या धोक्याकडे कधी बघणार आपण?

   

   मंगळवारी 29 मार्चला शैक्षणिक ताणतणावातून नाशिकच्या म्हसरुळ या उपनगरात एका तरुणीने आत्महत्या करुन जीवन संपवले. गेल्या काही दिवसातील वर्तमानपत्रे बघीतली, तर अस्या घटना सातत्याने घडतांना दिसतात. त्यातीलच एक अजून वाढीव घटना म्हणून याकडे बघता येणे अशक्य आहे. ज्या तरुणाइच्या जोरावर आपण महासत्तेचे स्वप्न बघत आहोत, ते सध्या कोणत्या मानसिक स्थितीत आहे, याची  लिटमस्ट टेस्ट म्हणूनच या घटनांकडे बघायला हवे.
आपल्याकडे मानसिक आरोग्याबाबत असलेली अपुरी जाणीव या आत्महत्या होण्यास मुख्यतः कारणीभूत ठरतात. मानसिक आजार म्हणजे स्किझोफेनियाच, असी लोकांचा समाज असतो.मानसिक आजार हे विविध असतात , त्यापैकी एक म्हणजे स्किझोफेनिया, याची त्यांना माहितीच नसते.तसेच जर एखादा मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार घेत आहे, हे समजले की, त्याचा बाबत विविध गैरसमज पसरवणे, आदी गोष्टींमुळे लोक अनेकदा गरज असताना सुद्धा मानसोपचार तज्ज्ञांकडे जात नाहीत. अर्थात पुर्वी होते, तितके सध्याचे चित्र वाइट नाही. आता अनेकजण मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारासाठी जात आहेत.जे स्वागतार्ह आहे,मात्र अजूनही हे प्रमाण कमीच आहे. ज्यात अजून वाढ होणे अत्यंत गरजेचे आहे.
     केंद्र सरकार सध्या मानसिक आरोग्याबाबत काही सकारात्मक पाउले उचलत आहे, मात्र त्याची गती वाढवणे, याबाबत अधिकाधीक लोकांना माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे. पुर्वी आत्महत्या हा भारतीय दंडविधान संहितेनूसार गुन्हा ठरवण्यात येवून त्यासाठी बंदीवासाची तरतूद होती.जी आता नाही, आता आत्महत्यासाठी बंदीवास होत नाही तर सबंधीत व्यक्तिला शासकीय रुग्णालयात मानसोपचार दिले जातात.केंद्र सरकारतर्फे परीक्षेची भिती विद्यार्थ्यांना जाणवू नये, म्हणून परीक्षेपे चर्चा हा उपक्रम एप्रिल महिन्यात राबवण्यात येतो.मानसिक आरोग्याबाबत एक हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाकडून दहावी बारावीच्या परीक्षेदरम्यान समुपदेशाची सोय करण्यात येते जी अत्यंत उत्तम पाउल आहे. यासारखी अनेक पाउले उचलण्याची गरज आहे. 
      सध्या जर तरुणांईकडे बघीतल्यास आपणास नैराश्य या विकाराचा सामना तरुणाई मोठ्या प्रमाणात करत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे याची लक्षणे, यावर प्राथमिक उपचार याबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे. राजकीय नेत्यांनी त्यांचा निवडणूकीच्या जाहिरनाम्यात याबाबत आश्वासन दिल्यास लोकांना याबाबत सहजतेने जनजागृती होवू शकते, असे मला वाटते.आपल्या महाराष्ट्रात येत्या काळात मनपा निवडणूका होणार आहेत, त्यावेळेस आमचा पक्ष सत्तेत आल्यास मनपा रुग्णालयात मानसिक उपचाराबाबत उपाययोजना करेल,असे आश्वासन तरी देण्यास राजकीय पक्षांना काही अडचण नसावी मात्र त्यांना या मुद्द्यातील गांभिर्य समजायला हवे ना?आणि तीच मुख्य अडचण आहे.त्याबाबत माध्यमांनी आवाज उठवायची गरज आहे. आपल्याकडे महेश भट्ट यांची मोठी मुलगी (अलीया भट्टची मोठी बहिण) मोजक्या प्रतिष्ठित व्यक्तींचा अपवाद वगळता मानसिक आरोग्याबाबत मौनच बाळगले जाते.या प्रतिष्ठित व्यक्तीचा समाजावर मोठा परीणाम होत असतो.त्यामुळे त्यांना त्यांचा मानसिक समस्येबाबत बोलते करणे आवश्यक आहे.
   आत्महत्या हे दुबळ्या मानसिकतचे लक्षण आहे. त्याच्यात लढण्याची ताकद नसते, म्हणून ते असा पळपुटपणा करतात, असा सर्वसाधारण समज आत्महत्या करण्याबाबत आढळतो.ते बदलणे अत्यंत आवश्यक आहे.माझा मते आत्महत्या करायला देखील धैर्य लागते.अकबर बिरबल आणि माकडणीची गोष्ट आपणास माहिती असेलच.प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो,स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रसंगी दुसऱ्याचा जीव घेण्यासही तो बघत नाही,हा गोष्टीचा मतितार्थ आहे. गोष्टीत सांगितलेली गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्यात देखील लागू  होते.सबब
आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींना दुबळा समजणे अत्यंत चूकीचे आहे .व्यक्ती आत्महत्या करतात कारण त्यांना त्यांचा समस्येला योग्य उत्तर न दिसल्याने.जगातील प्रत्येक समस्येला उत्तर असते ,हे त्यांना पटवण्याची गरज असते.आत्महत्या करणारी व्यक्ती कधीही दिव्याचे बटण दाबले की दिवा लागतो.त्याप्रमाणे आत्महत्या करत नाही. त्याचे संकेत ती आधीच देत असते.गरज असते ते ओळखण्याची आणि त्यावर उपाययोजना करण्याची .ती केल्यास प्रत्येक आत्महत्या रोखली जावू शकते.जर योग्य ती उपाययोजना न केल्यास काय होते ते आपण बघीतलेच आहे,म्हसरूळच्या घटनेत!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?