आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी

         

  आपल्या मराठीतील एक सुप्रसिद्ध म्हण म्हणजे "आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी". एखादी समस्या सोडवण्यासाठी  आवश्यक असणाऱ्या उपाययोजना सोडून इतरच उपाययोजना करणे, यासाठी ही म्हण वापरली जाते. बंगळुरु येथील  इंडियन इनस्टिट्युट आँफ सायन्स मधील वसतिगृहातील छतावरील पंखे काढून टाकण्याचा प्रकार बघितला, तर सध्या प्रशासनाकडून याच म्हणीसारखे वर्तन घडत आहे, असे म्हणावे लागेल.  विद्यार्थी छतावरील पंख्यांचा वापर करत आत्महत्या करत असल्याने त्यांच्या आत्महत्येमागच्या कारणांचा शोध घेऊन ती दूर करण्याऐवजी ते छतावरील पंख्याचा वापर करतात. म्हणून छतावरील पंखे काढण्याचा प्रताप इंडियन इनस्टट्युट आँफ सायन्स प्रशासन करत आहे.पंखे काढल्यानंतर आत्महत्या थांबतील असे या प्रशासनास वाटते.मात्र सध्या असणारे छतावरील पंखे काढून टाकल्यास विद्यार्थी दुसऱ्या मार्गाचा अवलंब करत आत्महत्या करतील. मग ते पण तोडणार का? आणि पहिले साधन तोडल्यामुळे दुसऱ्या साधनाद्वारे आत्महत्या  करण्यास सुरवात केल्यामुळे ते तोडणार असी साखळी किती दिवस चालणार ?असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे .मुळात विद्यार्थ्यांचा आत्महत्या रोखण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेवून उपाययोजना करण्याची गरज आहे. नकी हे थातूर मातूर उपाय करण्याची.
               विद्यार्थी आत्महत्या का.करतात? याबाबतचे कारणे सर्वांना माहिती आहेत.याबाबत करावयाच्या उपाययोजना देखील सर्वश्रूत आहेत, मात्र त्याची प्रभावी अमंलबजावणी होत नाही, हेच दुःख आहे थ्री इडीयट ,
शिक्षणाचा आयचा घो, सारखे चित्रपट आले की त्या काळापुरती शिक्षणातील कमतरता उणीवा, तसेच ते अधिक उत्तम करावयाचा साठी अपेक्षीत असणाऱ्या सुधारणा याबाबत चर्चा होते.मात्र त्याबाबत घोडे पुढे सरकत नाही. एखाद्या संस्थेत विद्यार्थ्यांचा आत्महत्या वाढल्यावर असे छतावरील पंखे काढण्यासारखे हास्यास्पद वाटावे, असे उपाय केले जातात.मु्ळ समस्या तसीच राहते.
          शेतकऱ्यांचा आत्महत्येसारख्याच संवेदनशीलतेने या विषयाकडे बघायला हवे. शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रश्नांवरुन जसे राजकारण खेळले जाते, तसे घडायला नको. आजमितीस कोणत्याही अगदी विधानपरीषदेच्या शिक्षक मतदारसंघातील निवडणूकीत देखील कोणताच पक्ष याबाबत फारसे बोलत नाही. असो. थ्री इडियट या अमीर खानच्या चित्रपटात विद्यार्थ्यांचा आत्महत्या हा प्रश्न किती गंभीर आहे?हे आपण बघीतलेच आहे. त्या काळातील वर्तमानपत्रे आठवून बघा, विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा मथळ्यांनी ती सजलेली असे नंतर.त्याबाबत काहीही न झाल्याने विद्यार्थ्यांंचा आत्ममहत्येचे सत्र सुरुच राहिले. ज्यामुळे बंगळूरु येथील इंडीयन इस्ट्यिटुट प्रशासनाला वसतीगृहातील छतावरील पंखे काढून टाकण्याची उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. जर त्यावेळीच सक्षम अस्या उपाययोजना केल्या गेल्या असत्या तर असे उपाययोजावेच लागले नसते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?