ड्रॅगनचे फुत्ताकार कोणाकडे ?

   


  आपल्या मराठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमधून एक पोलिसी अधिकारी आणि एक मंत्री यांच्यातील वाद , एसटी कर्मचाऱयांच्या संपविषयी सांगितले जात असताना आपला प्रमुख शत्रू जो   आपल्याबरोबर मोठी सीमा देखील शेअर करतो अश्या चीन बाबततीन घडामोडी घडल्या . एक जागरूक सुजाण नागरिक म्हणून आपणास त्या माहिती  अत्यावश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया त्या घडामोडींविषयी 

        तर मित्रानो , सन १९५९ साली अरुणाचल प्रदेश आणि तिबेट सीमेवरील लांगजू या संरक्षण चौकीवर  चीनने आक्रमण करून ती चौकी आणि लगतचा काही भाग आपल्याकडे अनधिकृतपणे घेतला . ९६२ साली जेव्हा चिनी सैन्य अरुणाचल प्रदेशात घुसले होते,  तेव्हा एकतर्फी युद्धबंदीनंतर चिनी सैन्य पुन्हा माघारी  तेव्हा सुद्धा तो भाग आपल्याकडेच ठेवला.  त्या भूभागात चीनने १०० घरांचे एक छोटे गाव वसवले आहे,  असा उल्लेख अमेरिकी संरक्षण खात्यातर्फे अर्थात पंटेगॉनतर्फे चीनसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालात करण्यात आला आहे या अहवालाच्या पान  क्रमांक १७६ वर हा उल्लेख करण्यात आला आहे .चीनने या भूभागात घरे बांधल्याचे जानेवारी २०२१ मध्येच उपग्रह प्रतिमांवरून समजले होते यावेळी हा उल्लेख अमेरिकी अहवालात आला इतकेच . चीनच्या या घुसखोरीविषयी आपण युएससार कडे त्यावेळेस अधिकृत तक्रार देखील दाखल केली होती युएसएसरने या बाबत चीनला विचारणा देखील केली होती . मात्र कालांतराने  आपण हा मुद्दा काहीसा दिला जर तो सोडला नसता तर १९६२चे युद्ध झालेच नसते असे काही संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे 

       एकीकडे हे घडत असताना चीनने भारताच्या सरकारच्या मदतीने मात्र  स्वतंत्रपणे  काम करणाऱ्या  काही सायबर हॅकर व्यक्तीने चीन ,नेपाळ आणि पाकिस्तानमधील काही महत्त्वाच्या संस्थांच्याकॉम्पुटरवर हल्ला करून त्याच्यातील माहिती काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप चीनने अधिकृतपणे केला आहे चीनने आपल्या वुहान मेडिकल इन्स्टिट्यूटसह अवकाशातील संशोधन तसेच नागरी हवाई क्षेत्रविषयीची माहिती चोरल्याचा आरोप केला आहे . आतापर्यंत अमेरिका भारताकडून चीनमार्फत असे असे सायबर हल्ले होत असल्याचा आरोप केला जात असे यावेळी चीनकडून असा आरोप करण्यात येत आहे 

या बरोबर चीनकडून भारताविरुद्ध मोठ्याप्रमाणात  इन्फॉर्ममेशन वॉर खेळले जात  असल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे माहितीच्या  स्रोताद्वारे आपणास अनुकूल अशी माहिती प्रसारित करून शत्रूविषयी नकारात्मक प्रतिमा तसेच आपल्या राष्टाविषयी नागरिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करणे  . याला  इन्फॉर्ममेशन वॉर म्हणतात . भारताकडून अश्या प्रकारच्या युद्धाला सामोरे जाण्यासाठी  रणनीती आखण्यात आलेली नाही अमेरिकेकडून  या प्रकारचे युद्ध लढण्यासाठी विशेष दल उभारले आहे चीन भारत सीमेवरील दृश्ये प्रसारित करत असताना हा प्रकार उघडकीस आला  इन्फॉर्ममेशन वॉर आणि सायबर वॉर या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत हे आपण लक्षात घेयला हवे 

चीन आपला शत्रू आहे त्याविषयी सांगितलेली माहिती आपणास आवडली असेल असे मानून सध्यापुरते थांबतो , जय हिंद 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?