आयुष्यातील दुःखे सिनेमात सहजतेने दाखवणारा सिनेनिर्माता,दिग्दर्शक.....गुरुदत्त

       

   आपल्या बाँलीवूडमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांमध्ये सुखी सुखी गुलाबी चित्रे रंगवणारी अनेक चित्रपटे आढळतात. आपल्या आयुष्यातील वास्तविकतेपासून चित्रपटातील दृश्ये खुप दुर असतात.  मानवी आयुष्यातील दुःखे आपल्या चित्रपटातून मांडणारे फारच कमी मोजके, सिने निर्माते, सिने दिग्दर्शक आपल्या बाँलीवूडमध्ये आढळतात. या हाताच्या बोटांवर मोजता येतील अस्या सिने निर्माते , दिग्दर्शकांमध्ये वसंतकुमार शिवशंकर पदूकोण अर्थात गुरूदत्त यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल. 9जूलै ही त्यांची जयंती या निमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली.
        मानवी दुःखाना नाट्यमय कलात्मकतेने रुपेरी पडद्यावर साकरणे, आणि त्यातून मनोरंजन करणे यामध्ये त्यांचा हात त्यांचा समकालीन दुसरा कोणीच धरु शकणार नाही. गुरुदत्त यांचे सर्व सिनेमे मुख्य धारेतील होते. आर्ट फिल्म
प्रकारातील नव्हते, हे आपण लक्षात घेयला हवे. सध्या काहीसे मागे पडलेल्या मधूर भांडरकर यांची याबाबत काही प्रमाणात तूलना होवू शकते. कारण मधूर भांडरकर यांचे चित्रपट वास्तवदर्शी असले तरी  फारसे हृदयद्रावक नाहीत. 
   प्रेमभंग, अव्हेलना, इतरांच्या यशाचे वाटेकरी होण्याची मनुष्याची मनीषा, अपयशी व्यक्तींकडे बघण्याची मनोवृत्ती, घरातील सत्तासंघर्ष  आणि त्यामुळे होणारी मनाची घालमेल, समाजातील नित्कृष्ट समजल्या जाणाऱ्या व्यवसायातील लोकांची प्रेमळ मानसिकता आदी मानवी भावभावनांचे गुरूदत्त यांच्या चित्रपटात वास्तवदर्शी चित्रण आपणास पहावयास मिळते. गुरुदत्त यांचे मिस्टर अँड मिसेस 1955 सारखे एक दोन चित्रपट वगळता बहुतेक सर्व चित्रपट मानवी आयुष्यातील काळी बाजू नायकप्रधान असणाऱ्या कथानकांवर आधारित होते. त्यांचा आयुष्यातील वादळांचा त्यांचा चित्रपटांच्या कथानकांवर परीणाम झाला का ?.असे मानण्यास खुप वाव आहे स्वतःच्या आयुष्यातील प्रेमभंगाच्या अनुभवामुळे किंवा स्वतःच्या पत्नीच्या बरोबर असलेल्या दुराव्यामुळे असेल  त्यांचे चित्रपट अधिकाधीकपणे ठळकपणे मानवी आयुष्यातील ऋणात्मक बाजूकडे झुकलेले आपणास आढळते. 
           साहब बिबि और गुलाम या चित्रपटात कुटुंबातील सत्तासंघर्ष आणि त्यामुळे मानवी मनाची होणारी घूसमट आपणास पहायला मिळते. हा चित्रपट त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आधारित होता असे म्हटले जाते.
 कागज के फुल मध्ये बाँलीवुडची क्षणभुंगरता आपणास दिसते. गुरुदत्त यांचा कमनशिबी नशिबामुळे एका आधीच्या आयुष्यात यशस्वी मात्र उतरार्धात अयशस्वी ठरलेल्या सिनेदिग्दर्शकाचे भावविश्व पडद्यावर चितरणारा कागज.के फुल हा चित्रपट बाँक्स आँफिसवर विशेष गल्ला गोळा करु शकला नाही. 
            प्यासामध्ये  एका यशस्वीतेसाठी झटणाऱ्या कवीचे भावविश्व चित्रीत करण्यात आले आहे. कवी यशस्वीतेसाठी झटत असताना लौकिक अर्थाने यशस्वी समजले जाणारे त्याचे भाउ त्याचा कसा उपमर्द करतात? या उपमर्दामुळे तो कसे आत्महत्या करायला धजावतो, अपघाताने स्मृतीभंस होवून वाचतो,  स्मृती परत आल्यावर  मधल्या काळात यशस्वी ठरलेल्या कवीला त्याचे भावंड . आपला वाटा राँयल्टी मधील वाटा बंद  होवू नये म्हणून कसे जाणून बुजून ओळखत नाहीत. पैसापुढे प्रेम कसे थिटे पडते, याचे उत्तम चित्रण करण्यात आले आहे (युट्युबवर प्यासा चित्रपट उपलब्ध आहे)प्यासाद्वारे मानवी भावभावना कस्या प्रसंगानुसार बदलतात. प्रेमापुढे स्वार्थ कसा मोठा ठरतो. हे जग कसे स्वार्थी आहे. या गोष्टी आपणास समजतात.
            गुरुदत्त यांच्या वैवाहिक आयुष्यावर याआधी अनेकदा अनेकांनी बोललेले आहे. मात्र त्याचे बालपण त्रासातच गेले. घरातील गरीबीमुळे शिक्षण अर्धवत सोडून त्यांना सिने जगतात यावे.लागले होते. याचे प्रत्यंतर आपणास गुरुदत्तांचा चित्रपटामध्ये दिसते. गुरुदत्त यांचा चित्रपटाविषयी खुप काही बोलता येवू शकते. मात्र तूर्तास इतकेच।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?