बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग3)

     

आतापर्यत एखाद्या बुद्धीबळपटुला यशस्वी होण्यासाठी आणि प्रशिक्षकाला यशस्वी खेळाडू घडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मुलभुत गुणांची प्राथमिक माहिती करुन घेतली. या  भागात आपण बुद्धीबळपटूस जिद्द चिकाटी आणि  स्मरणशक्ती हे गुण का आवश्यक आहे ,हे बघूया .
               चिकाटी अथवा जिद्द हा गुण अनन्यसाधरण आहे. कोणत्याही खेळाडूस जिंकण्यासाठी या गुणांची आवश्यकता असते.पी  सि ए चँम्पियनशीपमध्ये  काँस्पराव विरुद्ध आनंद हे समोरासमोर विश्वविजेतेपदासाठी  एकमेकांच्या समोरसमोर उभे ठाकले असताना, शेवटच्याः डावात जो जिंकेल तो विश्वविजेता बनणार असी स्थिती उत्पन झाली. त्यावेळेस त्या सामन्यादरम्यान काँस्पाराव खेळी केल्यावर भिंतीवर बुक्के आणि दरवाज्याला लाथा मारत असे, शेवटी तो जिंकला. विश्वविजेते झाल्यावर आयोजीत पत्रकार परीषदेत पत्रकारांनी त्याचा आंतीम सामन्यातील वर्तणूकीविषयी विचारणा केल्यावर त्याने सांगितले,"मी माझ्यातील विजूगुषीवृत्ती दरवाज्यावर लाथा आणि भिंतीवर बुक्के मारुन जिवंत ठेवत होतो, विजूगुषीवृत्ती जिवंत ठेवल्यामुळे मी जिंकलो.
     चिकाटी हा गुण खेळाडुत असणे अत्यंत महत्तवाचे आहे. या गुणांबरोबरच  चांगली स्मरणशक्ती असणे अत्यंत आवश्यक आहे. डाव लक्षात ठेवणे, सुसुत्रता (पँटर्न) लक्षात ठेवणे, या गोष्टी कोणत्याही खेळडूने यशस्वीतेसाठी आवश्यक आहे. स्मरणशक्ती उत्तम असणेबाबत पुकाला नँजडार्फ बाँबी फिशर  यांचे उदाहरण देण्यात येते.पुकाला नँजडार्फ एकदा एका अभियंत्रीकीच्या महाविद्यालयात 25 खेळाडुंशी एकाच वेळी खेळले , त्यांनी सर्वच्या सर्व डाव
जिंकले.दुसऱ्या दिवशी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी त्यांना भोजनासाठी बोलावले.  आदल्या दिवशी जे विद्यार्थी नँजडार्फ यांच्याशी खेळले होते त्यांना देखील बोलवले त्यावेळेस नँजडार्फ यांनी सर्व 25खेळाडूंचे डाव लावून त्यातील कमतरता सांगितल्या.
          बाँबी फिशर यांच्या बाबत बोलायचे झाल्यास 1971झाली  कँनडात एका स्पर्धेदरम्यान एक नावाजलेल्या खेळाडूने बाँबी फिशर यांना 1958 साली माँस्कोत  आपण आला होतात, त्यावेळी आपण अनेकांशी खेळला होतात.त्यामध्ये मी देखील होतो,असे सांगितले.उत्तरादाखल हो मी तूम्हाला ओळखले, त्यावेळी तूम्ही फ्रेंच डिफेन्स खेळला होता आणि त्यात मी जिंकलो होतो, असे सांगत तो डाव  अचूकपणे लावून दाखवला.
         चिकाटी, अधीर न होणे, पराभवची भावना निर्माण न होवू देणे,मनाचा ठाम निर्धार असणे या गुणांचा जो खेळाडू अंगीकार करतो तो खेळाडू हमखास विजयी होतो 

सुनील शर्मा  (लेखक नाशिमधील सर्वात जुने बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत गेल्या ४५ वर्षांपासून ते बुद्धिबळ खेळाडू घडवत आहे  त्यांनी आजपर्यंत .ग्रँडमास्टर विदित गुजराथी सह अनेकांना त्यांनी घडवले आहे आज ते  बोटवानीक चेस स्कुलच्या माध्यमातून बुद्धिबळ प्रशिक्षण देत आहेत )  

शब्दांकन अजिंक्य तरटे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?