साहित्य संमेलन!

   


डिसेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात नाशिकला ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु होणार आहे त्यासाठी नाशिकला जोरदार तयारी सुरु आहे . नुकतेच हे संमेलन ज्या ठिकाणी होणार आहे ,त्या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील झाला . त्यावेळी या ठिकाणी कोण कोण विशेष मान्यवर उपस्थित रहाणार आहेत ?याची कार्यक्रम पत्रिका  देखील प्रसिद्ध करण्यात आली आणि काहिस्या शांत झालेल्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले .राजकीय विचारसरणीबाबत   काहीसे वादग्रस्त  मत प्रदर्शन करणाऱ्या एक व्यक्तीला आमंत्रण देण्यावरून एका जातीच्या संघटनेने प्रचंड विरोध केला आहे . त्यांचे मराठी साहित्यातील योगदान काय ? सदर व्यक्ती परभाषिक असून त्यांच्या कार्यक्रमांच्या वेळी सदर व्यक्ती कोणत्याच मराठी साहित्यिकाला बोलवत नाही तरी आपण का बोलवायचे ? असा युक्तिवाद त्यांना विरोध करण्यासाठी केला जात आहे . 

माझ्या मते जे पूर्णतः अयोग्य आहे . साहित्यिकाला आमंत्रित करण्यासाठी भाषेचे बंधन असायला नको . कोणत्याही भाषेचा असला तरी साहित्यिकाला साहित्य संमेलनाचे दरवाजे बंद असायला नको . सध्या ते आपणस त्यांच्या साहित्यविषयक कार्यक्रमास बोलवत नसले तरी, त्याना आपण बोलवायला हवे . कदाचित ते सुद्धा मराठी भाषिकांबाबत हाच विचार करत असू शकतात , की मराठी भाषिक इतके मोठे साहित्य संमेलन करतात मात्र आपल्यास बोलवत नाही मग आपण का त्यांना बोलवायचे ? जर आपणास हे चक्र भेदायचे असल्यास कोणीतरी पुढाकार घेणे आवश्यक आहे . महाराष्ट्ट्राने अनेक सामाजिक सुधारणांच्या बाबतीत देशात पुढाकार घेतला आहे

तसा या बाबतही घेयला हवा असे मला वटते . यामुळे मराठीतील असामान्य बाल साहित्यिक मात्र दुर्दैवाने ज्यांना एकाच पुस्तकात बंदिस्त करण्यात आले आहे असे साने गुरुजींनी मांडलेली (साने गुरुजींना श्यामची आई या एकाच पुस्तकात बंदिस्त करण्यात आले आहे मात्र त्यांनी विपुल स्वरूपात बाल साहित्य लिहले आहे )भाषा भगिनी ही संकल्पना मोठ्या प्रमाणात वास्तव्यास येण्यास हातभार लागेल  काही महिन्यापूर्वी एनडीटीव्ही या वृत्त वाहिनीवर हिंदी भाषेविषयी कार्यक्रम बघत असताना त्या ठिकाणी हिंदीला इंग्रजीचा धोका असल्यांचा मुद्दा विशेष चर्चिला गेला होता आपणही मराठीला इंग्रजीचा धोका असल्याचे सांगताच आहोत ,त्या पार्श्वभूमीवर सामान धोका असल्याने माझंजयामाते साने गुरुजींच्या भाषा भगिंनीची तेव्हा  होती त्या पेक्षा अधिक गरज आता असल्याचे मला वाटते  आपल्या मराठीतील  रुळलेल्या सुनीत.गझल  सारख्या अनेक संकल्पना मूळच्या अन्य भाषेतील आहे  मात्र आजमितीस त्या मराठीत पूर्णतः समाविष्ट झाल्या आहेत तसेच ती फुलराणी , नटसम्राट सारख्या मराठीतील सुप्रसिद्ध कलाकृती  या अन्य भाषेतील साहित्यकृतींवर आधारित आहे याचे कारण त्यावेळच्या मराठी भाषिकांनी अन्य भाषिकांना आपल्यात सामावून घेतले इतर भाषिकांना सामावून घेतल्यास भाषा समृद्धच होते त्यामुळे ते आपल्या कार्यक्रमात समाविष्ट करत नाही आपण का करायचे हा मुद्दाच गैरलागू आहे माझ्यामते मराठीत्तर भाषिकांना बोलववणे ही चांगली गोष्ट आहे आणिकोणत्याही चांगल्या गोष्टींना विरोध तो का करावा 

राहिला मुद्दा त्यांच्या विचारधारेचा तर माझ्या मते व्यक्तीला विचारधारा असणारच माझे हे  लेखन वाचणाऱ्यास देखील काहीतरी विचारधारा असेल . पण हे साहित्य संमेलन आहे त्यामुळे व्यक्तीच्या विचारधारा वगळून त्याचे साहित्य क्षेत्रातील योगदान बघूनच त्यास आमंत्रित करायचे का ? याचा विचार करायला हवा .तो बहुसंख्यांच्या विचारधारेच्या विरुद्ध विचारधारा जोपासतो यावर त्याला साहित्य संमेलनाला येऊ देण्याचे की नाही याचा निर्णय घेणे पूर्णतः अयोग्य आहे असे मला वाटते काही दिवसापूर्वी एका ज्येष्ठ मराठी कलाकाराने आपली राजकीय विचारधारा उघड करणारी मते प्रदर्शित केली होतीच मग ती मते पटली नाहीत म्हणून त्यांचे कला क्षेत्रातील योगदान अव्हेरने कितपत योग्य आहे .  अर्थात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याच प्रमाणे  याचा विरुद्ध मत देखील असू शकते हे मला माहिती आहे 

येणारे साहित्य संमेलन यशस्वी ठरो  अशी मनोकामना करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?