वाहतूक सुरक्षा रामभरोसे ,हे दुर्देवच

   

     देशातील वाहतूक सुरक्षा राम भरोसेच आहे, हे शुक्रवार 5फेब्रुवारी रोजी नाशिककरांनी अनुभवले. नाशिक औरंगाबाद रस्त्यावरील कैलासनगर चौफुली येथे एक मालट्रक आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थांची वाहतूक करणाऱ्या बसचा मोठा अपघात झाला.यावेळी बस पलटी झाली आणि  रक्ताचा थारोळ्याने सर्व परीसर लालेलाल झाला.बसमधील काही विद्यार्थी रुग्णालयात जीवन मरणाची झुंज देत आहेत. काही दिवसापुर्वीच भाजपाच्या एका आमदाराच्या मुलाचा त्याचा सहा मित्रांसह अपघाती मृत्यू झाल्याचे आपणास माहिती असेलच. या घटना देशातील वाहतूक व्यवस्था राम भरोसेच असल्याचे स्षष्ट करत आहे.
               चांगले झालेले रस्ते हे वाहतूक सुरळीत होण्यासाठी आहे, हे रस्ते अतिवेगात चालवण्यासाठी नाहीत, याचा विसर पडल्याने प्रचंड वेगात वाहने चालवण्याची स्पर्धाच सध्या भारतात सुरु आहे. त्यामुळे या प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. वेगात वाहने चालवण्याबरोबर दुभाजकामुळे समोरच्या रस्त्यावर जाण्यास, लांबच्या मार्ग अवलंबावा लागत असल्यास, ऐकरी मार्ग सोडून विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याची प्रवृत्ती, तसेच मागच्या वाहनास पुरेसी कल्पना न देता वाहन थांबवणे, वाहनाचा वेग लक्षणीय प्रमाणात कमी करणे. यामुळे या प्रकारच्या घटना घडतात मात्र यामुळे देशाच्या प्रगतीचे  इंजिन असणाऱ्या तरुणाईचा मोठ्या प्रमाणात बळी जात आहे . 
        संसदेत या विषयी वारंवार मोठी चर्चा झाली आहे वाढत्या अपघाताविषयी समाजाच्या अनेक स्तरातून वारंवार चिंता देखील व्यक्त करण्यात येत आहे याबाबत विविध उपाय देखील योजले जात आहेत मात्र चित्रात अजूनही आनंददायक बदल दुर्दैवाने झालेला नाही शुक्रवारी झालेल्या अपघातामुळे हेच दिसून आले आहे वाहतूक करताना योग्य ती सरंक्षण सामुग्री घेऊन जसे दुचाकीस्वरांना हेल्मेट , कार प्रवाश्याना सीटबेल्ट वापरण्याची सक्ती केल्यास काहीतरी कारणे सांगून विरोध करणे हे प्रसंगी जीवावर बेतू शकते हेच अनेकांना समजत नाही आजकाल 
नाशिकमध्ये फिरल्यास आरश्यावर  हेल्मेट लावून पोलीस दिसल्यास घालायचे अन्यथा तसेच ठेवायचे असे करणारे अनेक दुचाकीस्वार दिसतात अश्या निष्काळजीपणामुळेच अपघात होतात अपघातामुळे होणार खर्च काही प्रसंगात दुर्दैवाने अपंगत्व आल्यास या नियमांचे महत्व सम्जटते मात्र तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते 
         या नागरिकांच्या सवयींबरीबरच प्रशासनाच्या काही दुर्लक्षामुळे देखील अपघात होता शुक्रवारी नाशिकला झालेल्या अपघाताच्या ठिकाणी याच्या आधी देखील  अपघात झाले आहेत या ठिकणी गतिरोधक उभे करावेत अशी मागणी परिसरातील नागरिक सातत्याने करत आहेत मात्र प्रशासनाने गतिरोधक उभारला नाहीये जर गतिरोधक उभारला गेला असता तर कदाचित या अपघात टाळला असता . गतिरोधक दुरून दिसायला हवा म्हणून आवश्यक असणारा पांढरा पट्टा व्यवस्थित ना उभारणे पांढरा पट्टा धूसर झाल्यास तो परत चांगला ना करणे . सुरक्षा फलकावर झाड , आल्यास ते दूर करण्यास टाळाटाळ करणे आदी प्रशासनाच्या चुकीमुळे देखील अपघात होतात मात्र त्याचे प्रमाण एकूण अपघातांपैकी कमी आहे अपघातांपैकी बहुसंख्य अपघात वाहन चालकाच्या चुकीमुळेच होता 
          अपघातात होणारे गाडीचे नुकसान छोटी मोठी दुखापत भरून निघतेच मात्र मृत्यू झाल्यास किंवा गंभीर अपंगत्व आल्यास होणारे नुकसान आयतुष्यभरासाठी होणारे असते  हे विसरता येणारे नसते हे न होण्यासाठी सुरक्षितपणे वाहन चालवणे हाच उपाय असतो हेच खरे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?