पाकिस्तानची वाटचाल कुठे चाललिये

         

आपल्या भारताच्या शेजारी असलेल्या  पाकिस्तानची वाटचाल कुठे  चाललिये अशा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या घडामोडी सध्या पाकिस्तानात घडत आहेत . पाकिस्तानमध्ये मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्री च्या अधिवेशनानंतर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निणर्य तेथील विरोधी पक्षांनी घेतला आहे जागतिक परिषदेसमोर आपली  वैयक्तिक भांडणे नको परिषद  झाल्यावर आपण पुन्हा भांडू अशा निर्णय त्यांनी घेतला आहे . त्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानाची गच्छन्ति एका आठवड्याच्या काळासाठी का होईना पुढे गेली आहे जर हि  गच्छन्ति  झाली तर अशी  गच्छन्ति होणारे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांची नोंद होईल पाकिस्तानच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासात याच्या आधी तीन वेळेस पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे मात्र दरवेळी तो फेटाळला गेल्याने तेथील पंतप्रधानाची खुर्ची वाचली आहे 
        इम्रान खानच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानी मुस्लिम लीगच्या कायदे गटाच्या अध्यक्षाबरोबर चीनच्या पाकिस्तानातील दुतावासातील दुसऱ्या क्रमांकाच्या अधिकाऱ्याने चर्चा केल्याने या वेळी पंतप्रधानाची खुर्ची जाण्याची मोठी शक्यता आहे . पाकिस्तानचे राष्ट्रपिता कायदे आझम मोहमद्द अली जिना यांनी ज्या मुस्लिम लीगच्या राजकारणाने पाकिस्तानचे स्वप्न पूर्ण केले त्या मुस्लिम लीगचे नामकरण पाकिस्तानच्या निर्मितीनंतर नामकरण पाकिस्तानी मुस्लिम लीग असे झाले कालांतराने या पक्षात फूट पडली आणि याचे दोन तुकडे झाले एक गट नवाझ शरीफ यांच्याबरोबर गेला त्यास पाकिस्तान मुस्लिम नूर गट म्हणतात नूरच्या उल्लेख अनेकदा एन असे करतात त्यामुळे या गटाला पाकिस्तनी मुस्लिम लीग एन गट म्हणतात . त्यावेळी
पक्षाच्या मूळ ध्येयधोरणांना चिकटलेला गट म्हणजे पाकिस्तानी मुस्लिम लीग कायदे गट होय पाकिस्तानच्या संसदेच्या आपल्या लोकसभा सदृश्य सभागृहात या पक्षाचे फक्त ५ सदस्य आहेत मात्र इम्रान खान यांच्या पाकिस्तानी तेहरीके इन्साफ पक्षाला बहुमतासाठी कमी पडणाऱ्या १७ सदस्यांची पूर्तता करण्यासाठी ज्या इतर पक्षांची मदत घेण्यात आली आहे त्यातील प्रमुख पक्ष म्हणजे पाकिस्तानी मुस्लिम लीग कायदे गट . 
चीनच्या दूतावासातील दुसऱ्या क्रमांकाच्या अधिकाऱ्याने ज्यावेळेस ही भेट घेतली आहे त्या वेळेला देखील खूप महत्व आहे सध्या  ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्री च्या अधिवेशनामुळे पाकिस्तानात राजकीय युद्धबंदी झाली आहेत उघडपणे दोन्ही पक्ष भांडत नसले तरी पडद्यामागे त्यांची खलबित्ते सुरूच आहेत हे ओपन सिक्रेट आहे त्या पार्शवभूमीवर आपण हि भेट  घेयला हवी 
अश्या पक्षाच्या प्रमुखाला चीनच्या दूतावासातील क्रमांक दोनच्या नेत्याने पाकिस्तानच्या राजकीय संकटाच्या दरम्यान भेटणे ही गोष्ट सहजपणे घेण्यासारखे नाही चीनबाबाबत पाकिस्तानी जनतेबाबत प्रचंड नाराजी आहे त्यास इम्रान खान सरकारने काही प्रमाणत  थांबवले आहे . दआपल्या भारतीय राजकारणात जे स्थान उत्तर प्रदेशचे आहे ते स्थान असणाऱ्या  पाकिस्तानमधील एकूण लोकसंख्येच्या ५७% लोकसंख्या राहत असलेल्या पंजाबमध्ये पाकिस्तानच्या केंद्रीय सत्तेत असणाऱ्या पाकिस्तानी तेफ्रिके इन्साफ या पक्षाची सत्ता गेली आहे तसेच पाकिस्तानच्या आता पर्यंतच्या इतिहास बघता इम्रान खान यांची सत्ता जाण्याची दाट शक्यता आहे जे भारताला परवडणारे नाही पाकिस्तानचे पंतप्रधान सध्यातेथिल राजकीय सभांमध्ये पडला ना शोभणारी अनेक वक्तव्ये करत आहेत त्यांनी रशिया युक्रेन युद्ध सुरु होण्याच्या दोन ते तीन दिवस आधी रशियाला भेट दिल्यावर सुद्धा काहीसे चमत्कारिक वाटणारे विधान केले होते इम्रान खान यांच्या या विधानामुळे पाकिस्तनची जगभरीता नाच्चकी होत
आहे तसेच पाकिस्तानातील माजगाईने सर्व उच्चांक मोडल्यामुळे पाकिस्तानी जनता त्यांच्या विरोध आहे त्यामुळे तिथे येत्या काही दिवसता खूप काही घडणार हे नक्की गडापेक्षा वीट मऊ या न्यायाने पाकिस्तानमधील सरकारविरोधी पक्षांच्या ऐवजी इम्रान खान यांचेच सरकार असणे भारतासाठी आवश्यक आहे पाकिस्तानी सीमेपासून आपली जम्मू अमृतसर आदी अनेक शहरे हाकेच्या अंतरावर आहेत  तसेच तो आपला शत्रू आहे त्या पार्श्वभूमीवर आपण या कडे बघायला हवे त्यातच आपले हींत आहे हे नक्की 
       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?