बातमीतील चीन (भाग 11)


सध्याचा काळात खचितच एखाद दुसरा दिवस जात असेल. ज्या दिवशी चीनचा संदर्भात काहीतरी बातमी चर्चेस आली नाही. गेल्या तीन चार दिवसाचा विचार करता चीनविषयक तीन घडामोडी घडल्या. चीन भारताच्या सुरक्षेला किती मोठा धोका आहे?, चीनमुळे आपल्या प्रगतीला कसी खिळ बसते ?,हे आपण जाणतातच. त्यामुळे चीनविषयक घडामोडी माहिती असणे आपणास अत्यावश्यक आहे. तर सुरु करुया चीनविषयक या घडामोडींची माहिती करुन घेण्यासाठी .
     तर मित्रांनो, जगातील सर्वात मोठ्या 7 अर्थव्यवस्था ज्या देशांचा आहे, त्यांचा एक गृप आहे, जी 7 नावाचा .ज्यामध्ये युएस, कँनडा, युके, जर्मनी, फ्रान्स इटली जपान या देशांचा समावेश होतो. त्या देशांची आँफलाइन परीषद नुकतीच युकेमध्ये झाली. त्यामध्ये सर्व दळणवळणाची संसाधने तोडत चीनविषयक एक चर्चा झाली. यामध्ये चीन, तैवान आदी मुद्द्यांची चर्चा झाली.किंबहूना या परीषदेचा सर्व रोख चीनविषयकच होता , असे म्हटल्यास वावगे ठरु नये. या चर्चेदरम्यान अँग्लो सँक्शीयन गटातील देश आणि ईतर देश यांच्यात चीन विषयक मुद्दयांवरुन मतभेत झाल्याचे वृत्त द हिंदूकडून देण्यात आले आहे.. ज्या देशातील प्रमुख धर्म ख्रिचन आहे.तसेच ज्यांची प्रमुख भाषा इंग्रजी आहे. त्यांना अंग्लो सँक्शीयन देश म्हणतात .ज्यामध्ये जी7 मधील युके, युएस , कँनडा हे देश येतात. जी7च्या दुसऱ्या गटामध्ये जर्मनी, फ्रान्स इटली, जपान हे देश येतात.
यावर चीनकडून ठराविक देशांकडून जगाला दिशा देण्याचे दिवस कधीच निघून गेले आहेत. आजचे जग समानतेच्या तत्वावर चालते. जिथे प्रत्येक देशाला समान मताधिकार आहे. चीन याच तत्वाचा आधारे जागतिक राजकारण झाले पाहिजे, या मताचा आहे. सबब जी 7 च्या घडामोडींना केराची टोपली दाखवत आहे, अस्या शद्बात प्रतिक्रिया देण्यात आली आहे. असो 

आता बघूया अन्य दोन घडामोडी. या दोन्ही घडामोडी तैवान या देशासी सबंधीत आहे. तैवानचे अधिकृत नाव रिपब्लिक्स आँफ चायना आहे. तर आपल्या बरोबर भांडणाऱ्या देशाचे नाव पिपल्स रिपब्लिक आँफ चायना आहे. सन 1972पर्यत युनाटेड नेशन्समध्ये  चीनचे प्रतिनिधीत्व, तैवान करत होता.सध्याचा चीनचा प्रवेश 1972ला तैवानला हाकलून झाला .1949 मध्ये सध्या आपण ज्याला चीन म्हणतो तिथे माओच्या नेर्तृत्वाखालील कम्युनिस्ट पक्षाची क्रांती झाल्यावर तेथील मुळ लोकशाहीवादी सरकारने जवळच्या बेटावर आश्रय घेतला. ते म्हणजे तैवान. तेव्हापासून अस्तिवात आलेले  दोन्ही चीन एकमेकांना आम्हीच खरे चीन तूम्ही फुटलेले असून लवकरच आमच्यात येतील असे म्हणत आहे.असो हा झाला इतिहास .
    तर जपानच्या संसदेत जपानच्या पंतप्रधान  yoshihinde Suga यांनी कोरोनाविषयक चर्चेत तैवानचा उल्लेख नेहमीप्रमाणे करतात तसा एक प्रदेश न करता स्वतंत्र्य देश केल्याने चीन जपान सबंध ताणले गेले आहेत. जेव्हा एखादा पंतप्रधान सबंधीत देशाच्या संसदेत एखादे विधान करतो, तेव्हा ते त्या देशाचे धोरण समजले जाते. चीनमध्ये याचे संतप्त प्रतिसाद उमटले आहेत. जपानवर आक्रमण करण्याची तेथील जनभावना आहे. 

आता बघूया तैवान चीन विषयक दुसरी घडामोड .तर चीनी वायूसेनेच्या 28 लढाउ विमानांनी तैवानच्या हवाइ हद्दीचा भंग केला आहे. तैवानमध्ये 2016मध्ये प्रबळ राष्ट्रवादी विचाराच्या नेत्या Tsai Ing Wen अध्यक्षपदावर आल्यापासून चीन तैवानमध्ये विविध प्रकारे घूसखोरी करत आहे .मात्र ही घूसखोरी आतापर्यतची सर्वात मोठी घूसखोरी आहे. चीनचा मते तैवान आमच्याच भाग असल्याने आमचा अंतर्गत मुद्दा आहे. इतर देशांनी यित लक्ष घालू नये. तैवाननै या घु,खोरीचा तीव्र शद्बात निषेध केला आहे.
चीन हा पूर्वी होता तसा निद्रीस्त ड्रँगन नसून पुर्ण जागा झालेला ड्रँगन असून तो आता फुतकारत आहे, हेच यावरुन सिद्ध आहे. तो अजून किती फुतकारतो हे बघणे उत्सुकतेचे ठरेल. तो कमी फुतकारावा असी इश्वराकडे प्रार्थना करुन सध्यापुरते थांबतो नमस्कार



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?