भारतीय रेल्वेची अपरीचीत कहाणी (भाग7)

           

  आपल्या भारतीय रेल्वेत रोज 12 ते 13 हजार प्रवाशी गाड्या चालवल्या जातात. (सध्याची अपवादात्मक स्थिती सोडून देवूया ) आँस्टोलिया या देशाच्या एकुण लोकसंख्येएव्हढे लोक दररोज प्रवास करतात. तसेच अनेक मालगाड्या चालवल्या जातात. या सर्व गाड्यांना इच्छित स्थळी नेणाऱ्या रेल्वे इंजिनाचे जग खुपच रंजक आहे. भारतीय रेल्वेच्या इतर घटकांविषयी खुप लिहले जाते बोलले जाते . मात्र यामागील खरा कर्ता असलेल्या इंजिनाविषयी फारच कमी बोलले.जाते..चला तर मग जाणून घेवूया त्यांचा या अज्ञात जगाविषयी 
            मित्रांनो, आपल्या भारतीय रेल्वेत रेल्वे इंजिनांची ओळख होण्यासाठी जे नाव दिले जाते त्याचे दोन भाग असतात .डाव्या बाजूच्या भागात तीन अक्षरे असतात. तर उजव्या बाजूला आकडा असतो. अक्षरे सबंधीत रेल्वे इंजिन कोणत्या गेजचे आहे? ते कोणत्या इंधनावर चालते?  ते कोणत्या कारणासाठी वापरण्यात येणार आहे? याविषयी सांगणारी असतात. तर अंकाद्वारे इंजिन.किती हजार अश्वशक्तीचे आहे, याचा उलगडा होतो.
         आपल्या भारतात चार प्रकारचे गेज वापरले जातात.(दोन रेल्वे रुळातील अंतराला गेज म्हणतात) पहिला प्रकार ब्राँड गेज ज्याची 5फुट 6इंच इतकी लांबी इतकी असते.  यासाठी W,  अक्षर वापरतात .नंतर वापरले जाते मीटरगेज  ज्याची लांबी3 फुट 3 इंच   इतकी असते. यासाठी Y अक्षर वापरतात. नंतर येते नँरो गेज ज्याची लांबी 2 फुट 6इंच इतकी असते तर सर्वात छोटे असते एक्स्टीम नँरोगेज ज्याची लांबी फुट  इतकी असते. ज्यासाठी N अक्षर वापरतात. इंजिनच्या डाव्या बाजूला जी तीन अक्षरे असतात त्यातील अती डावी कडील अक्षराद्वारे इंजिनाचा गेज कळतो.
 मधल्या अक्षराद्वारे सबंधीथ इंजिन कश्यावर  चालते ते कळते . जर त्याठिकाणी D अक्षर असेल ते इंजिन डिझेलवर चालते. जर त्याठिकाणी Cअक्षर असेल तर ते इंजिन डायरेक्ट विद्यूतप्रवाहावर चालणारे असते. त्याठिकाणी A अक्षर असेल तर ते एसी विद्युत प्रवाहावर चालणारे इंजिन असते. या ठिकाणी जर Bअक्षर असेल तर ते इंजिन बँटरीवर चालणारे असते. जर या ठिकाणी BA अक्षर असेल तर संबधीत इंजिन बँटरी आणि एसी करंट या दोन्हीवर चालणारे असते. 
       डाव्या बाजूच्या तीन अक्षरापैकी सगळ्यात उजवीकडील अक्षर हे इंजिन कश्यासाठी बनवले आहे, याचा उल्लेख असतो.  जर सबंधीत इंजिन मालवाहतूकीसाठी वापरण्यासाठी तयार केले असेल तर त्या ठिकाणी G  हे अक्षर असते. प्रवाशी वाहतूकीसाठी केले असेल तर त्यासाठी Pअक्षर वापरतात. दोन्ही ठिकाणी वापरण्या

जोगे असेल तर M अक्षर वापरतात. प्रवाशी गाड्यांसाठी वापरण्यात येणारे इंजिन जास्तीत जास्त वेगाने पळणे आवश्यक असते.तर मालवाहतूकीसाठी वापरण्यात येणारे इंजिनाने अधिकाधीक वजन खेचणे अपेक्षीत असते..थोडे वेगळ्या भाषेत बोलायचे झाल्यास,  प्रवाशी गाड्यांसाठी वापरण्यात इंजिन म्हणजे घोडा तर मालवाहतूकीसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांचे इंजिन म्हणजे गाढव होय  तर दोन्हांसाठी वापरण्यात येणारे इंजिन म्हणजे खेचर होय .भारतीय रेल्वेत या खेरीज गाड्या शंटिगसाठी देखील रेल्वे इंजिने वापरण्यात येतात, ज्यास S  या अक्षराने संबोधन्यात येते.
     भारतात प्रामुख्याने दोन अमेरिकी कंपन्यांची डिझेल  इंजिन वापरली जातात. त्यातील एक म्हणजे अमेरिकन लोकोमोटिव्ह कंपनी जी ALECO नावाने ओळखली जाते . दुसरी कंपनी इलेट्रो मागान्ट्रो  डिझेल ही कंपनी जी
EMD या नावाने ओळखली जाते. EMD या कंपनीची रेल्वे इंजिने टु स्ट्रोक इंजिने आहेत तर ALCO या कंपनीची रेल्वे इंजिने फोर स्ट्रोक इंजिने आहेत. ALCO कंपनीच्या इंजिनामधून अधिक प्रमाणात धूर येतो, तसेच त्यांचे एँव्हरेज कमी असते. मात्र ALCO पेक्षा EMD कंपनीने सुरवातीला भारताला अधिक साह्य केल्यामुळे त्यांची इंजिने भारतीय कंपनीत दिसतात. 
भारतीय रेल्वे ही अत्यंत गुंतागुंताची गोष्ट आहे. त्यातील काही गोष्टी गेल्या सात भागात बघीतल्या. या पुढेही काही गोष्ट आपण बघू तूर्तास इतकेच, नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?