पाकिस्तानच्या आर्थिक अरिष्ट्यात वाढ

           

     पाकिस्तानच्या आर्थिक अरिष्ट्यात दिवसोंदिवस  वाढच होताना दिसत आहे .  पाकिस्तानचे परकीय चलनमुळात कमी असताना ते मोठ्या झपाट्याने कमी होत आहे परकीय चलन मिळवण्याचे मार्ग सुद्धा दिवसोंदिवस कमी होत चालले आहे  पाकिस्तानच्या डोक्यावरचे परदेशी कर्ज बघून सुद्धा आय एम एफ सुद्धा बेलआऊट पॅकेज देण्यास फारशी इच्छुक नाही जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी नव्याने कर्ज घेण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे  अनेक मिनतवाऱ्या करून सुद्धा परदेशी गुंतवणूकदार पाकिस्तानात गुंतवणूक करायला तयार नाहीत या आधी ज्यांनी गुंतवणूक करू असे,  सांगितले होते ते देश सुद्धा आत हात आखडता घेत आहे या हात आखडता घेण्यात नुकताच पाकिस्तानचा मित्र देश सौदी अरेबिया देखील सहभागी झाला आहे आजपासून सुमरे तीन वर्षांपूर्वी सौदी अरेबियाने पाकिस्तानात तब्बल २० अब्ज अमेरिकी डॉलर गुंतवूणक करण्याचे ठरवले होते.  ही गुंतवणूक सौदी अरेबिया पाकिस्तानातील विविध विकास कामामध्ये करणार होता  त्यातील बलुचिस्तानमधील तेल विहिरींबाबत सौदी अरेबियाने या आधीच नकार घंटा वाजवली होती आता उरलेल्या गुंतवूणकीतुनही सौदी अरेबियाने . हात आखडता घेतला आहे 
              जानेवारी २०१९ मध्ये   सौदी अरेबियाने पाकिस्तानबरोबर मेमरॅंडम ऑफ अंडरस्टँडिंग ( MOU ) केले होते त्यानुसार हि गुंतवणूक होणार होती ज्यामध्ये ग्वादार या बंदरानजीक तेल शुद्धीकरण कारखाना उभारण्यात येणार होता पाकिस्तानने त्यासाठी जमीन अधिग्रहांची देखील पूर्ण तयारी केली होती मात्र काही कारणाने सौदी अरेबियाच्या मोठ्या तेलउत्पादक कंपनी असलेल्या आरामको याने त्या जागेस नकार दिला त्यांनी काराचीनजीक
छोट्या प्रमाणावर तेल शुद्धीकरण कारखाना उभारण्यास सहमती दाखवली ज्यास पाकिस्तान तयार नव्हता ज्यामुळे हा प्रस्ताव बारगळला . हा तेल शुद्धीकरण कारखान्याचा प्रस्ताव एकूण गुंतवणुकीच्या ५०% अर्थात १० अब्ज अमेरिकी डॉलरचा होता हे विशेष त्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये पाकिस्तनी पंतप्रधान इम्रान खान सौदी अरेबियाच्या दौऱयावर असताना त्यांनी सौदी उद्योजकांना पपाकिस्तानचे भौगोलिक स्थान आणि अर्थव्यवस्थेचा आकार बघता गृह निर्माण आणि बांधकाम क्षेत्रात मोठ्या संधी असल्याचे सांगितले त्यानुसार जानेवारी २०२२ च्या काखेरीस सौदी अरेबियाचे उद्योजक तिथे गेले असता तेथील नैसर्गिक इंधनाचा तुटवडा , पाण्यासारख्या गोष्टीचा तुटवडा , पाकिस्तानमधील भष्ट्राचाराचे प्रचंड  प्रमाण , अकार्यक्षम  नोकरशाही , प्रकल्पांमध्ये होणारा राजकीय हस्तक्षेप , पाकिस्तानी नागरिकांची तंत्रज्ञान विषयक उत्सुकता नसणे . राजकीय धोरणांत होणारा सातत्याने बदल यामुळे पाकिस्तानात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे त्यांच्या नाकारामुळे गेल्या ४ महिन्यात पाकिस्तानमधील परदेशी गुंतवणूक १२ % कमी झाली आहे जे कोणत्याही देशासाठी फारसे ऊत्तम म्हणता येणार नाही   
           एकीकडे सौदी अरेबिया कडून नकार घंटा येत असताना पाकिस्तानच्या आर्थिक  विकासाचे इंजिन म्हणून ज्या मोठ्या प्रकल्पांकडे बघितले जाते त्या चायना पाकिस्तान इकोमनोमिक कॉरिडॉरमध्ये रोज नवनवीन अडचणी येत आहेत पूर्वी या प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या चिनी कंपन्यांना पैसे पुरवण्यासाठी चिनी सरकारकडून कर्ज घेण्याची वेळ आली होती या प्रकल्पात  काम करणाऱ्या चीनच्या अनेक अभियंते कामगारांवर काही प्राणघातक हल्ले देखील पाकिस्तानात झाले आहेत  मूळ नियोजनापेखा काम खूपच संथ गतीने होत आहेअनेक चिनी कंपन्यांनी पाकिस्तानमधील अडचणींना कंटाळून  त्यांचे पाकिस्तानमधील कार्यालय बंद केले आहे .  हे कमी की काय म्हणून स्थानिक करांचा मुद्दा उपस्थित करत,  चायना पाकिस्तान इलॉनॉमिक कॉरिडॉर मधील एक मोठ्या क्षमतेचा म्हणजे १२२४ मेगावॉटच्या जलविद्युत प्रकल्पाचे काम थांबवण्याची धमकी दिली आहे झेलम नदीवर 
मुझफराबाद जिल्ह्यात हा कोहाला जल विद्युत प्रकल्प होता.या विषयी आंतराष्ट्रीय माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार जर हा मुद्दा सोडवला गेला नाही तर हा प्रकल्प आहे तसाच ठेवून चायना पाकिस्तान इकोमनोमिक कॉरिडॉरममधील विकास कामांमधून या प्रकल्पला काढू शकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे   चायना पाकिस्तान इलॉनॉमिक कॉरिडॉर मधील प्रकल्पासाठी गेल्या काही दिवसात काहीही विधाने करत नाही त्यामुळे या सर्वच विकास कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे जी  भारतासाठी चांगली गोष्ट आहे 
     पाकिस्तान  हा भारताचा शत्रू आहे तसेच तो तो आपल्याबरोबर मोठी सीमा शेअर करतो त्यामुळे पाकिस्तानमधील घडामोडी आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहेत 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?