स्मरण ऐताहासिक उड्डीचे


      जूलै महिना सुरु झाला की अनेक गोष्टींची आठवण होते,काही जणांना स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीची आठवण होते. काही जणांना लोकशाहीर अण्णा भाउ साठे यांची आठवण होते.या अनेक महत्तवाचा घटनांपैकीच एक गोष्ट म्हणजे 8 जूलै ची स्वातंञ्यवीर सावरकरांची ती जगप्रसिध्द समुद्रातील उड्डी.
  फ्रान्सचा किनारा जवळ आलेला आहे आपण पोहत फ्रान्स गाठले तर हे ब्रिटीश सरकार आपल्याया परदेशी भूमीवर अटक करू शकणार नाही काय म्हणावे?, या नियोजनाला माझ्याकडे शब्दच नाही या गोष्टीचे वर्णन करायला. मार्सेलीस या  ठिकाणी आर्यलंड मध्ये होमरुल चळवळ चालवणाऱ्या अँनी बेझंट यांचा मदतीने स्वातंञ्यवीर सावरकर  भुमीगत होऊन भारताच्या स्वातंञ्याची चळवळ पुढे नेणार होते. माञ दुर्दैवाने त्या सावरकरांना भेटू शकल्या नाहीत आणि फ्रान्सच्या भुमीवर असूनही ब्रिटीशांनी स्वातंञ्यवीर सावरकरांना अटक केली पुढचा ईतिहास सर्वाना माहीती आहेच.  माञ मला राहून राहून वाटते जर सर्व ठरवल्याप्रमाणेच घडले असते
तर ? तर इतिहास फार वेगळ्या पध्दतीने लिहला गेला असता यात तिळमाञ शंका नाही असो इतिहासाच्या वस्तुनिष्ठ अभ्यासात या जर तर च्या गोष्टीना फारशे महत्व नसतेच याची मला पुर्ण जाणीव आहे 
      त्याचा आधीचे ब्रिटन  मधील त्यांचे कार्य देखील अत्यंत महत्वाचे आहे मदनलाल ध्रिंगा याला क्रांतीकारक चळवळीकडे आकर्षीत करणे. भारतात शस्ञाञे पाठवणे जोसेफ मँक्झनी याचे चरीञ लिहणे सारेच कल्पनातीत आहे ब्रिटनला जाण्याचा अगोदर त्यांचे नाशकातील आणी पुण्यातील कार्य म्हणजेच मिञमेळा पुढे ज्याचे नामकरण अभिनव भारत झाले त्या संघटनेची स्थापना  फ्रग्युसन महाविद्यालयात शिकत असताना पुण्यात केलेली परदेशी कपड्यांची केलेली  होळी (गरवारे कॉलेज जवळ ) हेही दुर्लक्षून चालणारे नाही  
        पुण्यातील चाफेकर बंधुंच्या फाशी नंतर त्यांचा देशासाठी जीवन.समर्पित करण्याचा घरचा देवीसमोर घेतलेला संकल्प. सारेच अविश्वसणीय  नाशिक महानगरपालीकेने त्यांचा या जगप्रसिध्द उडीचा सम्माणार्थ नाशिक मधील पहिल्या तरणतलावाला त्यांचे नाव देवून त्यांचा सम्मान केलाय तसेच नाशिकमधील पहील्या उड्डाणपुलाला देखील त्यांचे नाव देण्यात आलंय  
     स्वातंञ्य सावरकरांच्या आयुष्यातील सुरवातीची  महत्वाची वर्षे नाशिक आणि पुण्यात व्यतीत केलेली दिसतात. सावकरांच्या बलदंड तरीही लवचीक शरीराचा त्यांना खुप फायदा झाला अंगाला जखमा झालेल्या असताना समुद्राचे खारे पाणी वरून होणारा गोळ्याचा वर्षाव अश्या परीस्थितीत त्यांनी केलेले साहस अतूलनीयच
होते
 दूर्दैवाने नियोजीत कार्यक्रम तडीस जावू शकला नाही त्याना अटक होउन 2 जन्मठेपेची शिक्षा झाली पुढे लोकमान्य टिळकांचा म्रुत्यू झाला आणि भारतातील क्रांतीकारक चळवळीचा जवळपास अंत झाला नंतरच्या काळात भगतसिंग सुखदेव राजगुरु सुभाषचंद्र बोस आदी बोटावर मोजता येइल ईतके क्रांतीकारक सोडले तर नंतरच्या स्वातंञ्यलढ्यावर महात्मा गांधीची छाप दिसते.
  राष्टीय सभेच्या सुरवातीच्या काळातही त्यावर मवाळ्याचा वरचष्मा दिसतो असो स्वातंञ्यवीर सावरकरांनी  दिलेली 1857 ची नविन ओळख सारेच गौरवाने छाती फुलून जावी अशीच आहे. स्वातंञ्यवीर सावरकर यांचा विषयी अजून बरेच काही  लिहता येवू शकते माञ तुर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?