वणव्याची शृंखला थांबेचीच ना !

   

    आपल्याकडे एका सिमेंटचा प्रसिद्ध जाहिरातीमध्ये अबे ये दिवार तूटती क्यु नही? असे वाक्य आहे. याच वाक्यात बदल करत अबे ये आग बुझती क्यु नही?,असा प्रश्न उपस्थित व्हावा,असी स्थिती गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून तूर्की आणि आता गेल्या आठवड्यापासून ग्रीस या देशात आहे. या देशात प्रचंड असा वणवा लागला आहे. जो तेथील सरकारच्या नियंत्रणाच्या बाहेर गेला आहे. या वणव्यामुळे हजारो लोकांना सुरक्षीतस्थळी हलवावे लागले आहे. कितीतरी शेकडो लोकांच्या घराचा अशरक्षः कोळसा झाला आहे. लाखो हेक्टर जमिन जळून खाक झाली आहे.दोन्ही देश मिळून हा मजकूर लिहण्यापर्यत सुमारे 30 ते40 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत.या देशांचे वणवा विझवण्याचे प्रयत्न तोकडे पडत असल्याने इतर देशाकडून वणवा विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे. तूर्की देशातील सर्वसामान्य जनता घरातील बादली, भांडी पाण्याने भरुन, झूडपे गवत आगीवर मारुन जमेल त्या मार्गाने आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे.  
        या आगीमुळे वातावरणात हजारो टन ग्रीन हाउस गँसेस सोडला जात आहे. ज्याचे भविष्यातील दुषपरीणाम खुपच मोठे असणार आहेत.आर्थिक हानी तर मोजण्याचा पलीकडे जाईल का?असी स्थिती आहे. सध्या या प्रदेशातील समुद्रावरुन बाष्पयुक्त वारे वेगाने वहात असल्याने या वणव्याचा क्षेत्रात वाढच होत आहे. तसेच या
भागातील तापमान अजून काही दिवस चढेच राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ व्यक्त करत आहे. ज्यामुळे हा धोका अजून वाढण्याची शक्यता असल्याचे BBC( युकेची अधिकृत वृत्तवाहिनी), DW (जर्मन सरकारची वृत्त वहिनी  )France 24 फ्रान्स सरकारची वृत्त वहिनी म्हणजे) Al jhazira(कतार सरकारची अधिकृत  वहिनी) आदी न्युज चँनेलमध्ये या संदर्भात दिलेल्या बातमीत सांगण्यात आले आहे ग्रीसची राजधानी अथेन्स पासून ही आग रविवारी 8आँगस्ट रोजी 60 किमी अंतरावर होती. या आगीच्या भक्ष्यस्थानी आँल्मपिकची सुरवात ज्या ठिकाणी झाली, ते ठिकाण पडते का ?असी भिती ग्रीस सरकारला आहे. फ्रान्स 24, बिबिसी आदी विविध वृत्तवाहिनीवर या वणव्यात आर्थिक नुकसान झालेल्या लोकांच्या प्रतिक्रिया दाखवण्यात येत आहे. फारच हृदयद्रावक स्थिती आहे. तसेच आगीची स्थिती पण दाखवण्यात येत आहे. छातीत खरोखर धस्य व्हावे असी स्थिती आहे. आपण युट्युबवर याबाबतचे व्हिडीओ बघू शकतात.
       ही आग लागण्याबाबत विविध दावे करण्यात येत आहे. तूर्कीचे राष्ट्रपती एदर्गान यांच्या मते कुर्दिश लोकांनी जाणुनबुजून ही आग लावली . जी आग झपाट्याने पसरली. माहितीसाठी सांगतो तूर्की, इराक , इराण या तिन्ही देशात पसरलेला एक समाज  म्हणजे कुर्दिश लोक. या तिन्ही देशात पसरलेल्या कुर्दिश लोकांचा स्वतंत्र देश असावा, म्हणून चळवळ सुरु आहे.  या तिन्ही देशांची सीमा ज्या भागात एकत्र येते , तिथेच कुर्दिश लोकांची वस्ती मोठ्या संख्येने आहे. तूर्कीमध्ये या आंदोलकांना थोपवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा टँकर चा वापर पहिल्यांदाच आग विझवण्यासाठी होत असल्याची अल् जझीराची बातमी आहे..तूर्की प्रशासनाच्या आग नियंत्रण करण्याचा पद्धतीवर स्थानिक जनता प्रचंड नाराज आहे. तेथील प्रशासन आग नियंत्रण करण्यात 100% अपयशी ठरल्याचा दावा तिथे उघडपणे करण्यात येत आहे. तूर्की प्रशासनाने वणवा नियंत्रणासाठी दुसऱ्या देशांची मदत
घेण्यास पहिल्यांदा नकार दिला होता. तूर्की प्रशासनाच्या मते त्यामुळे देशाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचते. मात्र वणव्याचे स्वरुप बघून तिथेल सरकार अखेर नमले असून, अन्य देशांची मदत घेण्यास तेथील सरकारने सुरवात केली आहे.
ग्रीस प्नशासनुसार हवामान बदलामुळे गेल्या 30 वर्षातील सर्वात मोठा वणवा लागलेला आहे. तसे दरवर्षी ग्रीसमध्ये वणवे लागतात, मात्र ते छोटे असतात. सध्या लागलेला आहे, तसा आक्राळविक्राळ स्वरुपातील वणवे नसतात.गेल्या 30 वर्षात असा मोठा वणवा लागलेला नाही. याविषयी माध्यमांनी दिलेल्या माहितीनूसार ग्रीस मधील नागरीक त्यांच्या कचरा जंगलाचा जवळ आणून पेटवून देतात, त्याचामुळे हे वणवे लागतात.
     या वणव्याबरोबरच सैबिरियात देखील वणवा लागला आहे. मात्र तो आता बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आहे. एकंदरीत हा कालावधी माणसासाठी कसोटीचा आहे. पश्चिम युरोपात ,चीनमध्ये, तसेच भारतात उत्तराखंड आणि
तळकोकणात (रत्नागिरी , सिंधूदुर्ग या भागाला तळ कोकण म्हणतात) प्रचंड पाउस , उत्तर अमेरीका खंड पाकिस्तानचा सिंध प्रांत येथे मागील सर्व विक्रम मोडीत काढणारा उष्मा ही सर्व त्याचीच रुपे आहेत. या परीक्षेत मानवाने सहजतेने पास होवून हवामान बदलावर सहजतेने मात करावी, यासाठी इश्वराने त्यास साह्य करावे, असी इश्वराकडे याचना करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?