नवे संकट सामोरी !

     

    महाराष्ट्राचा अनेक भागात बेमोसमी पावसाने आकांडतांडव सुरू केले आहे.  आपणच तयार केलेले  भाषा , धर्म , जाती, राज्य, देश , श्रीमंत, गरीब हे भेद विसरुन हवामान बदलाविषयी ठोस काहीतरी करण्याची गरज यामुळे पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे. गेल्या दिड वर्षाच्या आढावा घेतल्यास जगभरात आपणास लहरी हवामानाचा फटका बसल्याचे वारंवार दिसून आले आहे. तसेच दुसऱ्याचा अनुभवातून शहाणे न होता स्वतःला फटका बसल्याशिवाय शहाणपण न येण्याची वृत्ती देखील दिसून येत आहे. जे वाईट आहे.
जगात काय चाललंय ?याचा कानोसा न घेता स्वतःच्याच विश्वात रममाण होण्याची किंमत भारताने इतिहासात अनेकदा भोगली आहे. मात्र त्या इतिहासातुन बोध घेत भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करण्यात आपण कमी पडतोय. गेल्या दिड वर्षात जगभरात विविध प्रदेशात लहरी हवामानाच्या अनेक घटना घडल्या,मात्र त्यातून बोध घेत आपल्याकडे असे काही झाले तर ? काय करायचे याबाबत आपण काहीच कार्यवाही केली नाही. परीणामी आज शेतकऱ्यांना जगण्यापेक्षा मरणं स्वस्त झालंय।
     गेल्या काही वर्षापासून आपणास बेमोसमी पावसाचा वारंवार फटका बसतोय.मात्र शेतकऱ्यांना तात्पुरती नुकसान भरपाई देण्यातच धन्यता मानली जात आहे या तात्पुरत्या मदतीबरोबरच या लहरी हवामानात तग धरतील अशी पिकपद्धती शेतकऱ्यांचा बांधावर कशी येईल? याबाबत अधिक व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे. 
       जगभरात अनेक देशांच्या निवडणूकीत राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात आम्ही हवामान बदलाविषयी हे करू, ते करु , अशी आश्वासने असतात.भारतातील कोणत्या राजकीय पक्षाच्या जाहिरनाम्यात ही आश्वासने
असतात. जर्मनीमध्ये काही दिवसांपूर्वी सत्तेत आलेल्या आघाडीमध्ये पर्यावरणरक्षणासाठी कटीबद्ध असणारा पक्ष आहे. आपल्या भारतात काय स्थिती आहे? हे आपण जाणतातच. हवामान बदलाविषयी अनेक संस्था त्यांच्यापरीने प्रयत्न करत आहेतच. मात्र कोणत्याही लोकशाहीप्रधान देशात शासनस्तरावर जेव्हा एखादा मुद्दा चर्चेत येतो, तेव्हा त्यास अधिक धार येते. या पातळीवर आपणाकडे किती अनास्था आहे?हे आपण जाणताचं अमेरीकेत डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते अल् गोर यांनी सरकारविरोधात हवामान बदलाविषयी भुमिका.घेवून मोठी जनजागृती केली.आपल्याकडे कोणता राजकीय नेता असे काम करतोय? युके ( ज्याला आपल्या मराठीत सर्वसाधरणपणे इंग्लड म्हणतात) या देशात आम्ही हवामान.बदलासाठीच कार्य करु असे म्हणत "ग्रीन पार्टी" नावाचा राजकीय पक्ष उदयास आला आहे. ज्याला मोठ्या प्रमाणावर जनाधार सुद्धा मिळत आहे. अनेक पुर्व युरोपिय देशांमध्ये तसेच अमेरीकेच्या अनेक राज्यात हवामान.बदलांकडे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनांदोलने सुरु आहेत. आपल्याकडे आंदोलने कोणत्या विषयावर होतात? हे जगजाहीर आहे. 
पावसामुळे झालेल्या धान्याचा नुकसानीवर प्रक्रिया करुन मद्यनिर्मिती सारख्या प्रकल्पांना आपण चालना देणे आवश्यक आहे. कारण पावसामुळे होणाऱ्या धान्यांचा नुकसानीबद्दल भरपाई देण्यासही काही मर्यादा आहेत.सध्याचा लहरी हवामानाच्या घटना बघता यापुढे वाढतच जाणार आहेत.तेव्हा नुकसान भरपाई देण्याबरोबर  असी पर्यायी व्यवस्था उभारणे अत्यावश्यक आहे. तर आणि तरच हा बळीराजा टिकेल!  या लहरी निसर्गला यशस्वी तोंड देऊ! शकेल हे नक्की !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?