गोव्याची भरारी !


गोवा , महाराष्ट्राचा दक्षीणेकडील छोटेसे राज्य, भारत ब्रिटीशांपासून स्वतंत्र्य झाल्यावर 14वर्षांनी पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झालेले, ज्याचा स्वातंत्र्य लढ्याविषयी महाराष्ट्र एस.स.सी. अभ्यासक्रमामध्ये भारतातीलच स्वातंत्र्य लढा असून देखील फारच कमी उल्लेख आहे (तसे त्या अभ्यासक्रमात  ब्रिटीशाविरोधातील स्वातंत्र्य लढ्याविषयी असणाऱ्या माहितीचा तूलनेत फक्त गोवाच नाही तर दमण-दिव पाँडेचरी, दादरा नगरहवेली यांच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी  फारसे  शिकल्याचे मला आठवत नाही.) ख्रिस्ती समाजबांधवांची मोठ्या प्रमाणात वस्ती असून देखील कोणत्याही धार्मिक वादाच्या केंद्र नसणारे , (या उलट इशान्य भारत) एक शांतताप्रिय ,पर्यटनस्नेही राज्य म्हणजे गोवा.
     तर असे हे गोवा राज्य वेगाने इलेक्ट्रॉनिक बसेसकडे जात आहे. गोव्याचा वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्यांनी ही गोष्ट सिद्ध होत आहे. नुकतीच गोवा राज्याची एसटी बस असणाऱ्या कदंब ट्रान्सपोर्ट मध्ये 100इलेक्ट्रॉनिक बसेस घेण्यास मंजूरी देण्यात आली.ocraa या कंपनीच्या या बसेस आहेत. या शिवाय 500बसेस कंदबमध्ये समाविष्ट करण्याचा हालचाली सुरु झाल्याचे गोव्यातील वृत्तपत्रे बघीतल्यास दिसून येते. आजमितीस गोवा राज्याचा एसटीत (कदंब
ट्रान्सपोर्ट) 50इलेक्ट्रॉनिक बसेस वापरात आहे. सार्वजनिक परीवहन सेवेत इलेक्ट्रॉनिक बसेस वापरणारे गोवा हे देशातील पहिले राज आहे. कदंब ट्रान्सपोर्ट(गोव्याची एसटी) या बसेस राज्यांतर्गत तसेच आंतरराज्य मार्गावर चालवणार असल्याचे गोव्यातील परीवहन मंत्र्यांनी जाहिर केल्याचे गोव्यातील वृत्तपत्रातून दिसून येत आहे. महाराष्ट्राची एसटी शिवाई या ब्रँडनेम अंतर्गत काही मार्गावर इलेक्ट्रॉनिक बसेस चालवणार असल्याचे जाहिर करण्यात आले होते. कोणत्याही सार्वजनिक परीवहन सेवेने असी घोषणा करण्याची ती देशातील पहिली वेळ होती.मात्र आपण नियोजनातच अडकलो ,आणि गोव्याने बाजी मारली.
     जो काळाची पाउले ओळखून वाटचाल करतो, तो जगात यशस्वी होतो, असे सुप्रसिद्ध वचन आहे. कोणतेही  क्षेत्र नविन असताना त्यामध्ये प्रवेश केल्यास यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. वाहन उद्योग क्षेत्रातील जाणकरांचा मते वाहन उद्योगातील भविष्य हे इलेक्ट्रॉनिक वाहनांचे असेल.सध्या बाल्यावस्थेत असणारे हे क्षेत्र पुढे मोठी बाजी मारणार आहे. जगात बदलत्या हवामानामुळे नैसर्गिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांबाबत प्रतिकूल मत बनत चालले आहे. त्या पार्श्वभूमीवर याकडे बघायला हवे.
गोव्यात दोनच जिल्हे आहेत. महाराष्ट्रात एका जिल्ह्यात साधरणतः 10ते 12 आगर असतात. तोच न्याय गोव्याचा एसटीला लावल्यास कदंबचे 25च्या आसपास आगर असू शकतात. आगरांची संभाव्य संख्या बघता आताचे कार्यरत 50 भविष्यातील 100 आणि संभाव्य 500 बसेसचा विचार करता , ही घोडदौड असीच चालू राहिल्यास गोव्याची एसटी अर्थात कदंस ट्रान्सपोर्ट देशातील पहिले संपुर्णतः इलेक्ट्रॉनिक बसेस चालवणारा सार्वजनिक परीवहन उपक्रम बनू शकतो. 
      याचा विचार करता आपले महाराष्ट्र राज्य याबाबत खूपच मागे असल्याचे दिसत आहे. गुजरातने त्यांचा काही एसटी सिएनजीवर चालवून दाखवल्या आहेत.(गुजरात एसटीच्या पांढऱ्या रंगातील बसेस) याही बाबत आपणास मोठा टप्पा गाठायचा आहे. देशातील इतर एसटीना एकेकाळी दिशा दाखवणाऱ्या आपल्या एसटीची ही पिछेफाट
गौरवास्पद नाही. एकेकाळी केंद्र सरकार आपल्या महाराष्ट्र एसटीचा दाखला इतर एसटीला देत असे, बघा महाराष्ट्र एसटी असे करु शकते, तर तूम्ही का ते करत नाही? असी विचारणा केंद्र एकेकाळी इतर एसटीला करत असे. देशाला आरामदायी बसप्रवाश्याची ओळख आपल्या एसटीने करुन दिली होती.त्या पार्श्वभूमीवर हे अपयश वाईटच .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?