पाकिस्तानात नक्की चाललंय तरी काय ?

       


       सध्या आपल्याकडील बहुसंख्य माध्यमे भारतातील पाच राज्यातील झालेल्या  निवडणुका ,  आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्याच्या आरोप प्रत्यारोपाचा बातम्या देण्यात मग्न असताना  पाकिस्तानात नक्की चाललंय तरी काय ? अशी शंका उत्पन्न व्हावी अश्या बातम्या सध्या विविध इंग्रजी माध्यमात येत आहे . पाकिस्तान आपले  शत्रू राष्ट्र आहे तसेच तो आपल्याबरोबर मोठी सीमा शेअर करतो आपली जम्मू , अमृतसर पठाणकोट आदी महत्वाची शहरे भारत पाक सीमेपासून हाकेच्या अंतरावर आहेत त्यामुळे तेथील घडामोडी आपणस माहिती असणे आवश्यक आहे त्या साठीच आजचे लेखन 

            पाकिस्तानमध्ये हा मजकूर लिहीत असताना   पंतप्रधानपदी  इम्रान खान आहेत .पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी त्यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे.  पाकिस्तानमधील सर्वात मोठे शहर पाकिस्तानची १९६३ पर्यंतची राजधानी त्यांची सध्याची आर्थिक राजधानी असलेल्या कराची या शहरातून मोठी राजकीय रॅली पाकिस्तानची १९६४ पासूनची  राजधानी जी त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानमधून मिळणाऱ्या कारातून  बांधण्यात आली (त्या वेळचा पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश )  त्या इस्लामाबाद या शहरात आणून इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तव आणण्याचे विरोधी पक्षांचे नियोजन आहे  याबाबतच्या बातम्या आपणस विविध वृत्तवाहिन्यांमधून आपणा पर्यंत पोहोचली असेल ते रोखण्यासाठी इस्लमाबाद पोलसांनी पाकिस्तानच्या संसदेच्या पोर्चमध्ये विरोधी पक्षाच्या खासदारांना अयोग्य पद्धतीने पकडून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडीओ आपण बघितले असतील पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील फुटीरता  गटांकडून पाकिस्तानच्या विविध नागरी व्यापारी केंद्राच्या परिसरात बॉम्ब हल्ले करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे . पाकिस्तानच्या प्रगतीला साह्य ठरेल म्हणून ओळखल्या जनरण्य चायना पाकिस्तान इकोमोनिक कॉरिडॉर मधील विकासकामाबाबत चीन कडून सातत्याने तक्रार करण्यात येत आहे पाकिस्तानमध्ये  महागाईचा आगडोंब उसळला आहे . 

             पाकिस्तान स्वतंत्र झाल्यावर त्यांचा लोकशाहीचा प्रवास अत्यंत खराब राहिला आहे पाकिस्तानच्या आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी त्याचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही किंबहुना  लोकशाही मार्गाने नियुक्त पंतप्रधानाने दुसऱ्या लोकशाही मार्गाने नियुक्त झालेल्या पंतप्रधानाच्या हाती सत्त्ता देण्याची घटना पाकिस्तानात एकदाच घडली आहे त्यांच्या आतापर्यतच्या पंतप्रधानांच्या पदावर असताना एकतर खून झाला आहे त्यांना विविध कारणामुळे सत्ता सोडावी लागली आहे मग ते भष्ट्राचारचे आरोप असो किंवा लष्कराने उठाव करून सत्त्ता ताब्यात घेतली आहे पाकिस्तानच्या आतापर्यतच्या वाटचालीतील जवळपास निम्मा काळ देशात लष्करी राजवट होती .  या लष्करी राजवटींपैकी एक असणाऱ्या झिया उल झालं यांच्या काळात देशातील धार्मिकतेला सरकारी

पाठींब्याच्याद्वारे बळ देण्यात आले ज्याची विषारी फळे आता पाकिस्तानात दिसत आहे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे पाकिस्तानच्या पंतप्रधानाविषयीचे विधान प्रसिद्धच आहे ते म्हणले होते मी जितक्या लवकर कोट बदलत नाही तितक्या लवकर पाकिस्तनमध्ये पंतप्रधान बदलला जातो पंडित नेहरूंच्या या विधानातून आपणास ठेवील लोकशाही कशी आहे याचा अंदाज येऊ शकतो . १९५६ ला देशाचे संविधान तयार झाल्यावर १९७१ पर्यंत दशकात निवडणुकांचं झाल्या नव्हत्या . म्हणजे पंडित नेहरूंचे विधान पाकिस्तानमधील लोकशाहीची विदारकता स्पष्ट करते 

 पाकिस्तानमधील  हा मजकूर  लिहिण्यापर्यंचे पंतप्रधान हे जनतेच्या पाठिंब्यामुळे नाही तर लष्कराच्या पाठिंब्यामुळे देशाचे पंतप्रधान झाले आहेत पंतप्रधानपदी विराजमान होताना त्यांनी जी आश्वासने दिली होती त्याच्या विरोधात त्यांचेप्रशासन राहिले आहे असे विरोधकांचे म्हणणे आहे याच्या आधीही एकदा पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी सरकार विरीधात अविश्वासाचा प्रस्ताव आणला होता जो फेटाळयांत आला होता आणि इम्रान खान यांची गादी राखली गेली होती  मात्र या चित्रात आता काहीसा बदल झाला आहे पाकिस्तानच्या आपल्या राज्यसभा समकक्ष सदनात १०० सदस्य आहेत त्यापैकी हा मजकूर लिहीत असताना सत्ताधिकाऱ्या पक्षाचे ४८ सद्स्य आहेत तर विरोधी पक्षाचे ५२ सदस्य आहेत पाकिस्तानच्या लोकसभेत एकूण ३४४ सदस्य आहेत त्यापैकी १७६ सदस्य सत्ताधिकाऱ्यांकडे आहेत तिथे बहुमताचाआकडा १७२ आहेत विरोधकांच्या मते त्यांच्याकडे दोनशेहून अधिक सदस्यांचा पाठिंबा आहे त्यामुळे ते सहज जिंकणार आहेत 

पाकिस्तानमध्ये लोकनियुक्त सरकार असणे आपल्या भारतात दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे सध्याच्या  विरोधी पक्षांमध्ये कट्टरता असणाऱ्या पक्षांचा अधिक भरणा आहे त्यामुळे इम्रान खान यांचे सरकार जाऊन त्यांचे सरकार आल्यास त्यांचा काश्मीर विषयीच दृष्टिकोन  भारताला परवडणारा नाही त्यामुळे या आधी जसा पाकिस्तानमधील विरोधी पक्षांचा अविश्वास प्रसतव फेटाळला गेला तास आताही फेटाळयांतच भारताचे हित  आहे हे नक्की 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?