अन्य एसटी वेगाने पुढे जात आहेत?आणि आपण!

    

एखाद्या व्यक्तीच्या परीस्थितीत प्रचंड बदल झाल्यास काय होतात तू, काय झालास तू? असे म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. गेल्या काही दिवसातील महाराष्ट्र एसटीविषयीच्या आणि आपल्या भारतातील इतर राज्यातील एसटीविषयक बातम्या ऐकल्या की, हे विधान आपल्या महाराष्ट्र एसटीला तर लागू पडत नाहीना?असी दाट शंका येते.
     एकेकाळी भारतातील इतर एसटी महामंडळाला महाराष्ट्र एसटी महामंडळाचा आदर्श होता. महाराष्ट्र एसटी सारखी सेवा आपल्या राज्यातील जनतेला देण्याचा प्रयत्न एसटीने करावा, असे केंद्राकडून इतर एसटीला सांगण्यात येत असे. आपल्या बसेसच्या रंगसंगतीशी मिळतीजूळती रंगसंगती आंध्रप्रदेश एसटी
ठेवण्याचा प्रयत्न करत असे. आपल्या महाराष्ट्र एसटीने
1962 आणि1965 च्या युद्धात शत्रूविरुद्ध लढण्यासाठी लष्कराला विक्रमी वेळात बस बांधून दिली होती.1983 साली नवी दिल्लीत झालेल्या आशियाई खेळासाठी आलेल्या परदेशी खेळाडूंना आरामदायी प्रवास घडवण्यासाठी आपल्या महाराष्ट्र एसटीकडून विशेष बसेस बांधण्यात आल्या होत्या. त्यावेळच्या सर्वात आरामदायी बसेस म्हणून त्या ओळखल्या जात.आपण त्यांना हिरकणी किंवा एशियाड या नावाने आपण ओळखतो.
 मात्र आपल्या एसटीला हा नावलौकिक टिकवता आला नाही. आज गोवा, गुजरात, कर्नाटक सारख्या राज्यांचा एसटी आपल्या महाराष्ट्राचा कितीतरी पुढे आहेत. गुजरातची एसटी आता आपल्या ताफ्यात प्रदुषण अत्यंत कमी करणाऱ्या बि एस 6 प्रणालीच्या बसेस दाखल करत आहे. गुजरातच्या काही बसेस सध्याच सि एन जी या इंधनावर चालत आहेत. गोव्याचा एसटीत आज 50  इलेक्ट्रॉनिक बसेस आहेत.तसेच हा ताफा अजून 100 ने वाढवून 150करण्याचे आणि त्याचा पुढे हा ताफा तब्बल 500 ने वाढवून 650 करण्यासाठीची तयारी गोव्याचा एसटीने अर्थात कदंब ट्रान्सपोर्टने सुरु केली आहे. गुजरातने नूकतीच अहमदाबाद ते बडोदा या मार्गावर  पुर्णतः एसी असणारी इलेक्ट्रॉनिक बस यशस्वीरीत्या चालवली आहे. कर्नाटकने एसटी बस कर्मचाऱ्यांना आकर्षक कमिशन देवून एसटी महामंडळ नफ्यात कसे
आणायचे
? याचा वस्तूपाठच घालून दिला आहे. कर्नाटकची अंबारी या प्रकारातील बस आज 2022 साली भारतातील सर्वात लांबीची आणि अधिक आरामदायी बस म्हणून ओळखली जाते.आंध्रप्रदेशच्या ऐरावत आणि ऐरावत प्लस या आपल्या अश्वमेध, शिवनेरी समकक्ष सेवा आज संपूर्ण आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात फिरत आहेत. महाराष्ट्र शेजारील बसेस महाराष्ट्रात बऱ्याच आतमध्ये जसे गुजरातची एसटी सुरत उस्मनाबाद , सुरत पंढरपूर,अहमदाबाद कोल्हापूर, सुरत अकोला तर मध्यप्रदेशची एसटी  नागपूर वाराणशी असी सेवा पुरवते.आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा ,अहमदनगर या जिल्ह्यातील अनेक गावे महाराष्ट्राच्या एसटीने नाही तर कर्नाटकच्या एसटीमूळे एकमेकांचा संपर्कात आहेत.त्यांचा निपाणी औरंगाबाद या बसेसविषयी इंटरनेटवर माहिती उपलब्ध आहे.ती बघीतल्यास आपणास हा धोका समजेल
   या उलट स्थिती आपली आहे.  आपली अश्वमेध ही सेवा मुंबई ते पुणे या मार्गाचा अपवाद वगळता अन्य ठिकाणी पोहचवू शकलो नाही. आपल्या शहरांना जोडणाऱ्या मार्गावरील बससेवा वगळता खेड्यातील सेवा अत्यंत त्रासदायक बसेसमधून पुरवली जाते.आपण जून्याच चेसीवर नव्याने बस बांधणी करुन प्रवाश्यांना आरामदायी सेवा देण्याचा प्रयत्न करतोय  बस बांधणी नवी असली तरी मुळातील चेसिजच जूनी असल्याने त्याचा हवा तेव्हढा फायदा होत नाही. देशात इलेक्ट्रॉनिक बस चालवण्याची सर्वात पहिले घोषणा आपण केली.मात्र आपण त्यासाठी प्राथमिक सोयी उभारण्यात मागे पडलो आता तर ही सेवा सुरु होते का ? हा प्रश्न आहे. महाराष्ट्र एसटीची एकही बस आज बिएस 6 या प्रणालीवर चालत नाही. महाराष्ट्राचा बसेस एक सम्माणीय
अपवाद वगळता महाराष्ट्राच्या सिमावर्ती भागातच फिरतात .दुसऱ्या राज्यात खोलवर सेवा देत नाही. मात्र आधी सांगितलेल्या प्रमाणे यास एक अपवाद आहे
, तो म्हणजे उस्मानाबाद आगारामार्फत चालवला जाणारा उस्मानाबाद ते बंगळूरू हा मार्ग बसेसच्या लांबीबाबतच आपली काहीसी समाधानकारक गोष्ट आहे.
  एकेकाळी सोन्याचे दिवस बघीतलेली आपली महाराष्ट्राची एसटी आज लंकेची पार्वती झालेली आहे. दिवस फिरत असतात ,आपल्या महाराष्ट्र एसटीला पुन्हा सुवर्णावस्था येवो, ही सदिच्छा व्यक्त करत सध्यापुरते थांबतो, जय हिंद , जय महाराष्ट्र .


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?