अखेर मराठवावाडा रेल्वेच्या विकासाच्या नकाश्यावर

     


            मराठवाडा देशाच्या साधारण मध्यभागी असणारा एक अविकसीत मात्र धार्मिक विचार करता अत्यंत समृद्ध भाग.(देशभरात असणाऱ्या 12पैकी ज्योर्तिलिंगापैकी 3 ज्योर्तिलिंग आणि देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी दोन पुर्ण शक्तीपीठ  तसेच  महाराष्ट्रातील संतांपैकी अनेकाचा काहीना सबंध हा मराठवाड्याशी असतोच) हे मराठवाड्याचे अविकसीत अनेक बाबतीत दिसते ,राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेची स्थिती वगैरे  आता मात्र या चित्रात सकारात्मक बदल होताना दिसत आहे. संपुर्णतः डिझेलवर चालणाऱ्या मराठवाड्याचा रेल्वेचे आता झपाट्याने विद्यूतीकरण होत आहे. परभणी ते परळी वैजनाथ ते विकाराबाद, मनमाड ते औरंगाबाद, कुर्दुवाडी ते लातूर तसेच अकोला ते पुर्णा या सर्वच मार्गावर रेल्वे झपाट्याने विद्यूतीकरण करताना आपणास दिसत आहे

      परभणी जंक्शन  ते परळी वैजनाथ या सुमारे 64 किमीच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरणाचे काम मागील वर्षी अर्थात 2021 साली सुरु झाले. आजमितीस त्यातील 31किमीचे म्हणजेच सुमारे 50% काम पुर्ण झाले आहे. पोखरणी ते वडगाव निळा या दरम्यान काम अत्यंत वेगाने सुरु आहे.या दरम्यान विद्युतीकरणासाठी आवश्यक असणारे खांब उभारण्याचे काम जवळपास100% झाले आहे. विकाराबाद ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गाबाबत बोलायचे झाल्यास याचे काम 3 टप्यात होणार असून दोन टप्पे पुर्ण झाले आहे. कोहीर डेक्कन ते खानापूर पर्यत रेल्वेची सुरक्षा चाचणी बाकी आहे. जी जानेवारीच्या अखेरपर्यंत होण्याची शक्यता रेल्वे मंत्रालयाचा इंस्टाग्राम अकाउंटवर देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्यात अर्थात खानापूर ते परळी वैजनाथचा विचार करता लातूर रोडपर्यत प्राथमिक तयारी झाली आहे. भालकी पर्यत खांब बसवण्याचे काम पुर्ण झाले आहे. मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा प्रमुख रेल्वेमार्ग असणाऱ्या मनमाड ते औरंगाबाथ या रेल्वेमार्गाचा विचार करता मनमाड जवळील अंकाइ ते रोटेगाव (वैजापूर ) पर्यत खांब लावण्याचे काम जवळपास संपण्यात जमा असून वायरींगच्या कामास काही

ठिकाणी सुरवात होत आहे. रोटेगाव ते लासूर पर्यत प्राथमिक तयारी जवळपास पुर्ण झाली आहे. लातूर ते कुर्दुवाडी या रेल्वेमार्गाचा विचार करता हे कुर्दुवाडी ते उस्मानाबाद पर्यत  जवळपास विद्युतीकरण पुर्ण झाले आहे. पांगरीपर्यत या आधीच इलेक्ट्रॉनिक इंजिनाची सुरक्षा चाचणी घेण्यात आली आहे. अकोला ते वाशिम चा विचार करता अकोला  ते लोहगड या दरम्यान या मागील वर्षीच इलेक्ट्रॉनिक इंजिनाची सुरक्षा  चाचणी घेण्यात आली  होती   तर लोहगड ते  वाशिम दरम्यान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच इलेक्ट्रॉनिक इंजिनाची सुरक्षा चाचणी घेण्यात आल्याचे दक्षीण मध्य रेल्वेचा ट्टीटरवर सांगण्यात आले आहे. वाशिम पासुन पुढे प्राथमिक कामे पुर्ण झालेली असुन खांब बसवण्याचे काम सुरु आहे.

एकंदरीत भारताच्या स्वातंत्त्र्यानंतर पूर्ण एक  वर्ष एक महिन्यानंतर स्वतंत्र झालेला आणि संविधानाच्या कलम 371 अन्वये विकासासाठी स्वतंत्र तरतूदी असणारा हा महाराष्ट्राचा भाग आता विकासात जगाच्या बरोबरीने येत आहे. हेच खरे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?