कँनडाची सुत्रे भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे?

       

           आज हे लिहीत असताना (14 सप्टेंबर सायंकाळ) रोजी कँनडातील केंद्रीय विधीमंडळाच्या निवडणूकीच्या प्रचार आंतीम टप्यात आला आहे. येत्या सोमवारी अर्थात 20 सप्टेंबर रोजी कँनडातील नागरीक तेथील खासदार निवडण्यासाठी मतदान करतील. आपले अल्पमतातील सरकारला पुर्ण बहुमत मिळण्यासाठी, कोरोनाचा चौथ्या लाटेचा धोका कायम असताना तसेच विद्यमान सरकारचे 17महिने बाकी असताना कँनडाच्या पंतप्रधानांनी तेथील संसद भंग करत मुदतपुर्व निवडणूका जाहिर केल्या. ज्यासाठी येत्या 20 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.कोरोना साथीच्या काळात तेथील विरोधक सरकारला पुर्ण समर्थन देत असताना, या निवडणूका जाहिर करण्यात आल्या आहेत, हे विशेष. या निवडणूकीत ज्या पक्षाला अधिक मते मिळतील , त्या पक्षाचा कँनडाचा पंतप्रधान होईल. ग्लोबल न्युज , आणि सि एन एन या वृत्तवाहिनीच्या   (आपल्या प्रकारे अजेंडा सेटर वृत्तवाहिन्या या आहेत का ?, ते माहिती नाही) बातम्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे जे एक्सिट पोल समोर येत आहे ,त्यानुसार  न्यु डेमोक्रेटीक पक्षाचे पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार  जगमीतसिंग यांची लोकप्रियता प्रचंड वाढतेय. या वृत्तवहिनीवर पक्षाची भुमिका सांगण्यासाठी ज्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात येत आहे, त्यामध्ये सातत्याने त्यांचा उल्लेख संभाव्य पंतप्रधान म्हणून करण्यात येत आहे. तसेच या एक्झिट पोलमध्ये जस्टीन टुडो यांची लोकप्रियता कमी होताना दिसत आहे.
मात्र अद्याप त्यांची लोकप्रियता त्यांचा अन्य स्पर्धकांपेक्षा जास्तच आहे. या वृत्तवाहिनीच्या बातम्यांनुसार जवळपास  70% लोकांना सध्या निवडणूका घेणे अयोग्य वाटत आहे, जे आँगस्ट मध्ये निवडणूका जाहिर झाल्यावर जेव्हढ्या लोकांना निवडणूका घेणे अयोग्य वाटत होते, त्यापेक्षा13% जास्त आहे. आजमितीस न्यु डेमाँक्रटीक पार्टीस कँनडाच्या केंद्रीय विधीमंडळात फारसे प्रतिनिधीत्व नाही. ही गोष्ट  देखील लक्षात घेणे आवश्यक आहे.
       आता वळूया मूळ मुद्द्याकडे , कँनडामध्ये अल्पसंखाक मात्र महत्तवाचा पदावर कार्यरत असणारा समाज म्हणून शीखसमाज ओळखला जातो. याला काहीसी ब्रिटीश राजवटीची पार्श्वभूमी आहे. कामत गारु प्रकरण या नावाने कँनडातील शीखांची घटना सुप्रसिद्ध आहे. पंजाबमधील खलीस्तान कारवाया ऐन जोमात असताना  एअर इंडीया चे कनिष्क विमान कँनडातील विमानतळावर उडवून देण्यात आले होते. त्यावेळच्या कँनडातील पंतप्रधानांनी खलीस्तानविषयी वादगस्त विधान केले होते. सध्याचा कृषी कायद्याविषयी भारताच्या प्रतिमेला धक्का पोहचेल, असी विधाने कँनडाच्या शीख खासदारांकडून करण्यात आली होती. भारताच्या हिताला हानी पोहचेल,  अस्या  पंजाबविषयक घडामोडी तिथे मोठ्या संख्येने होतात, असी बातमी काही दिवसापूर्वी मी द हिंदूत वाचली होती. त्यामुळे अस्या शीख समाजातील व्यक्तीचे नाव जर सातत्याने कँनडातील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत घेतले जात असेल तर ती फक्त कँंनडातील अंतर्गत प्रश्न उरत नाही, त्यात भारताचे हितसंबध सुद्धा गुंतले जातात. एक भारतीय वंशाच्या नागरीकांची कँनडाच्या पंतप्रधानपदावर नियुक्ती इतक्या मर्यादीत स्वरुपात हा प्रश्न रहात नाही.
                          भारताने 1998साली अणू चाचणी केल्यावर ज्या देशाने आपल्याला अवकाश संशोधनात महत्तवाचे ठरेल असे क्रायोजनिक इंजिनाचे त़ंत्रज्ञान देण्यास विरोध केला होता. कँनडा हा देश आपल्यावर बंधने टाकणाऱ्या पहिल्या काही देशात होता.अमेरीकेने सांगूनसुद्धा कँनडा आपल्यास युरेनियम देण्यास तयार नव्हता.कँंनडा अनेक
महत्तवाचा खनिजाने समृद्ध देश आहे. ज्यापैकी काही खनिज्यांचा वापर इलेट्रीक वाहनाच्या बँटरीमध्ये होतो.आता आपल्याकडे त्याचे संशोधन आणि निर्मिती मोठ्या संख्येने होत आहे. जागतिक हवामान बदल या विषयातील संशोधन आणि त्यानुसार रणनिती आखण्यामध्ये कँनडा भारताचा महत्तवाचा साथीदार आहे. हे आपणास विसरून चालणार नाही.कँनडातील सत्ता समीकरणांचा यावर निश्चितच परीणाम होणार ,म्हणुन आपणास या निवडणूका महत्तवाचाच आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?