बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग6)


बुद्धिबळ हा खेळ जसा दिसतो , तितका सोपा नाही. कारण हा खेळ मानसिक आहे. विचार म्हणजेच मन असते. यामुळे आपली मानसिक वैचारिक  स्थिती कशी आहे ? यावरून खेळाडूला बुद्धिबळात किती यश मिळणार ?  हे निश्चित होतेबुद्धिबळात एकच खेळ तीनदा खेळावा लागतो, पहिल्यांदा खेळाची सुरवात करताना अर्थात ओपनींगला , त्यानंतर मिडलगेम आणि तिसऱ्या टप्यात एन्ड गेमच्या वेळेस खेळाडूला खेळावे लागते . या तिन्ही वेळेचा चांगला अभ्यास करून खेळाडूला आपला दर्जा सिद्ध करावा लागतो . 

यशस्वी खेळाडूंची अंतस्थ शक्ती म्हणजेच मनोवृत्ती खंबीर असते . यासाठी उदाहरण म्हणून आपण बॉबी फिशरचा विचार करू शकतो . रशियन खेळाडूंना हरवून जगजेत्ता होण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले आणि ते सत्य करून दाखवले . तेच ध्येय उराशी बाळगत त्याने जगजेत्ता होण्याची स्पर्धा खेळला असे त्याने जगजेत्ता झाल्यावर दिलेल्या मुलाखतीत सांगितले . यासाठी त्यांच्या मानसिकतेच्या अभ्यास प्रत्येक बुद्धिबळपटूने कार्यालाच हवा . सध्याचा

काळात मँग्नस कार्लसनचेउदाहरण देता येईल मँग्नस कार्लसन खेळताना कुठलाही हावभाव आपल्या चेहऱ्यावर येऊ देत नाही. जगजेत्ता स्पर्धा जिंक्याचीच हाच निश्चय त्याच्या देहबोलीतून जाणवतो . ऑलम्पिकमध्ये सुवर्णपद मिळवणारे आणि बुद्धिबळातील जगजेता यांची मानसिकता एकच असते . अविरत मेहनत नावीन्याच ध्यास , नवनवीन खेळी शोधून त्यावर अभ्यास करावा लागतो , प्रतिस्पर्ध्याशी मुकाबला करणे, त्याचे कच्चे दुवे ओळखणे, त्याचा फायदा घेत त्यावर मात करणे . खेळताना पराभवाची निर्माण ना होऊ देणे या गोष्टींची जाणीव बुद्धिबळपटूस खेळताना ठेवावी लागते 

 ,खेळात यश म्हणजे  जिकणे हे समीकरण आपण बनवले आहे . जिंकणे आणि यश मिळवणे या दोन्ही गोष्टी ठरवलेल्या उद्दिष्टांशी, लक्ष्यांशी निगडित असतात.,असे मानसशास्त्रज्ञ डॉ . क्रटी यांचे म्हणणे आहे . या गोष्टीशी खेळाडू परिचित असेल तर खेळाडू यशस्वी होण्याची शक्यता वाढते जर परिचित नसेल तर खेळाडूला त्रास होतो . बुद्धिबळ का खेळले जाते याचे कारण एकच आहे स्वतःची बौद्धिकता सिद्ध करण्यासाठी .यामुळे या खेळातील प्रत्येक व्यक्ती स्वतःला सिधद करण्यासाठी धडपडत असते . खेळाडूची यशस्विता त्यांचा ध्येयाशीच निगडित असते . हे मनसशास्त्राने दाखवून दिले आहे  

लेखक

सुनील शर्मा  (लेखक नाशिमधील सर्वात जुने बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत गेल्या ४५ वर्षांपासून ते बुद्धिबळ खेळाडू घडवत आहे  त्यांनी आजपर्यंत .ग्रँडमास्टर विदित गुजराथी सह अनेकांना त्यांनी घडवले आहे आज ते  बोटवानीक चेस स्कुलच्या माध्यमातून बुद्धिबळ प्रशिक्षण देत आहेत )  

शब्दांकन अजिंक्य तरटे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?