बुद्धिबळाचे मानसशास्त्र (भाग २ )

     


      यशस्वी होणाऱ्या खेळाडूंमध्ये असाधारण गुणवत्ता असते. बुद्धिबळातील गुणवत्ता प्राप्त करताना असाधारण खेळाडू चटकन अथवा कमी वेळेत आणि सहजनतेने कौशल्य प्राप्त करतो . खेळाडू घडवताना प्रशिक्षकाने नकारात्मक विचार ठेवल्यास, खेळाडू घडवता येत नाही खेळाडूला नियमितपणे सकारत्मक विचारांशी जोडीनं घ्यावे लागते . येत नाही, जमत नाही, समजत नाही या गोष्टींना हद्दपार करावे लागते. कुठलाही खेळाडू सुरवातीलाच योग्य निर्यय घेऊ शकत नाही . टप्या टप्याने परिस्थितीचा ( Position) चा अभ्यास करवून घ्यावा लागतो . 

  या प्रक्रियेत मोठी  महत्वपूर्ण आणि महत्तपूर्ण जवाबदरी प्रशिक्षक पार पडतो . खेळाडू आणि पालकांशी नियमित संवाद साधने खेळाडूंच्या कमतरता शोधून त्यावर काम करणे , खेळाडूंची जिज्ञासावृत्ती वाढवणे त्यास नवनवीन ज्ञान उपलब्ध करून देणे ही जवाबदारी प्रशिक्षकाची असते. कोचेबीलिरी हा एक महत्त्वपूर्ण गुण खेळाडूंमध्ये असावयास हवा ,

           योग्य तसेच जाणकार प्रक्षिक्षकाकडून खेळाडूने प्रक्षिशण घेतल्यास खेळाडू पुढे जाऊ शकतो . प्रक्षिशकावर विश्वास ठेवल्यास खेळाडूंच्या दर्जा वाढण्यास प्रगती होण्यास मोलाची मदत होते . खेळाडूंच्या आत्मविश्वास वाढवणे हे वाटते तितके सोपे नाही खेळाडूत न कळत हा गुण वाढविला गेला पाहिजे, त्यासाठी खेळाडूची मानसिकता

प्रशिक्षकास माहिती असावयास  हवी . भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे खेळाडूं सुरवातीला हरल्यावर  अश्यावेळी काय करायला पाहिले हे माहिती असणे आवश्यक आहे . 

  अनेकवेळा खेळाडू हरल्यावर त्या वेळेस पालकांची आणि  प्रशिक्षकाने तारतम्य बाळगायला हवे .या परिस्थितीत त्यास हरण्याबाबबत बोल लावणार असू , काही प्रसंगात मारणार असू तर खेळाडू पुढे जाणारच नाही या गोष्टी अयोग्य आहेत याउलट मुलांबरोबर डाव लावून डावातील चुका किंवा योगय खेळ्या त्यास सांगितलेल्या पाहिजे खेळलेल्या डावाची फाईल तयार करणे त्यात जिंकलेले डाव एका फाईलमध्ये, तर हरलेले डाव दुसऱ्या फाईलमध्ये ठेवायला हवे .दोन्ही डावाचा अभ्यास करून त्याचा नोट्स तयार कराव्यात आणि डावाबरोबर ठेवाव्यात  स्पर्धेची तयारी करताना स्पर्धेच्या आधी जिंकलेले डाव लावून बघावेत , असे केल्याने आत्मविश्वास  वाढतो . 

बुद्धिबळ खेळाडूस चिकाटी आणि स्मरणशक्ती का आवश्यक आहे ? हे आपण पुढच्या भागात  बघूया तो पर्यंत सर्वांना  नमस्कार 


सुनील शर्मा  (लेखक नाशिमधील सर्वात जुने बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत गेल्या ४५ वर्षांपासून ते बुद्धिबळ खेळाडू घडवत आहे  त्यांनी आजपर्यंत .ग्रँडमास्टर विदित गुजराथी सह अनेकांना त्यांनी घडवले आहे आज ते  बोटवानीक चेस स्कुलच्या माध्यमातून बुद्धिबळ प्रशिक्षण देत आहेत )  

शब्दांकन अजिंक्य तरटे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?