बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग5)

   


  मागील भागात पालकांची भूमिका आपण बघितली . आता प्रथमावस्थेतील प्रशिक्षकाची भूमिका बघूया . पहिल्या प्रशिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असते . खेळाडूच्या खेळाला आकार देण्याचे काम या प्रशिक्षकाला करावे लागते . ज्यामध्ये खेळाडूंची सकारात्मकता , खेळाचे कौशल्य वाढविणे , खेळाची शिस्त निर्माण करणे , खेळाविषयीची भीती घालवणे . हॉल मधील भीती तसेच त्याच्या वर्तनावर लक्ष देण्याचे कार्य या  गोष्टींचा  अंतर्भाव होतो . 

सतत तक्रार करणे , सामना हरल्यावर कारणे सांगणे , हॉलमध्ये इकडे तिकडे अथवा इतरांचे डाव बघणे , काही कारणामुळे मानसिक तोल जाणे तसेच हरल्यानंतर चिडचिड करणे , खेळताना निराश होणे , अश्या  खेळाडूंच्या अनेक सवयीचा  स्वभावाचा  तसेच या सारख्या मनोशारीरिक घटकांचा अभ्यास करत खेळाडूला घडवण्याचे  प्रशिक्षकाला करावे लागते 

बुद्धिबळ येणं आणि बुद्धिबळ समजणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत . बुद्धिबळ प्रशिक्षकाला आपल्या खेळाडूला बुद्धिबळ समजावतात आले पाहिजे . तर आणि तरच चांगला खेळाडू घडवता येतो . वेळोवेळी चांगली

खेळी केल्यावर किंवा  कोडे सोडवल्यावर त्याला प्रॉत्साहित केले पाहिजे . खेळाडूच्या पालकांशी चर्चा करून त्याच्या कमकुवत बाबी दूर करण्याचे प्रयत्न केले पाहिजे . पुस्तकांची आवड निर्माण केल्यास खेळाडूचा संयम तसेच त्याची प्रगल्भता वाढवण्यास मदत होते . अभ्यासूवृत्ती वाढवण्यास पुस्तक मदतच करतात . याबबाबत माझ्याकडे शिकलेल्या दोन खेळाडूंचा अनुभव आपल्या समोर मांडावासा वाटो पहिला खेळाडू अर्थातच सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी आहे .विदतिने वेळोवेळी आपल्या मुलाखतीत सांगितले आहे की, मला पुस्तकांची आवड माझ्या पहिल्या प्रशिक्षकाने लावली . मी एकदा त्र्यास काही पुस्तके वाचवावयास दिली . त्याने सर्व पुस्तके ,महिन्याभरात वाचून परत दिली दुसऱ्या खेळाडूला देखील  काही  पुस्तके मी दिली सुमारे सहा महिन्यानंतर पुस्तके मागितल्यावर त्याने परत देखील आणून दिली परंतु खेदाने  लागते की , त्याने एकही पुस्तक वाचले नव्हते . आणि काही काळानंतर त्यांने बुद्धिबळला देखील राम राम ठोकला 

पुढील भागात यशस्वी खेळाडूला आवश्यक असणाऱ्या गुणाबाबत माहिती घेउया

लेखक

सुनील शर्मा  (लेखक नाशिमधील सर्वात जुने बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत गेल्या ४५ वर्षांपासून ते बुद्धिबळ खेळाडू घडवत आहे  त्यांनी आजपर्यंत .ग्रँडमास्टर विदित गुजराथी सह अनेकांना त्यांनी घडवले आहे आज ते  बोटवानीक चेस स्कुलच्या माध्यमातून बुद्धिबळ प्रशिक्षण देत आहेत )  

शब्दांकन अजिंक्य तरटे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?