पर्यावरण रक्षणासाठीचा एक वेडा.... ब्रिजेश शर्मा

अनेकदा ध्येयवेड्या लोकांना लोकांना आपाल्याकडे वेडे समजले जाते.  कुठून या व्यक्तीच्या मनात हे खूळ शिरले कोणास ठाऊक ? असा सर्वसाधारण नजरेतून त्यांच्याकडे बघितले जाते . मात्र यावेळी इतिहास्यात अश्याच काहीश्या वेडगळ  वाटणाऱ्या व्यक्तीमुळे फार मोठी सर्वसाधारण स्थितीत अशक्यप्राय वाटणारी कामे  झाल्याचा सोईस्करपणे विसर पडतो . रस्त्यावरून जाताना एका मुरलीधर आमटे  यांनी कुष्ठरोग्याला पहिले,  त्याच्या स्थितीची त्यांना  दया आली, त्यांची स्थिती  सुधारावी, या वेडाने ध्येयाने त्यांना झपाटले आणि त्यातून बाबा आमटे या महान समाजसुधारकांचा आणि हेमलकसा या एका स्वप्नवत वाटणाऱ्या प्रकल्पाचा जन्म झाला अन्यवेळी समाजाचा तिरस्काराचा धनी झालेल्या कुष्ठारोग्यांचा अंगभूत असणाऱ्या कलागुणांना वाव मिळून त्यांना अर्थजनासाठी साधन मिळाले 
     गेल्या काही दिवसापासून नाशिकमध्ये असा एक ध्येयवेडा आला आहे, ब्रजेश शर्मा हे त्यांचे नाव. MBA,सारखे उच्च शिक्षण घेतल्यावर युरोपातील अर्मेनिया आणि जार्जिया आदी पाश्चात्य देशातील सुखवस्त नोकरी सोडुन,  सेंद्रिय  शेतीच्या  उप्तादनाचा  आणि पर्यवर्णपूरक  जीवनशैलीचा लोकांनी स्वीकार करावा , लोकनिया प्लास्टिकचा वापर आपल्या जीवनातून दूर करावा  यासाठी गेल्या दोन वर्षांपासून ते सायकलवर जनजागृती करत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यावरणपुरक संदेशामुळे प्रभावीत होत त्यांनी या जनजागृती अभियनासाठी त्यांनी आपले जीवन समार्पित केले. आता पर्यंत आपल्या 30,000किमीच्या सायकल प्रवाश्यात देशातील सात राज्यातील 135 शहरे आणि 7.5000 पेक्षा गावांमधील 28 लाख महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना
परिवारणापूरक जीवनशैलीकडे नेले आहे . देशाचे पंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने दोन वर्षांपूर्वी 2019 साली 17सप्टेंबर रोजी गुजरातची राजधानी गांधीनगरपासून प्रवाश्यास सुरवात केलेल्या या मुळच्या मध्यप्रदेशमधील  मजोर येथील रहिवासी असलेल्या या अवलीयाने आतापर्यत राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश  हरीयाणा , दिल्ली महाराष्ट्र, गुजरात आदि प्रदेशात आपला संदेश लोकांपर्यत पोहचवला आहे.  पुर्ण देशभर
 पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा त्यांचा मानस आहे. 
नाशिकला आल्यावर त्यांचे नाशिक सायकलिस्टतर्फे स्वागत करण्यात आले. 
ध्येयवेड्या लोकांनी इतिहास बदलल्या असल्याचा उल्लेख वरती आलाच आहे, तसाच या अवलीयामुळे भारत थोडा का होईंना बदलेच ,गरज आहे. त्यांचे हात बळकट करण्याचे. आपण त्यांच्याशी समाज माध्यमांद्वारे देखील संपर्क साधू शकतात .
त्यांचा इस्टाग्राम आयडी आहे .Brijesh 1495 आहे. त्यांचा फेसबुक आयडी आहे .Cyclist Brijesh हा आहे..आपण गुगलवर cyclist Brijesh असे सर्च करुन देखील त्यांच्याशी संपर्क साधू शकतात.
मग करताय ना ? त्यांचे हात बळकट !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?