमावरील लेखन आहे. हे मुख्यतः मोबाईलवर वाचले जाते.त्यामुळे वाचणाऱ्यास किती रीड मोअर करावे याला मर्यादा आहेत. न्युजपेपर सारखे मोठे लेखन इथे शक्य नाही. तरी तूर्तास इथेच थांबतो, नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?