असी आहे आपली एसटी !

 

   सध्या महाराष्ट्रात ज्या घडामोडींची चर्चा सुरु आहे, अस्या गोष्टींची यादी केल्यास,  आपणास एसटीचा क्रमांक अत्यंत वरचा ठेवावा लागेल. आपली एसटी ही जगातील एक अदभूत संस्था आहे. या एसटीकडून विविध प्रकारच्या 10प्रकारच्या बसेस चालवण्यात येतात. त्यातील एका प्रकारचे 5 उपप्रकार आहेत.एसटीची अदभुदता येथेच संपत नाही,इतर राज्यातील एसटी देत नाही, अस्या अनेक सवलती आपल्या एसटीकडून देण्यात येतात..एक जागरूक नागरीक म्हणून आपणास त्यास माहिती असणे आवश्यक आहे, चला तर मग जाणून घेवूया या सवलती.
एसटीकडून देण्यात येणाऱ्या काही सवलती विशिष्ट समाजघटकाला देण्यात येतात तर काही सवलती सर्वांना देण्यात येतात. सर्वप्रथम सर्वांना देण्यात येणाऱ्या सवलती बघूया.
     तर वयाची 65 वर्ष पुर्ण झालेल्या व्यक्तींना अर्ध्या तिकीटात प्रवास करता येतो. यासाठी आतापर्यत वयाचा
दाखला पुरेसा होता. ज्या साठी मतदार ओळखपत्र, डायव्हिंग लायसन्स, बँकेचे फोटो असलेले ओळखपत्र, पँन कार्ड, शालेय ओळखपत्र  असा सरकारमान्य कोणताही एक पुरावा आवश्यक होता. आता एसटीकडून ज्येष्ठ नागरिकांना विशेष कार्ड पुरवले जात आहे. ते दाखवून आता ही सवलत मिळेल.मी गुजरात राज्यात फिरायला गेलो असता तेथील एसटीच्या कंडक्टरकडून समजले की असी वयाची सुट त्याच्या एसटीकडून देण्यात येत नाही
    नेहमी एका विशिष्ट मार्गावर प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार व्यक्तींसाठी  प्रवासी भाड्यात एसटीकडून मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात येते. एक महिन्याचा पास घेतल्यास 20 दिवसांच्या भाड्यात 30 दिवस प्रवास करता येतो तर 50 दिवसाच्या भाड्यात 90 दिवस प्रवास करता येतो.म्हणजेच महिन्याचा भाड्यात 33%तर तीन महिन्याचा भाड्यात सुमारे 50% सुट ही एसटी महामंडळाकडून देण्यात येते. 
    एसटीकडून देण्यात येणारी अजून एक सवलत म्हणजे 4 आणि 7 दिवसांचा आवडेल तिथे प्रवास हा पास . या पासामुळे खुप मोठ्या प्रमाणात सवलत घेत फिरता येते. मी तीन वर्षापुर्वी या सेवेचा लाभ घेत गोवा दर्शन केले होते 4 दिवसाच्या पाससाठी मला 1100 रुपये लागले होते. जे माझ्या नाशिकहुन पणजी पर्यतचा एका बाजूच्या प्रवासातच वसूल झाले होते. दोन दिवसात गोवा बघून मी पणजीहुन नाशिकपर्यतचा प्रवास शद्बशः फुकट  केला होता. याखेरीज आपली एसटीची विविध पँकेजस् आहेत. त्याचा वापर केल्यास आपणास खाजगीच्या तूलनेत माफक दरात पर्यटनस्थळे बघता येतात. या सर्व सोयी सवलतीचा फायदा सर्वसाधरण कोणताही व्यक्ती घेवू शकतो. आता बघूया काही विशिष्ट समाजघटकांसाठी असणाऱ्या एसटीच्या सोयी सवलती.
तर विविध रोगाच्या आजारासाठी जाण्यासाठी रुग्णाला 100% आणि बरोबरच्या रुग्णाला 75%इतकी सुट एसटी आपणास देते. महारोग, कर्करोग, रक्ताचे काही विकार या प्रकारच्या रुग्णांसाठी ही सवलत देण्यात येते. तसेच दिव्यांगाना आणि त्यांना प्रवाश्यात साह्य करणाऱ्या व्यक्तींना प्रवाशी भाड्यात सुमारे 50%सुट देण्यात येते.
      बाहेरगावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या सुट्टीत घरी जाण्यासाठी ,आपल्या आजारी पालकांना भेटण्यासाठी , स्वतः आजारी झाल्यास त्याचा उपचारासाठी घरी जायचे असल्यास त्या विद्यार्थ्याला शिक्षण संस्थाचे विहीत प्रमाणपत्र दाखवल्यास 50% सुट देण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांचा सहलीसाठी शिक्षणसंस्थेने मागणी केल्यास त्यांना 50%सुट देण्यात येते.
शासनाचे विविध पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींना प्रवासी भाड्यात 50%पर्यत सुट मिळते. तसेच पंढरपूरच्या आषाढी पुजेच्या मानकरी ठरलेल्या दांम्पत्यास पुढील वर्षभर एसटीतून एकही पैसा न देता मोफत प्रवास करता येतो.तसेच दुसऱ्या गावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घरचा डब्बा मिळावा, यासाठी एसटीकडून मोफत डब्याची सेवा पुरवली जाते.
या खेरीज आपल्या एसटीकडून विविध सेवा पुरवल्या जातात.मी वर सांगितलेल्या सेवा उदाहरणा दाखल आहेत. आपली एसटीची सध्याची विपन्नावस्था दूर होवून आर्थिक सुब्बता मिळावी, असी मनोकामना  करत सध्यापुरती आपली रजा घेतो, नमस्कार!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?