जेव्हा नाशिककरांची मान गर्वाने ताठ होते.

       

    सध्या नाशिककर कोव्हिड 19 च्या वाढत्या संख्येमुळे धास्तावले असताना,  एक नाशिककर जगभरात नाशिकचेच नव्हे, भारताचे नाव उंचावत आहे. सुपर ग्रँडमास्टर विदीत गुजराथी हे त्या नाशिककराचे नाव.De  Moriaan येथे सुरू असणाऱ्या टाटा स्टिल चेस चँम्पियन स्पर्धेत  तिसऱ्या डावा अखेर अडीच गुण प्राप्त करत स्पर्धेत अभिनंदनास्पद बढत घेतली आहे. त्यांनी पहिल्या आणि तिसऱ्या डावात विजय तर दुसऱ्या  बरोबरी साधली.  टाटा स्टिल चेस चँम्पियन चे 84 वे वर्ष आहे. ही स्पर्धा फिडे या बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेकडून दरवर्षी आयोजित करण्यात येते. टाटा स्टिल या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक आहेत. त्यामुळे त्यांचा नावे ही स्पर्धा ओळखली जाते.  जसे व्हिवो आयपिएल,डिएलएफ आयपिएल वगैरे.
       बुद्धिबळाच्या कॅलेंडरमधील वर्षातील सर्वात  महत्वाची स्पर्धा म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते.बुद्धिबळाच्या स्पर्धा तीन प्रकारात होतात ,क्लासिकल, रँपिड आणि ब्लिटस .त्यातील क्लासिकल या प्रकारात 13 फेऱ्यामध्ये होणारी ही स्पर्धा अत्यंत महत्ताची आहे.टाटा स्टिल चेस चँम्पियन  ही स्पर्धा बुद्धिबळातील विंब्लडन म्हणून ओळखली जाते. बुद्धीबळची क्लासिकल या प्रकारातील ही मोठ्या काही स्पर्धापैकी एक समजली जाते. 
           या स्पर्धेत विदीत गुजराथी यांनी दुसऱ्या डावात जगातील चौथ्या क्रमांकाचा बुद्धिबळ खेळाडू फाडियानो करीनावो याबरोबर डाव बरोबरीत सोडवला .यामुळे त्यांचे इलो रेटींग (फिडेकडून देण्यात गुणांकन) वाढले परीणामी तो पर्यत जगातील 23 व्या क्रमांकाचे असणारे विदीत गुजराथी यांनी  क्रमवारीत 4 स्थळांची झेप घेत 19 वे स्थान प्राप्त केले. त्यांनी पहिल्या आणि तिसऱ्या डावात अनुक्रमे अमेरीकेच्या सँम शँकलन आणि रशियाच्या माजी रँपिडमधील विजेता डँनियल डुबोव्ह यांना पराभवाचे पाणी पाजले. या स्पर्धेचे समालोचन करणाऱ्या चेस डाँट काँम या युट्यूब चँनेलवरील समालोचकांनी देखील विदीत यांच्या खेळाचे कौतूक केले, हे विशेष .या स्पर्धेतील सर्वात तरुण खेळाडू  असलेल्या विदीत गुजराथी यांचे या स्पर्धेतील प्रदर्शन अत्यंत वाखण्याजोगे आहे. अस्या
शद्बात त्यांनी विदीत यांचा गौरव केला.जी नाशिककरांसाठी अत्यंत गौरवास्पद गोष्ट आहे, हे नक्की. तिसऱ्या डावात काळ्या मोहर्यांनिशी  खेळताना कठीण  परिस्थितीत विजय  खेचून  आणला , हे विशेष दोन्ही खेळाडूंनी   राजासमोरील प्यादे दोन २ घरे चालवत  डावाची सुरवात केली हा   डाव इटालियन ओपनिंग प्रकारे खेळाला गेला पहिल्या डावात पांढऱ्या मोहऱ्यां   घेऊन खेळताना विदित यांनी   वजिराकडील प्यादे दोन घरे  चालवून आपल्या डावाची सुरवात केली याला प्रत्यतर म्हणून प्रतिस्पर्ध्याने राजाकडील घोडा खेळाला विदित गेल्या काही दिवसांपासून पांढऱ्या  मोहऱ्यां घेऊन खेळताना या प्रकारची सुरवात करताना अनेकड्ड दिसले आहेत  दुसर्या डावात सुद्धा पांढऱ्या  घेऊन खेळताना त्यांनी  डावाप्रमाणेच वजीर समोरील प्यादे दोन घर पुढे करत डावाची सुरवात केले हा दावा सेमी सेमी स्लाव्ह या ओपनिंग पद्धतीने झाला 
       भारतात वैयक्तिक खेळात  कुस्ती, भालाफेक, गोळाफेक, वजन उचलणे या खेळाला अधिक महत्व देण्यात येते मात्र बुद्धिबळ सारख्या मानसिक आणि शारीरिक क्षमता जोखणाऱ्या, ज्या खेळात प्रेक्षक  खेळाडूबरोबर खेळ खेळू शकतात असा बुद्धिबळ मात्र काहीसा मागे पडला आहे. ज्यामुळे गेल्या काही दिवसापासून भारतीय बुद्धिबळपटू अत्यंत अभिनंदनास्पद कामगिरी करत असताना देखील त्याची यथोचित दखल घेतली जात नाही. याच अनास्थेचा फटका विदीत गुजराथी यांना बसत आहे. असे खेदपुर्वक म्हणावे लागते आहे. निरोगी शरीरातच निरोगी मन कार्य करते.जर आपले हातपाय फँक्चर असतील ,आपणास ताप असेल तर आपण योग्य पद्धतीने लक्ष केंद्रित करु शकत नाही. या व्याधा टळण्यासाठी शाररीक तंदरुस्ती आवश्यक आहे. त्यामुळे म्हटले बुद्धिबळात मानसिक तंदरुस्ती बरोबर शारीरिक तंदरुस्ती जोखली जाते.त्यामुळे या खेळातील विदित यांचे यश खरोखरीच अभिनंदनास पात्र आहे हे नक्की 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?