सांघिकता आणि बुद्धिबळातील यश (बुद्धीबळाचे मानसशास्त्र भाग८ )

     

मागील भागात आपण वैयक्तिक मानसिकतेचा बुद्धिबळातील यशापयशावर काय परिणाम होतो ? हे बघितले या भागात आपण सांघिकता आणि बुद्धिबळ यातील सहसंबध बघणारा आहोत सांघिक खेळातूनही बुद्धिबळात भरपूर काही शिकता येते . जुलै २०१८ मध्ये फिफा वर्ल्ड कप मध्ये इतिहास घडला ५ वेळा विश्वविजेता असणाऱ्या ब्राझीलला हरवून तब्ब्ल ३२ वर्षांनी बेल्जीयमने उपांत्य फेरी गाठली याच्या आधी १९८६ मध्ये बेल्जीयमचा संघ उपांत्य फेरी गाठू शकला होता युरोकप २०००मध्ये बेल्जीयम पहिल्या फेरीतच बाद झाला होता. त्याची बोज बेल्जीयम संघाला लागून राहिली माजी फुटबालपटू मायकल सेबलोन यांच्यावर संघ तयार करण्याची जवाबदारी देण्यात आली त्यांनी तज्ज्ञ लोकांना बरोबर घेऊन एक उत्तम आरखडा (ब्लु प्रिंट ) तयार केला प्रथम त्यांनी खेळण्याची पद्धत बदलली .  विजयावरच लक्ष केंद्रित केले प्रक्षिक्षकांची संख्या वाढवली नॅशनल फुटबॉल सेंटर उभारले अश्या बऱ्याच गोष्टीमुळे बेल्जीयम उपांत्य फेरीत पोहोचला 
मागच्या लेखात आपण बघितल्याप्रमाणे वैयक्तिक मानसिकता आणि वर उल्लेख केलेल्या संघ भावनेचा विचार केला असता आपणास एक गोष्ट सहजतेने लक्षात येते की , दोन प्रकारच्या मानसिकता असतात / एक ग्रोथ माइण्डसेट आणि दुसरी फिक्स्ड माइण्डसेट . ग्रोथ माइण्डसेट नियमित अपयशाला संधीच्या रूपात बघते .
आव्हानापुढे जाण्यासाठी जिद्द ठेवतात . त्याचे अभिप्राय रचनात्मक असतात .दुसऱ्यांचा विजय त्यांना प्रेरणादायी असतो शांत राहतात कोणालाही वशीभूत होत नाहीत नकारत्मक विचारपासून दूर राहतात द्वेषभावना मनात ठेवत नाहीत आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहतात भीती राग लोभ या सारख्या नाकारत्मक भावांपासून दूर असतात आत्मविश्वास भरपूर असतो . 
या उलट फिक्स माइण्डसेट असणाऱ्या व्यक्ती अपयश आल्यास आपल्या सीमा ठरवतात आव्हाने स्वीकारायला तयार नसतात निराशा आल्यास स्वतःला परिस्थीती समोर समर्पण करतात अभिप्राय आणि टीका या व्यक्तिगत असतात दुसऱ्यांचे चांगले गुण घेण्यास तयार नसतात . भीती आळस टेंशन नकारत्मक विचार चिडचिड अशी स्वभाव विशिष्ट या लोकात आढळते 
बुद्धिबळातही प्रक्षिशकाने लक्षात ठेवायला हवे की , आपणास मर्यादा आहेत इतर ज्येष्ठ खेळाडूंचे मार्दर्शन आपल्या खेळाडूला मिळवून द्यायला प्रयत्नशील असावे यशस्वी होण्यासाठी खेळाडूंची  उद्दिष्टे आणि ती सध्या करण्यासाठी टप्पे ठरवा स्थानिक स्पर्धा अभ्यासासाठी ठेवाव्यात त्यात जिंकणे महत्त्वाचे नाही सराव महत्त्वाचा असतो सध्याचा फार्म आणि कामगिरीचा विचार करून उद्धिष्टांचे टप्पे ठरावा नियोजनात शारीरिक तंदरुस्ती आणि मेहनतीचे योग्य नियोजन करा 
यशाचा मार्ग" पूर्वतयारी + सादरीकरण +उपाययोजना = यश '
अभ्यास (study )म्हणजे काय ?
S  skill, style, Stamina     वाढवा 
T Thinking Technique      वाढवा 
U understanding                 वाढवा 
D Depth ,Discipline          वाढवा 
Y yippee आणि आंनद वाढवा 
 S Q R वर लक्ष केंद्रित करा 
S Summary आपल्या स्पर्धेचा आढावा घ्या 
Q Questing  प्रशिक्षकाशी बोला 
R Reading . . Revision आपल्या अभ्यास वाढवा 
 पुढील लेखात बुद्धिबाचा प्रवाह कसा प्रवाहित राहतो. आणि बुद्धिबळ खेळाडूंचे योगदान , प्रत्यक्ष खेळात येणाऱ्या अडचणी याबाबत चर्चा करू 
लेखक
सुनील शर्मा  (लेखक नाशिमधील सर्वात जुने बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत गेल्या ४५ वर्षांपासून ते बुद्धिबळ खेळाडू घडवत आहे  त्यांनी आजपर्यंत .ग्रँडमास्टर विदित गुजराथी सह अनेकांना घडवले आहे आज ते  बोटवानीक चेस स्कुलच्या माध्यमातून बुद्धिबळ प्रशिक्षण देत आहेत )  
 
शब्दांकन अजिंक्य तरटे 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?