स्पर्धा परीक्षेच्या नावाने (भाग2)

     

 माझ्या कालच्या स्पर्धा परीक्षेच्या लेखावर प्रतिक्रिया देताना काही जणांनी या परीक्षार्थींवर ज्या गोष्टीने ताण येतो, ते म्हणजे पुणे सारख्या ठिकाणी राहणे खरेच गरजेचे असते का ? याबाबत विचारणा केली, तर त्या प्रश्नांविषयी सांगण्यासाठी ही पोस्ट.
                या परीक्षार्थींना पुण्यात राहणे खरेच आवश्यक असते का? याचे एका शद्बात किंवा वाक्यात उत्तर देणे अशक्य आहे. यासाठी या परीक्षांसाठी कोणत्या प्रकारच्या अभ्यासाची पद्धत आवश्यक असते. हे माहिती करुन घेणे आवश्यक असते. या परीक्षेचा अभ्यासक्रम खुपच विस्तृत असतो,  त्यामुळे याचा अभ्यास करताना कदाचित अवांतर गोष्टींंचांच अभ्यास केला जावू शकतो. जसे  मराठी, इंग्रजी  सुधारण्यासाठी मराठी आणि इंग्रजी वाचन करताना  जी पुस्तके वाचून काहीच मराठी, इंग्रजी सुधारणार नाही, असी पुस्तके , दैनिके वाचणे वगैरे.या
परीक्षांचा अभ्यास विस्तृत असला तरी एका विशिष्ट दिशेने करावा लागतो. मार्ग चूकला तर खुप अभ्यास करुनही
काहीच उपयोग नाही. तसेच या प्रकारच्या अभ्यासात सातत्याने परीक्षण आवश्यक असते. या अभ्यासातील आपला कमकुवत अभ्यास घटक कोणता ? आणि चांगला हुकुमत असणारा घटक कोणता ? मागच्या वेळी कमकुवत असणारा अभ्यास घटक आतापर्यत किती सुधारला आहे. याची माहिती परीक्षार्थींना असणे या सारख्या परीक्षेत अत्यावश्यक असते. आपल्या दुर्देवाने आतापर्यत या विषयाच्या मार्गदर्शनाची सोय अजूनही महाराष्ट्रात जिल्ह्याचा ठिकाणी पुरेस्या प्रमाणात झालेली नाही. त्यासाठी पुण्यासारख्या ठिकाणीच उत्तम सोय आहे. जर ही सोय जिल्ह्याचा ठिकाणी झाल्यास या चित्रात फरक पडू शकतो. थोडक्यात परीक्षार्थीला अभ्यासपुरक वातावरण मिळण्यावरच तो परीक्षार्थी पुण्यासारख्या शहरात येवून अभ्यास करतो की खेडेगावाजवळच्या जिल्ह्याचा ठिकाणी येवून कमी खर्चात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो, हे अवलूंबन असते. पुण्यासारख्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवून पोस्ट काढायची या एकाच ध्येयाने अनेक युवक युवती येत असल्याने काहीसी वातावरण निर्मिती होते. जी खेडोगावात इतर मनोरंजन करणारी स्थळे असल्याने काहीसी टाळली जाते.
स्पर्धा परीक्षे संदर्भात दुसरा मुद्दा या विवेचनातून स्पष्ट होतो, तो म्हणजे यासाठी क्लासच लावला पाहिजे का ? तर माझे त्यांना सांगणे आहे की , जर या आधी सांगितल्या त्या बाबी पुर्ण होत असतील तर क्लासची गरज नाही. मात्र आपल्या दुर्देवाने या बाबी क्लासमध्ये सहजतेने पुर्ण होतात.क्लासबाहेरुन या बाबी पुर्ण होणे थोडे अवघड 
असते. कारण कितीही चांगला क्लास लावला तरी जसे स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही,त्याप्रमाणे स्व मेहनितीशिवाय या ठिकाणी यश मिळणे अशक्य आहे.
सध्या स्पर्धा परीक्षाकडे अनेक चांगल्या सुशासनाचे स्वप्न उरासी बाळगुन युवक युवती मोठ्या संख्येने जात आहेत, ही उत्तम गोष्ट आहे. त्यामुळे उद्याचा चांगला भारत निर्माण होण्यास नक्की हातभार लागेल.तर या उद्याचा उज्जवल भारताची आशा करत ,सध्यापुरते थांबतो, नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?