तणाव सहन करण्याची कला (बुद्धिबळाचे मानसशास्त्र भाग १ 3)

     


   तणावाबद्दल आपण मागील लेखात काही गोष्टी बघितल्या . या लेखात त्याबाबद्दल अधिक खोलात विस्ताराने चर्चा करूया. खेळातील टॅन तणाव कश्या प्रकारे हाताळायचा या बाबाबत आपण दिग्गज खेळाडूंची मते विचारात घेतल्यास आपणास सहजतेने खेळता येईल तणाव राहणार नाही . खेळातील तणावावर विश्वनाथन आंनद यांनी दिलेला सल्ला फारच मोलाचा आहे कार्लसन विरुद्धच्या डावात पत्रकारांनी आनंद यांना विचारले ,पुढील डाव जिंकल्यास आपला आत्मविश्वास वाढून आपण स्पर्धा जिंकाल का ? या प्रशांवर आनंद शांत राहिला काहीच बोलला नाही . दुसऱ्या पत्रकाराने आनंदला विचारले आपल्या जवळ काही योजना आहे का ? ज्यामुळे आपण आणि कार्लसन यांच्यातील गुणाचा फरक भरून निघेल याही वेल्स आनंद शांत राहिला तिसऱ्या पत्रकाराने विचारले आजची स्पर्धा मागच्या स्पर्धेच्या तुलनेत वेगळी आहे का ? या तिन्ही प्रश्नासाठी आंनद याने फारच समर्पक उत्तर दिले "मी एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष देतो'  . थोडक्यात आपण देखील एकाचवेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्यास  इतर विचार मनात  न आणल्यास आपले मन विचलित होणार नाही आणि आपण चांगला रिझल्ट देऊ शकाल . 

सीम्सलाव हा सातवा जगजेत्ता त्याने दिलेला सल्ला फारच अफलातून.  सीम्सलाव म्हणतो,  "पहिल्या चाळीस खेळी चांगल्या खेळा यावर सीम्सलावस विचारण्यात आले  जर प्रतिस्पर्धीहि पहिल्या चाळीस खेळी चांगला खेळाला तर ? सीम्सलाव याने हसत हसत उत्तर दिले तर डाव अनिर्णित सुटेल . चाळीस खेळी उत्तम करण्यासाठी आपणस आपल्या खेळ्यांवरच लक्ष केंद्रित करावे लागेल आपले  जर खेळावेळी अन्य बाबींवर दुसऱ्या बाबींवर लक्ष असेल तर आपण चांगल्या ४० खेळ्या करू शकणार नाही हे उघड आहे . 

गिगोरीक यांचा विचार फारच अद्भुत आहे ज्या सल्ल्यामुळे आपण मानसिक दडपण सहजतेने दूर करू शकतो , तो म्हणतो मी खेळताना सोंगट्याचा विरुद्धात खेळतो . आपण जेव्हा कमकुवत खेळाडूंबरोबर खेळतो त्यावेळीस काहीच मानसिक दडपण नसते . आपण सहजतेने खेळतो परंतु ज्यावेल्स सशक्त खेळाडू बरोबर डाव होतो तेव्हा आपण दडपणात खेळतो आणि चुका करतो . अश्यावेळी गिगोरीकचा सल्ला  महत्तापूर्ण खेळतो .तो म्हणजे व्यक्तीच्या विरोधात नव्हे तर सोगट्यांच्या विरोधात खेळा . 

अमेरिकन लेखक जिंग जिग्लर म्हणतो, आपण स्वतःला विजेत्यांच्या रूपात पाहू शकलो नाही तरी मग विजेत्याप्रमाणे कामगिरीही करू शकणार नाही या विचारावर निश्चित लक्ष ठेवा खेळताना आपण जिंकणारच हि मानसिकता स्वतःत आणा म्हणजे तणावापासून दूर रहाल महेंद्रसिंग धोनी माजी क्रिकेटचा कर्णधार म्हणतो निकालाची चिन्ता आपल्यला त्रस्त करते ,आणि तणाव वाढतो निकलाबद्दल विचार करू नका निकालाचा विचार केल्यास निकाल मिळत नाही . त्यामुळे कोणतेही काम करताना आपले १०० % देत आहोत की नाही ? याची खात्री

कर्व्यासच हवी ज्यावर आपले नियंत्रण आहे त्या गोष्टीकडे आपले पूर्ण लक्ष असावयास हवे . जेव्हा आपण छोट्या छोट्या नियंत्रित होऊ शकणाऱ्या गोष्टीकडे लक्ष देतो तेव्हा आपणास हवा असेलला निकाल मिळतो .खेळाडूने त्याचा खेळाच्या कारकिर्दीत मोजता येऊ शकतील अशीतीन प्रकारची द्येय निश्चित करावी 

१)अल्प मुदतीचे ध्येय 

२) माध्यम मुदतीचे ध्येय 

३)दीर्घ मुदतीचे ध्येय 

सर्वात महत्त्वाच्या दीर्घ मुदतीच्याच ध्येयाला मध्यम आणि अल्प मुदतीत नियोजित करा मग निकाल आपोआप मिळेल आणि आपणास ताण घेण्याची वेळच येणार नाही 

बुद्धिबळ खेळाडू अरोनियचा विचार निश्चित आपल्या खेळात उतरवण्यास बुद्धिबळपटूने कधीही विसरू नये तो ,म्हणतो आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या सुरवातीच्या चालींचा चांगला अभयस करून डावात सुरवातीला पटपट खेळी करा ज्यामुळे प्रतिस्पर्ध्यावर मानसिक दबाव निर्माण होईल खेळताना आत्मविश्वासाने सरळ बस प्रतिस्पर्ध्याच्या डोळ्यात डोळे भिडवा मग विजय तुमचाच  

खेळाडूंना सामोरे जावे लागणाऱ्या तणावासह अन्य मानसिक सासमस्यांवर कशी मात कार्याची याबाबत पुढच्या भागात बोलेल तो पर्यंतसर्वाना नमस्कार 

सुनील शर्मा  (लेखक नाशिमधील सर्वात जुने बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत गेल्या ४५ वर्षांपासून ते बुद्धिबळ खेळाडू घडवत आहे  त्यांनी आजपर्यंत .ग्रँडमास्टर विदित गुजराथी सह अनेकांना त्यांनी घडवले आहे आज ते  बोटवानीक चेस स्कुलच्या माध्यमातून बुद्धिबळ प्रशिक्षण देत आहेत ) 
शब्दांकन अजिंक्य तरटे  



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?