सिने चित्रीकरणाचा बादशाहा. .. गुरुदत्त


आपल्या सभोवताली अनेक निष्णात माणसे असतात. ती आपल्या क्षेत्रात इतकी निष्णात असतात की, त्या क्षेत्रासाठी त्या व्यक्तींचे नाव घेतले तरी पुरेसे ठरते. त्यांच्या विषयी अधिक काही सांगावे लागत नाही. आपल्या बाँलीवूडच्या विचार करता वसंतकुमार शिवशंकर पदूकोण, अर्थात गुरुदत्त
 यांचे नाव अस्याच निष्णात व्यक्तींचा यादीत अग्रक्रमाने येते. काय नव्हते गुरुदत्त . गुरुदत्त सिनेदिग्दर्शक होते अभिनेता होते, नृत्यदिग्दर्शक होते. सिनेनिर्माते होते, गुरुदत्त. येत्या शुक्रवारी अर्थात 9 जूलै रोजी त्यांची जयंती त्या निमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली.
    कृष्णधवल छायाचित्रणाचा काळात अंधार आणि उजेड यांची सांगड घालून उत्कृष्ट छायाचित्रण कसे करायचे?  जे अत्यंत परीणामकारक ठरेल.तसेच पडणाऱ्या सावल्याचा, तसेच क्लोजप चेहऱ्याचा वापर वापर छायाचित्रणात खुबीने करण्यासाठी, तसेच कँमेरात खोलीची जाणीव दिसण्याकरीता  आपल्याला एकच नाव घ्यावे लागते ते म्हणजे गुरुदत्त 
   सन 1959साली आलेल्या कागज के फूल या चित्रपटातील 'वक्त ने किया सितम" या गाण्याचा सुरवातीला आपणास जो अंधार आणि उजेडाचा खेळ दिसतो तो त्यांची अंधार आणि प्रकाशाची जाण किती उत्तम होती याची साक्ष देते.कागज के फुल या चित्रपटात देखील कँमेरामधून खोली कसी पकडता येते, याचे उत्कृष्ट प्रात्याक्षिक

आपणास दिसते. याच कागज के फुल मध्ये चित्रपटाच्या शेवटी  एखादी वेगाने हलणारी दृश्ये कस्या पद्धतीने चित्रीत करावीत? याचे उत्तम उदाहरण आपणास दिसते. आता देखील चित्रीकरण करायचे झाल्यास कँमेरामनला एसीमध्ये घाम फुटेल असे चित्रीकरण कागज के फुल  या चित्रपटाच्या "देखी झमींन की यारी" या गाण्यात आपणाला दिसते .कागज के फुल हा चित्रपट1959चा आहे, हे विशेष . कँमेरामधून  एखाद्या खोलीची  उंची, रुंदी कसी ठामपणे प्रेक्षकांवर बिंबवता येते.याची साक्ष आपणास "कागज के फुल" मधून वारंवार अनुभवयास येते. मोठा अवकाश कँमेराचा एकाच फ्रेममध्ये कस्या प्रकारे घेयचा ? याचा कोणाला अभ्यास करायचा झाल्यास कागज के फुल हा चित्रपट बघणे म्हणजे अत्यंत आवश्यक आहे . स्टुडियोयत कृत्रिम अंधार कस्या प्रकारे चित्रीत करायचा ? याचे गीता ,बायबल म्हणजेच कागज के फुल हा चित्रपट होय ,असे म्हटल्यास वावगे ठरु नये. सध्याचा काळात असे चित्रीकरण करणे तूलनेने काहीसे सोपे झाले आहे.मात्र कोणतेही प्रगत तंत्रज्ञान नसताना त्यांनी आजच्या तोडीस तोड असे चित्रीकरण कसे केले असेल?  असा प्रश्न त्यांचे चित्रपट बघताना पडल्याशिवाय रहात नाही.
त्यांचा कँमेरा क्लोजअपचा विचार करायचा झाल्यास प्यासाचा विचार करावाच लागेल. प्यासामध्ये आपणास क्लोज अपच्या बऱ्यापैकी वापर केलेला आढळतो.प्यासामध्ये चित्रीकरणातून एखादी प्रतिमा कसी टिपायची याचे खुपच बारकावे टिपलेले दिसतात. "जाने वो.कैसे लोग थे जिनको प्यार को प्यार मिला" या गाण्यातून किंवा ये
दुनिया भी अगर मिल भी जाये तो क्या है?"या गाण्यातून आपणास हे वारंवार दिसून येते.
गुरुदत्त यांच्या सिने चित्रीकरणाविषयी खुप काही लिहीता येवू शकते. मात्र हे समाजमाध्यमांवरील लेखन आहे. समाजमाध्यमांवरील लेखनास वृत्तपत्रीय लेखनाप्रमाणे एका दिवसाचा कालावधी लागत नाही. हे तयार झाल्यावर लगेच प्रकाशीत होते.मात्र समाजमाध्यमांवरील लेखन वृत्तपत्रीय लेखनाप्रमाणे मोठे करता येत नाही. त्यामुळे इथेच थांबतो,नमस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?