अशांत ,अस्वस्थ इशान्य भारत


 आपल्या भारताचा एका टोकाला , दुर्लक्षीत असणाऱ्या इशान्य भारत सध्या प्रचंड खदखदतोय. नव्या राज्याचा मागण्या, लष्कराच्या कारवाया, राज्यांचे आपसातील सीमावाद  यामुळे इशान्य भारत सध्या एका तापलेल्या तव्याप्रमाने झाला आहे. ज्यावर इतर विनाकारण ताणलेले अस्मितेचे केलेले प्रश्न बाजूला ठेवून विचार करण्याची नितांत गरज आहे.
          त्रिपूरा राज्यातील त्रिपरा या जनजातीने त्याच्यासाठी स्वतंत्र त्रिपरालँड या राज्याची मागणी केली आहे.त्याच्यासाठी त्यांनी राज्यात आंदोलने केल्यावर नवी दिल्लीत देखील आंदोलने केली आहेत. सध्या त्रिपूरा राज्यात भाजपाचे सरकार आहे.प्रस्तावित नव्या राज्याला काँग्रेस, आप आदी सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. बांगलादेशबरोबर 820 किमीची सीमा शेअर करणारा इशान्य वगळता अन्य सातही दिशांना बांगलादेश हा देश असलेला, स्वतःच्या भौगौलिक स्थानामुळे भारताला बांगलादेशामध्ये अंतर्गत भागात काय चालू आहे? याची माहिती घेण्यास साह्य करणारे राज्य म्हणजे त्रिपूरा. म्यानमारबरोबर सिमा असणाऱ्या मिझोराम या छोट्या राज्याबरोबर सीमा असणारे, राज्य म्हणजे त्रिपूरा 19 जनजातीय राहत असणारे ,भारतीय सविधानात 5व्या 6परीशिष्ठात बऱ्याच प्रमाणात स्वायत्त प्रशासनव्यवस्था असण्याची तरतूद असणारे राज्य असणारे राज्य म्हणजे त्रिपूरा.
       या अस्या संवेदनशील असणाऱ्या राज्यातील त्रिपरा या जनजातीने त्यांचा प्रथा ,परंपरा यांचे सहजतेने पालन करता यावे, बांगलादेशातील घुसखोरीला आळा घालता यावा यासाठी त्रिपूरा राज्यातून स्वतंत्र त्रिपरा लँड या राज्याची मागणी केली आहे. त्रिपूरातील 19जनजातीपैकी त्रिपरा ही प्रमुख जनजाती आहे. जीचे 1881च्या जनगणनेनुसार प्रमाण 63%होते जे 2011च्या गणनेनुसार 31%झाले आहे. प्रजनन दर न बदलता त्यांचा लोकसंख्येतील वाटा घसरण्याचे कारण म्हणजे इतर व्यक्तींची घूसखोरी, ज्यामध्ये बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणात आहे.1947ते1971 पर्यत त्यावेळच्या पुर्व पाकिस्तानमधून अनेक जण
तत्कालीन शासनाच्या जूलमी धोरणामुळे भारतात आले जे पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपूरा आदी वर्तमान बांगलादेशच्या शेजारील राज्यात आले त्यांच्या  येण्यास बांगलादेशच्या निर्मितीनंतर काही प्रमाणात विराम लागला मात्र पूर्णपणे थांबला नाही त्यांच्या संख्येमुळे तेथील मुळातील लोकसंख्येचा समतोल काहीसा  बिघडला त्याने काही समस्या या राज्यात निर्माण झाल्या त्रिपुरालँड या राज्याची निर्मितीची मागणी ही या बिघडलेल्या समतोलातूनच आली आहे याच त्रिपुरा राज्यात बांग्लादेशमध्ये नवरात्री उत्सवादरम्यान झालेल्या हिंदूंवरील अत्याचाराची प्रतिक्रिया म्हणून मुस्लिमबांधवांवर मशिदींवर हल्ले झाले होते . त्रिपुरा हे राज्य मुळात अत्यंत लहान आहे त्या राज्याचे अजून विभाजन करणे धोक्याचे ठरू शकते 
    काही दिवसापूर्वी सीमारेषेवरून आसाम आणि मिझोराम या राज्यामध्ये अत्यंत तणावाची स्थिती झाली होती त्यावेळेस त्या दोन्ही राज्यातील पोलिसांनी एकमेकांवर बंदुकीच्या फैरी झाडल्या होत्या .एकाच देशातील दोन राज्यातील पोलिसांनी एकमेवर हल्ला करण्याची ती भारतातील पहिलीच वेळ होती . आपल्या भारतात महाराष्ट्र तेलंगणा . कर्नाटक केरळ, महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू कर्नाटक, हिमाचल प्रदेश लडाख ,  असे अनेक राज्यातील आपसातील वाद आहेत मात्र अशी प्रतिक्रिया तिथे उमटली नव्हती जी देशाच्या एकात्मतेसाठी अत्यंत महत्वाचा भागातील या राज्यात उमटली 
 नागालँड या ईशान्य भारतातील अजून एका राज्यात नुकताच लष्कराकडून दहशतवादी समजून निष्पाप नागरिकांकवर प्राणघातक हल्ले केल्याची घटना ताजी  आहे माझ्यामते या सर्व घटकांचा स्वतंत्रपणे विचार ना करता एकत्रितपणे ईशान्य भारताच्या घटना म्हणून करावयास हवा त्यांना रेल्वेच्या नकाश्यावर आणण्याचे मोठे प्रयत्न सुरु आहेत त्याचा वेग वाढवणे अत्यंत आवश्यक आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?