ब बुद्धिबळाचा (भाग 14)

           

 भारतीय पुरुष क्रिकेटपटूंनी भारतीयांची कितीही निराशा केलेली असली तरी भारतीय बुद्धिबळपटू मात्र सातत्याने भारतीयांची मान उंचावत ठेवण्याची कामगिरी करत आहे .   नागपूरच्या रहिवाशी असणाऱ्या दिव्या देशमुख यांनी १३ ऑक्टोबर रोजी  भारताची २१ वी वूमन  ग्रँडमास्टर होण्याची कामगिरी केल्यावर  महिना होत नाही तोच भारताला दोन ग्रँडमास्टर मिळाले आणि भारताची ग्रँडमास्टरची संख्या ७२ झाली . ७ नोव्हेंबरला सायंकाळी भारताला संकल्प गुप्ता हा ७१ वा ग्रँडमास्टर मिळाल्याची बातमी ताजी असतानांच किंबहुना एका दिवसाच्या अंतराने ९ नोव्हेंबर रोजी  भारताला मित्रभा गुहा हा ७२वा ग्रँडमास्टर मिळाल्याची बातमी  आली, आणि भारतीयांच्या आनंदाला स्वर्ग दोन बोटे शिल्लक राहिला . 
      ७ नोव्हेंबर रोजी  रहिवाशी असणाऱ्या संकल्प गुप्ता या बुद्धिबळपटूने सर्बिया या देशातील अरंडजेलोवाक  ( Arandjelovac) या शहरात सुरु असणाऱ्या GM Ask 3 round-robin event या स्पर्धेत साडेसहा गुणांसह दुसरा
संकल्प गुप्ता 

क्रमांक पटवत ग्रँडमास्टर पद मिळवण्यासाठीचा आवश्यक असा  तिसरा आणि अंतिम निकष पूर्ण केला आणि ग्रँडमास्टर किताबाला गवसणी घातली . १८ वर्षीय संकल्प गुप्ता यांनी फक्त २४ दिवसात तीन स्पर्धेद्वारे ग्रँडमास्टर पदासाठीचे निकष पूर्ण केले  विशेष.   या तीन स्पर्धेदरम्यान त्यांनी २५९९ इतके इलो रेटिंगसुद्धा मिळवले ग्रँडमास्टर हा बुद्धिबळाची आंतराष्ट्रीय संघटना फेडरेशन इंटरनॅशनल दि इचेस अर्थात फिडेकडून खेळाडूंच्या कामगिरीचा सम्मान करण्यासाठीचा देण्यात येणारा 'किताब असतो . जो तीन निकष आणि २५०० इलो रेटिंग पूर्ण करणाऱ्या खेळाडूला देण्यात येतो जो आयष्यभरासाठी देण्यात येतो संकल्प गुप्ता यांनी नऊ फेऱ्याच्या या साखळी स्पर्धेत ५ विजय तीन बरोबरी आणि एक पराभव यांच्यासह स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला 
       भारताला ७१ व ग्रँडमास्टर मिळाल्याचा नादंड कश्या प्रकारे साजरा करायचा याबबाबत बुद्धिबळप्रेमी नियोजन करत असताना ९ नोव्हेंबर रोजी दुपारी कोलकत्ता शहराचा निवासी अस्नणाऱ्या मित्रभा गुप्ता हे भारताचे ७२वे ग्रँडमास्टर बनल्याची बातमी आली आणि बुद्धिबळप्रेमींच्या आनंद गगनात मावेनासा झाला . मागितला एक डोळा दव देतो दोन अशी काहीशी स्थिती भारतीय बुद्धिबळपटूची झाली 
तर मित्रानो ९ नोव्हेंबर रोजी मित्रभा गुहा यांनी भारताचा ७२वा  ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला त्यांनी सर्बिया या देशातील नोवी (Novi ) या शहारत सध्या सुरु असणाऱ्या GM Third Saturday Mix 220 tourney या स्पर्धेत  किताबासाठी आवश्यक असणारा तिसरा निकष पूर्ण केला  सर्बिया या आयोजक देशाच्या Nikola Sedlak या ग्रँड मास्टरला नवव्या फेरीत नमवून या १८ वर्षीय खेळाडूने ग्रँडमास्टर पद स्वतःच्या खिश्यात घातलेत्यांनी या ९ फेरीच्या स्पर्धेत  ६ विजय दोन बरोबरी तर एक पराभव अशी कामगिरी केली आणि संकल्प गुप्तता नंतर दोन दिवसाच्या
मित्राभ गुहा 
आता भारतीयांना पुन्हा एकदा सुखद धक्का दिला त्यांनी पंधरवाड्यापुर्वीच बांगला देशातील 
Sheikh Russel GM tournament स्पर्धेत  ग्रँडमास्टर पदासाठीचा दुसरा निकष पूर्ण केला होता तसेच ग्रँडमास्टर पदासाठी आवश्यक असणारा २५००इलो रेटिंगचा टप्पा देखील पार केला 
भारतीयांना गेल्या सहा महिन्यात तीन  ग्रँडमास्टर एक वूमन ग्रँडमास्टर आणि एक बुद्धिबळ विश्वचषकात अभिमानास्पद कामगिरी करत भारतीयांना खूप आनंद दिला आहे त्याच्यात सातत्याने  व्हावी अशी मनोकामना करत सध्यापुरते थांबतो ज्या हिंद 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?