भयानक वास्तवाची पुन्हा एकदा जाणीव !

     

 मानवाचे हवामान बदल या संकटाशी लढण्याचे प्रयत्न तोकडे , अपुरे आहेत..याची जाणीव पुन्हा एकदा जाणीव मनुष्य प्राण्यास 9 आँगस्ट रोजी झाली.याला निमित्त होते,9 आँगस्ट रोजी प्रसिद्ध झालेला  आयपिसीसी अर्थात इंटर गव्हरमेंटल पँनेल फाँर क्लायमेंट चेंज या संस्थेचा आलेला हवामान बदलाविषयी मानवी बदलाविषयीचा अहवालाचा पहिला भाग..याचे दोन ते तीन भाग प्रसिद्ध  होतात. सन 1990 पासून आय पि सी सी कडून सातत्याने दर दोन ते तीन वर्षांनी अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. यंदा 16वा अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालात अनेक धक्कादायक बाबी सांगितल्या आहेत.
 आपणास पुढील दशकात अनेकदा तीव्र प्रकारचा हवामानास सामोरे जावे लागेल. प्रचंड पूर , प्रचंड उष्मा, प्रचंड दुष्काळ  या प्रकारच्या हवामानाचा आपणास गेल्या काही वर्षांचा तूलनेत जास्त प्रमाणात सामना आगामी दशकात करावा लागेल. तसेच पुढील 30 नाही तर 20 वर्षातच आपणास 1.5 अंश सेल्यीयसने तापमान कमी करणे आवश्यक असल्याचे या अहवालामध्ये सांगण्यात आले आहे. (या आधीच्या अहवालात 1.5अंश सेल्यीयस तापमान कमी करण्यासाठी30 वर्षाची मर्यादा होती) 
     हा अहवाल पुर्णतः शास्त्रीय कसोट्यांवर आधारीत असतो. राजकीय, आर्थिक दबाब न पडता हा अहवाल तयार करण्यात येतो. कोणताही सरकारी हस्तक्षेप या अहवालात नसतो. या अहवालातील निष्कर्षानुसार हवामान बदलाबाबतची ध्येय धोरणे निश्चित करण्यात येतो.हवामान बदलाविषयीची ध्येय धोरणे ठरवण्यासाठी मुलभुत घटक म्हणून यास जागतिक स्तरावर मानाचे स्थान आहे. विविध स्त्रोताकडून मिळालेल्या माहितीचे शास्त्रीय कसोट्या लावून विश्लेषण करुन हा अहवाल तयार करण्यात येतो.या अहवालामध्ये नोव्हेंंबर 2021 युकेच्या ग्लासको या 
शहरात सखोल विचारमंथन होवून  हवामान बदलाबाबतची जागतिक दिशा ठरेल.काही महिन्यापूर्वी याअहवालाची काही माहिती अहवाल प्रसिद्ध होण्याचा आधीच बाहेर आली होती..या बाहेर आलेल्या अहवालात सध्याचे लहरी हवामान तर झलक आहे.भविष्यात याहुन लहरी हवामानाचा सामना करायचा आहे, असे सांगण्यात आले होते.
    या बदलत्या हवामानाला अनुसरुन आपण आपल्या शेतीच्या पद्धतीत बदल करायला हवे..पंजाबमध्ये एक पिक झाल्यावर दुसरे पिक घेण्याचा आधी शेत मोठ्या प्रमाणात जाळले जाते. या पद्धतीमध्ये बदल करत नविन पद्धती आपण अंगिकारायला हवी. या हवामान बदलाची सर्वाधिक शेतकऱ्यांना बसणार आहे. मात्र याबाबत आपली काय स्थिती आहे. तसेच शेती सोडून अन्य क्षेत्रात सुद्धा आपण हे आव्हान पेलवण्यास पुरेसे सक्षम नाही , हे जगजाहिर आहे.. भारताच्या अर्थव्यवस्थेचा जो आकार आहे, त्याचा विचार करता त्या सारख्या अर्थव्यवस्थांमध्ये आपण दरदोइ सर्वात कमी कार्बन उत्सर्जन करतो. मात्र एकुण उत्सर्जाचा विचार करता आपण जगातील तिसऱ्या क्रमाकांचे उत्सर्जन करतो. या मुद्द्यावर अमेरीकेसारखे देश आपणावर जागतिक समुदायाकडून बंधने लादण्यात यावी, यासाठी प्रयत्न करु शकतात.असो
एकंदरीत हवामान बदल हा विषय सध्या अत्यंत महत्तवाचा आहे, हेच खरे!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?