स्वागत उत्तरायणचे –


 आपण लॉक डाउनच्या काळात सर्वांनी महाभारत बघितले आहेच . त्यात सांगितले आहेच की, या महाभारताच्या युद्धात मृत्यूशयेवर पडलेले असताना उत्तररायणाची वाट बघत असतात . उत्तरायण सुरु असताना प्राण जाणे शुभ समजले म्हणून ते उत्तररायणाची वाट बघत असतात तर मित्रानो, आपल्याकडे विशेष शुभ मानल्या गेलेल्या उत्तररायणाचा प्रारंभ बुधवारी  २२ डिसेंबरला होत आहे. त्यानिमित्याने सर्वांना उत्तररायणाचा सुरवात होण्यासंदर्भात मनापासून शुभेच्छा हे का होते ते आता बघूया
        पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे आता सर्वमान्य झाले आहे . याचा आपल्याला दृष्यपरिणाम म्हणजे सूर्याचे रोज बदलणारे स्थान. सामान्यतः आपण सूर्य पूर्वेला उगवतो असे मानतो. मात्र संपूर्ण वर्षात फक्त दोनच दिवस असतात ज्या दिवशी सूर्य वास्तविक पूर्व दिशेला उगवतो. अन्य दिवशी तो पूर्व दिशेपासून काही अंश उजव्या अथवा डाव्या बाजूला म्हणतात . यास सूर्याचा भासमान भ्रमण मार्ग म्हणतात.  या भासमान भ्रमणात सूर्य जेव्हा त्याच्या डाव्या हाताच्या सगळ्यात कडेच्या बिंदूपर्यत पोहोचतो. ज्या बिंदूपासून तो परत उजवीकडे भासमान भ्रमण सुरु करतो तो दिवस म्हणजे उत्तरायण सुरु होण्याचा दिवस जो या वर्षी बुधवार  22डिसेंबर 2019 रोजी आहे .
        मित्रानो , उत्तरायण सुरु झाल्याने आता दिवसाचा कालावधी हळूहळू वाढत जाईल. ही प्रक्रिया 22 जून 2022 पर्यंत सुरु राहील . आपल्या भारतीय पंचांगानुसार पूर्वी  उत्तरायण सुरु होण्याच्या  दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असे   मात्र पृथीच्या परांचन गतीमुळे (पृथ्वीचा अक्ष  स्थिर नाही तो २६ हजार वर्षात एक फेरी पूर्ण करतो
त्यास  परांचन गती म्हणतात .यामुळे ध्रुव तारा देखील काही काळाने बदलतो याचाही अभ्यास करून महाभारताचा काळ  निश्चित करण्यात आला आहे ) तो सध्या14  जानेवारीला होतो . हे सूर्याचे मकर राशीत भासमान भ्रमण आपण मकर संक्रांत म्हणून साजरे करतो खरेतर हा उत्तरायण सुरु झाले याचा आनंदोत्सोव असतो . महाभारत युध्द्धच्या वेळी सुद्धा पितामह भीष्म यांनी आपले प्राण उत्तरायण सुरु होण्यापर्यंत रोखून धरले होते.
पृथीवर विविध ऋतू निर्माण होण्यासाठी हे उत्तरायण आणि दक्षिणायन महत्वाची भूमिका बजावतात  .कारण यामुळे पृथ्वीवर सर्वच ठिकाणी वर्षातील काही काळ प्रखर सूर्यप्रकाश मिळतो काही काळ कमी प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो परिणामी तापमानात मोठा फरक पडतो हा तापमानातील फरक वाऱ्याची निर्मिती करतो आणि ऋतू   चक्राची निर्मिती होते  या दिवशी उत्तर गोलार्धात वर्षातील सगळ्यात छोटा दिवस आणि सगळ्यात मोठी रात्र असते तर दक्षिण गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सगळ्यात छोटी रात्र असते . या दिवसापासून उत्तर ध्रुवावर दिवस होण्यास सुरवात होते . तर अशा हा दिवस जो आपल्यासाठी अत्यंत महतवाचा आहे . तर एकमेकांना उत्तरायण दिनाच्या शुभेच्छा देऊन आपण हा दिवस साजरा करूया , 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?