भूगर्भातील पाणी अदृश्यातून दृश्यतेकडे


     मार्च महिना सुरु झाल्यावर ज्या अनेक गोष्टीची आठवण होते . त्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे २२ मार्चचा जागतिक पाणी दिवस . १९९२  मध्ये पाणी प्रश्नावर  आयोजित केलेल्या युनो च्या परिषदेत ठरल्या प्रमाणे १९९३  पासून २२ मार्च जागतिक पाणी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो .
                 पृथ्वीवर 71 % असणाऱ्या पाणी या नैसर्गिक साधनसंपत्तीकडे  मानवाचे दुर्लक्ष होते परिणामी त्याची प्रचंड प्रमाणात नासाडी होते . जरी पृथ्वीवर ७१ % पाणी असले तरी पिण्यायोग्य पाणी फारच कमी आहे . बहुतांशी पाणी समुद्रात आहे जे पिण्यायोग्य नाही त्यात अनेक क्षार मिसळेले आहेत. पिण्यायोग्य असणाऱ्या पाण्यातील बहुतांशी पाणी दोन्ही ध्रुव आणि हिमालय आदि पर्वतात गोठलेले आहे . जागतिक हवामानाचा विचार करता ते पाणी वापरणे फारशे योग्य नाही . परिणामी उपलब्ध पाण्यापैकी जेमतेम 3 ते ४ टक्के पाणी प्रत्यक्षात वापरता येते . आणि मानव पाणी  फारच गैर प्रकारे वापरतो . ते असेच चालू राहिले तर भविष्यात मानवास पाणी वापरण्यास  राहणारच नाही . या कडे लक्ष वेध घेण्यासाठी या दिनाचे आयोजन करण्यात येते .आपल्या भारतीय तत्वज्ञानात पाण्याला पंच महाभूताची उपमा दिली आहेच . या पंचमहाभुतांचा आपल्यावर प्रकोप वक्रदृष्टी पडू नये म्हणून अनेक सृक्ते वेदांमध्ये आहेत . त्याचेच आधुनिक एकविसाव्या शतकातील स्वरुप म्हणजे हा दिवस .पृथ्वीचा पर्यावरणीय समतोल ढासळून सध्याचा विज्ञानाला ज्ञात असलेली एकमेव प्रगत सृष्टी नष्ट न होण्यासाठी  केलेला प्रयत्न म्हणजे२२  मार्च रोजी साजरा होणारा जागतिक पाणी दिवस . जर पाणी प्रदुषित झाले तर मानवच किंवा जलचरच नव्हे तर समस्त प्राणी सृष्टी धोक्यात येवू शकते . आधूनिक युध्दशास्ञात  नदी अथवा तलावात घातक विषारी रसायने सोडून लोकांचे प्राण घेण्याची संकल्पना मांडली गेलीच आहेमानवी जिवनाचा प्रारंभ हा पाणवढ्याजवळ झाला . मानवी शरीरात देखील पाण्याचे महत्व प्रचंड आहे . त्याचे संवर्धन करणे हा या मागचा हेतू आहे .
             दर वर्षी हा दिन एका विशिष्ट संकल्पना घेऊन साजरी करण्यात येतो या २०२२ वर्षाची संकल्पना भूगर्भातील पाणी ही आहे  या संकल्पनेचा प्रचार होण्यासाठी एक बोधवाक्य तयार करण्यात आले आहे  "The Ground Water Making invisible to The visible "आपण मराठीत त्यांचे भूगर्भातील पाणी अदृश्यातून दृश्यतेकडे प्रवास असे भाषांतर करू शकतो . आपल्या पृथीवर जरी ७१ % पाणी असले तरी त्यातील फक्त ३ ते ४ टक्के पाणी मानवी जीवनास सहजतेने उपयुक्त होईल अश्या स्वरूपात आहे . मानवास सहजतेने उपलब्ध असणाऱ्या पाण्यापैकी बहुसंख्य पाणी हे भू गर्भातच उपलब्ध आहे आणि मानव त्याचे महत्व लक्षात  न घेता  मोठ्या प्रमाणत उधळपट्टी करतो . त्याकडे लक्ष वेधण्यासाठी हि संकल्पना या वर्षी राबवण्यात येणार आहे भूगर्भाच्या वरती उपलब्ध असणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन होणे , त्यात मानवास हानिकारक विषारी पदार्थ सहजतेने मिसळू शकतात त्यामुळे ते भूगर्भातील पाण्यापेक्षा सहजतेने मानवी वापरण्यास अयोग्य ठरू शकते बाष्पीभवनाच्या समस्येबाबत आपणास माहिती घेण्याची असल्यास आपण काही वर्षांपूर्वी जळगाव महानगरपालिकेने त्यांच्या तलावाच्या पाण्यात उन्हाळ्यात होणारे बाष्पीभवन रोखण्यासाठी रासायनिक द्रव पदार्थ फवारल्याचा घटनेची माहिती घेऊ शकतो त्याद्वारे पण हि समस्या किती भयानक आहे हे समजून घेऊ शकतो .
    भुगर्भातील पाणी सुद्धा आपण जमिनीत घातक कचरा विविध रासायनिक पदार्थ टाकून प्रदुषित करत आहोत. ज्यामुळे एका मोठ्या  संकटाला आपण जन्म देत आहोत.जर भुगर्भातील पाणी प्रदुषित झाले तर  मानवास वापरण्याजोगे असणाऱ्या खुप मोठ्या पाण्यास आपण मुकु. जे संकट आपणास खुप मोठ्या प्रमाणात हानी पोहचू शकते.कावीळ सारखे अनेक विकार स्वच्छ पाण्याचा अभावी होतात, हे आपण या वेळेस लक्षात घेयला हवे.
    आज २०२२२ साली मराठवाड्यतील लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यात भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड खाली गेली आहे परिणामी त्या ठिकाणी आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत . अमीर खान आणि मकरंद अनाजपूरें  यांचे योगदान असलेल्या पाणी फाउंडेशन तर्फे याच भूगर्भातील पाण्याचे महत्व जाणून पावसाचे पण जमिनीत मुरण्यासाठी अभियान राबवण्यात आले होते महाराष्ट्र सरकारतर्फे काही वर्षांपूर्वी राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवरामध्ये याच भूगर्भातील पाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी योजना राबवण्यात आली होती . भुगर्भातील पाण्याचे
प्रमाण कमी झाल्यास, जमिन धसण्याचा खचण्याचा धोका देखील निर्माण होतो.या भुगर्भातील पाण्यामुळे अनेक नद्या या बारामाही धावू शकतात.जर ते संपले, तर त्यांचा प्रवाह देखील बंद होवू शकतो.त्यांचे एकुण प्रमाण किती? याबाबत मतभिन्नता असली तरी ,त्याची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी चालू असल्याचा, बाबतीत शास्त्रज्ञांची एकवाक्यता आहे. सर्व शास्त्रज्ञ मानवाने भुगर्भातील पाण्याचा वापर सांभाळून केला पाहिजे, असेच म्हणत आहे. त्याचेच प्रकट स्वरुप म्हणजे 2022चा जागतिक पाणी दिवस.
आपण सुद्धा विहीर, बोरवेल्स यातून काढत असणाऱ्या पाण्याबाबत विचार.करणे आवश्यक आहे..आपल्या घराच्या सभोवताली पडणाऱे पाणी सहजतेने जमिनीत कसे झिरपेल याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.
कारण जल है तो जीवन है!
   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?