मुद्दे त्यांचे .... मुद्दे आपले

     


    मी आपणाशी बोलत असताना (13 सप्टेंबर ) युरोप खंडातील जर्मनी आणि उत्तर अमेरिका खंडातील कॅनडा या देशात सार्वत्रिक निवडणुकीमुळे समाजजीवन अक्षरशः ढवळून निघत आहे .जर्मनीमध्ये 26  सप्टेंबर आणि कॅनडामध्ये 20 सप्टेंबर रोजी निवडणुका होणार आहेत या निमित्याने तेथील राजकीय प्रचारात दंग आहेत . विरोधकांवर विविध मुद्यांवर टीका करत आहे मात्र हे करताना वैयक्तिक हेवे दाव्यांवर ते बोलताना दिसत नाहीये. विविध प्रसंगी त्यांनी त्यांनी घेतलेल्या भुमिकांवर ते टिका करत आहेत. ज्यामध्ये स्त्रीवाद, दहशतवाद, हवामान बदल या मुद्यांचा समावेश आहे. तेथील राजकीय पक्षांनी आपापले जाहिरनामे देखील प्रसिद्ध केले आहेत. ज्यामध्ये हवामान बदलाचा मुद्दा सर्वच राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात अग्रभागी आहे.हवामान बदलाचा  जगात सर्वाधिक फटका आपणास बसलेला आहे, मात्र आपल्या येथील निवडणूकांमध्ये या मुद्द्याचा दुर दूरपर्यत समावेश नसतो,  हे आपण जाणतातच.

              मी गेला आठवडाभर  DW , France24 आदी वृत्त वाहिन्यांचा या संदर्भातील बातम्या बघत आहे. या बातम्यांमध्ये काही चर्चांचा देखील समावेश आहे. या सर्व चर्चांमध्ये एकमेकांचे बोलणे अर्ध्यावर तोडणे, एकमेकांवर विनाकारण दफडणे, आदळआपट करणे  हे मला औषधालाही दिसले नाही. जूना इतिहास काढून एकमेकांवर चिखलफेक करणे आदी मुद्दे मला दिसले नाहीत. सर्व निवडणूका या सध्याचा प्रश्नाभोवतीच फिरत आहेत. जून्या गोष्टींचा दाखला देत त्याचा बदला घेण्यासाठी आम्हाला निवडणून द्या, असे भावनिक आवाहन सुद्धा यावेळी

करण्यात येत नाहीये.विविध राजकीय नेत्यांची सध्याचा प्रश्नांबाबत  भूमिका काय आहे ? याची ओळख मतदारांना व्हावी यासाठी विविध Talks Show  चे आयोजन वृत्त वाहिन्यांकडून करण्यात येत आहे ज्यामध्ये प्रतिस्पर्ध्याला त्याचा पूर्ण मुद्दा मांडू देण्यात येत आहे खाऊ की गिळू त्याला अशा अविर्भावात चर्चा होत नाहीये .चर्चेतील आवाजाची पातळी देखील सर्वसामान्य आहे उगीचच वाढवलेली दिसत नाही 

या निवडणुकीत निवडणूकपूर्व मतदाराचा कल देखील प्रसिद्ध करण्यात येत आहे  जो गेली 16वर्षे जर्मनीचे सुकाणू हाती घेतलेल्या अँजेला मर्केल  आणि सध्या कॅनडाच्या पंतप्रधानपदी असलेल्या जस्टिन टूडो  यांच्या विरोधात जाणारा आहे मात्र तरीदेखील त्यांचे कॅमेरासमोरील वागणे अत्यंत संयमाचे आहे या कलावरील त्यांच्या माध्यमात दाखवलेल्या प्रतिक्रिया तसेच विरोधकांच्या प्रतिक्रिया आपल्या येथील राजकारणी लोकांनी बघण्यासारख्या आहेत आपली हार किंवा जीत तेथील राजकारणी अत्यंत शांतपणे घेत आहेत अर्थात या निवडणुकीचा  निकाल जाहीर होताना यात काहीसा बदल होऊ शकतो मात्र आपल्याकडे जसा विजयोत्सव साजरा करण्यात येतो तितका ठळक नसेल हे नक्की

आपणाकडे प्रगतीबाबत परिसराच्या स्वछ्तेबाबत { जो काहीसा गैरलागू आहे , विषवृत्तापासून ध्रुवाकडे जावे तसे वातावरणतील धूळ आणि वार्यांचा वेग कमी होत जातो आपण त्यांच्या तुलनेत विषवृत्ताच्या जवळ आहोत परिणामी आपल्याकडे मुळातच धूळ जास्त आहे तिथे असते तितकी स्वच्छता आपणस कदापि शक्य नाही } नेहमी त्यांचा

आदर्श सांगितला जातो मला वाटते आपण त्यात मध्ये निवडणुकीच्या वेळच्या या घडामोडीचा   .देखील आदर्श आपण घ्यावयास हवा आपणाकडे निवडणूक कश्या प्रकारे आणि कोणत्या मुद्यांवर लढवल्या जातात हे आपल्या सर्वांना  माहिती आहेच 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?