एसटी संपामुळे होरपळणारे दुर्लक्षित घटक

       

  सध्या सुरु असणारा एसटी कर्मचाऱ्यांचा  संप चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे ९०च्या दशकांत ज्याप्रमाणे मुबईतील गिरणी कामगारांचा संप गिरणीविश्व ज्या प्रमाणे उद्धवस्त करून गेला त्या प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा संप एसटीला पूर्णतः संपवून टाकेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे . माध्यमांमध्ये या संपविषयी ज्या बातम्या प्रसिद्ध करण्यात येत आहे, त्यामध्ये या संपामुळे प्रवाश्यांना होणारा त्रास,  एसटीचे बस बंद असल्यामुळे होणारे आर्थिक  नुकसान या विषयी भरभरून बोलले गेले , अजूनही बोलले जात आहे . मात्र या सर्व गदारोळात एक घटक मात्र काहीश्या दुर्लक्षिला गेला, ज्या घटकावर फारच थोडे बोलले गेले , तो घटक म्हणजे  बस स्थानकाच्या परिसरात  विक्री करणारे विक्रेते तसेच परिसरात असणाऱ्या हॉटेल लॉज चालकांचे होणारे नुकसान . 
      कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे आधीच लोकांचे पर्यटन  बंद झाले असताना , जे थोडेफार लोक बसचा वापर करत होते ते सुद्धा या संपामुळे एसटीपासून दुरावले . परिणामी आजमितीस या बस्थानकांच्या आसपासच्या परिसरात असणाऱ्या हॉटेल लॉज चालकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे .त्यांना आपल्या कामगारांचे पगार देण्यास देखील अडचण येत आहे अनेकांनी आपल्या अनेक कामगारांना घरचा रस्ता दाखवला आहे . परिणामी त्यांच्या घरची चूल काही काळासाठी का होईना विझली आहे . एसटीचा संप संपल्यावर सर्व व्यवहार सुरळीत झाल्यावर हे
हॉटेल लॉज चालक परत या कामगारांना कामावर घेतील ही मात्र आजमितीस हा मजकूर लिहीत असताना त्यांच्या घरची चूल विझली आहे हे नक्की . 
       त्यांच्या सारखीच किंबहुना त्यांच्याहून वाईट स्थिती बसस्थानकावर विक्रीस बसणाऱ्या विक्रेत्यांची झाली आहे मी एसटीच्या आवडेल तिथे प्रवास या योजनेच्या फायदा घेत बऱ्यापैकी महाराष्ट्र बघितला आहे माझ्या या सर्व प्रवाश्यात मला सर्व ठिकाणी आढळलेली गोष्ट म्हणजे अत्यंत किरकोळ स्वरूपाचे सामान विकणाऱ्या व्यक्ती . बसच्या जेमतेम तीन ते पाच मिनिटाच्या थांब्यात मी बसमध्ये किमान चार ते सहा विक्रेते नेहमीच बघायचो . रोजचे सामान विकून त्यातील कित्येकांची चूल पेटत असे . जर एखाद्या दिवशी फारसे सामान विकले गेले नाही तर त्यातील कित्येकांची चूल शांत राहील अशी स्थिती असे .एसटीच्या संपामुळे या सर्वांच्या रोजगारावर प्रचंड परिणाम झालेला आहे 
       काही जण या मध्ये रिक्षाचालकांचा देखील समावेश करावा असे सांगतील ,मात्र इतर दैनंदिन व्यवहार सुरु असल्यामुळे रिक्षाचालकांवरील परिणाम या घटकांच्या तुलनेत काहीसा कमी आहे 
एसटीचा संप या सर्वांसाठी आणि सामान्य गोर गरीब जनतेसाठी खासगीकरण ना होता मिटणे आवश्यक आहे कारण ज्या मार्गावर कोणताच खासगी व्यवसायिक सेवा देणार नाही अश्या अनेक मार्गावर आपली एसटी सेवा देते जर एसटीचे नियंत्रण खासगी व्यक्तीच्या हातात गेल्यास या मार्गांबाबत फायद्याचा विचार करून निर्णय होऊ शकतो जे कोणालाही परवडणारे नाही त्यामुळे एसटीचा संप विनाविलंब कर्मचाऱ्यांचा मागण्या मान्य करून मिटवा अशी ईश्वराचरणी प्रार्थना करून आजपुरती आपली रजा घेतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?