एका कप्यात बंद करण्यात आलेले साहित्यिक पु.ल.

   

8 नोव्हेंबर ही तारीख एका महान मराठी साहित्यीकाची जयंती, म्हणून मराठी सारस्वतात परीचित आहे. पुरषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु. ल. देशपांडे हे त्या साहित्यकाचे नाव. त्यामुळे मराठी साहित्यांवर प्रेम करणाऱ्या सर्व सारस्वतांना मनःपुर्वक शुभेच्छा .
     पु.ल. म्हंटले की प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे साहित्यीक म्हणूनच ओळखले जातात. मात्र त्यांनी फक्त मराठीमध्ये विनोदी साहित्य निर्मितीच केली नाही, तर तीन व्याख्याने, गांधीजी आदी गंभीर लेखन सुद्धा केले आहे. ज्यात त्यांनी अनेक राजकीय , सामाजिक प्रश्नावर ठोस भुमिका घेतली आहे. मात्र पु. ल. आणि आपल्या सर्वांच्या दुर्देवाने पु.ल.देशपांडे यांच्या विनोदी साहित्याला जितकी अमाप प्रसिद्धी लोकप्रियता मिळाली, तितकी समाजमान्यता या लेखनास मिळाली नाही. समाजाने त्यांना कायम विनोदी लेखनाच्या कप्यातच बंदिस्त केले. त्यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या दोन चित्रपटांमध्येही त्यांवर फारसे भाष्य करण्यात आलेले नाही, असे माझे निरीक्षण आहे, असो 
     पु. ल. देशपांडे यांच्या विनोदावर शहरी सुशिक्षीत वर्गाला आवडतील, अस्या पद्धतीचे विनोद पु ल यांनी केले, असा शिक्का मारण्यात येतो. मात्र आज टिव्हीवर विनोदी कार्यक्रम म्हणून जे दाखवण्यात येतात, त्याचा विचार करता, पु.ल. देशपांडे यांचा विनोदाला खुपच उत्तम दर्जा होता, हे नाकरण्यात काही अर्थ नाही .ओढून ताणून केलेले विनोद पु. ल. देशपांडे यांच्या लेखनात आढळत नाहीत. समाजातील व्यंगाला कलामक्तेने टिपलेले त्यांच्या लेखनात आपणास दिसते.मग ते पुस्तकांचा आहारी गेलेल्या सखाराम गटणे असो किंवा कायम इतिहासात रममाण होणाऱ्या हरीतात्यांचे व्यक्तीचित्रण असो. लोक कसे आयुष्य जगतात? याचे उत्कृष्ट चित्रण मला त्यांचा व्यक्तीचित्रणात दिसते. दुसऱ्याला कायम मदत करणारा नारायण असो, किंवा मुलांना रंजकतेने कसे शिकवावे? याचा वस्तूपाठच देणाऱ्या चितळे मास्तरांचे व्यक्तीचित्रण असो, पु.ल. देशपांडे यांनी समाजाच्या सर्व स्तरांचे यथोचित चित्रण केल्याचे त्यांचा लेखनातून दिसते.त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार मानावे तितके कमीच.
पु. ल. देशपांडे यांचे लेखन वाचत महाराष्ट्रातील एक पिढी मोठी झाली. त्यांनी समर्थ रामदास स्वामी यांनी टवाळखोरास आवडणारा घटक म्हणून हिणावल्या गेलेल्या विनोदास राजाश्रय, समाजमान्ययता मिळवून दिली. त्यांचा विनोदाला कारुण्याची छटा होती.नारायणमध्ये आपणास ती स्पष्टपणे दिसते सुद्धा! आचार्य अत्रे यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास गेल्या दहा हजार वर्षात असा विनोदी लेखक झाला नाही, पुढील दहा हजार वर्षे होणे नाही. पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त पुन्हश्च एकदा सर्वांना शुभेच्छा देवून सध्यापुरते थांबतो, नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?