लोकसंख्येच्या साडे अकरापट


न्युर्याकच्या सबवे मध्ये एका 62 वर्षीय इसमाने केलेल्या बेछूट गोळीबाराने सध्या अमेरीकेत शस्त्रात्रांचा प्रश्न.पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका जागतिक अहवालानूसार जगाच्या एकुण लोकसंख्येपैकी 4 %लोकसंख्या अमेरीका देशात रहाते. मात्र वैयक्तिक शस्त्रात्राचा विचार केला जगाच्या एकुण वैयक्तिक शस्त्राच्या पैकी 46% शस्त्रास्त्रे अमेरीकन नागरीकांनकडे आहेत.हे प्रमाण लोकसंख्येच्या साडेअकरापट आहे. अमेरीकन गृहयुध्दाच्या वेळी अठराव्या शतकात, अमेरीकन केंद्रीय संविधानाच्या दूसऱ्या घटनादुरुस्तीने स्वसंरक्षणार्थ शस्त्रास्त्रे बाळगण्याचा मुलभुत अधिकार अमेरीकन नागरीकांना देण्यात आला. ज्यावेळी शस्त्रास्त्रे बाळगणे, हा अमेरीकन नागरीकांचा मुलभुत अधिकार म्हणून मान्य करण्यात आला, तेव्हा अमेरीकेत रस्त्यावर दिवसाढवळ्या गुन्हेगार लोकांना लूटत गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस बळ कमी पडत होते. देशातील यादवीमुळे देशात प्रचंड अस्थिरता होती.देशाचे विभाजन होते का?असा प्रश्न निर्माण झाला होता.आजमितीस त्यावेळची स्थिती पुर्णतः बदलली आहे. मात्र त्यावेळच्या परीस्थितीमुळे देण्यात येणाऱ्या मुलभुत अधिकराला अजूनही सोडचिठ्ठी देण्यात न आल्याने मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाले आहेत.
  शस्त्रास्त्रांमुळे जगभरात मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांचा विचार करता सर्वाधिक मृत्यू हे अमेरीकेत होतात. अमेरीकत शस्त्रात्र परवाना मिळवण्यची प्रक्रीया जगातील अन्य देशांच्या तूलनेत बऱ्यापैकी सोपी आहे. वयाची 18 वर्षे पुर्ण झाल्यावर आरोग्याबाबत काही प्रमाणपत्रे तसेच पोलीसी रेकॉर्ड नसल्याचे दाखवल्यावर लगेचच काही मिनीटात शस्त्रास्त परवाना सहजतेने मिळतो.ज्यामुळे ज्यांना गरज नाही. किंंवा ज्यांची मनस्थिती स्थिर नाही अस्या लोकांनाही हा परवाना देण्यात आला आहे.ज्यामुळे सामाजिक सुरक्षीततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. न्युर्याक सबवेमध्ये झालेल्या बेछूट गोळीबाराचा प्रकार देखील त्याचेच प्रत्यंतर आहे.
       अमेरीकेतील शस्त्रात्रेवर काही प्रमाणात बंधने घालण्याची मागणी या आधी अनेकदा करण्यात आली आहे. मात्र शस्त्रास्त्रे तयार करणाऱ्या कंपनी अमेरीकेतील राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणात निधी देत असल्याने, या
सोन्याची अंडे देणाऱ्या कोंबडीवर सुरा चालवण्यास तेथील लोकप्रतिनिधी फारसे उत्सुक नसतात. परीणामी सातत्याने चर्चा होवून यावर योग्य ती कार्यवाही होत नाही. परीणामी. अमेरीकेत एखाद्या शाळेवर किंवा न्युर्याक सारख्या मोठ्या गोळीबाराच्या घटना घडल्यावर फक्त तोंडाची वाफ दडवली जाते. परीस्थितीत काहीच बदल होत नाही, या घटना घडतच राहतात.
 अमेरीका मानवी हक्काचा नावाने जगभरात अक्कल शिकवत असते.मात्र स्वतः च्या देशात  शशस्त्रास्त्रे बाळगण्याचा अधिकारामुळे अन्य लोकांचा जिविताचा हक्क या मानवी हक्काचे उल्लंधन होत असताना गप्प बसते.दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते ,मात्र स्वतःच्या डोळ्यातील मुसळ पण दिसत नाही. असी आपल्याकडे म्हण आहे. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून अमेरीकेच्या या वर्तनाकडे बघता येईल.
सध्या पराकोटीच्या विभक्त कुटुंब.पद्धतीने अमेरीकेत मानसिक रोग्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. त्या 
पार्श्वभूमीवर या वाढत्या गोळीबाराच्या घटनेकडे बघायला हवे.मानसिक रोग्याला त्याचा अवस्थेमुळे तो काय करत आहे.याची जाणीव कमी असते.त्याच्या हातात जर प्राणघातक शस्त्र आल्यास विचारायलाच नको.दुर्दैवाने अमेरीकेत असी स्थिती वारंवार उपस्थित होत असल्याचे तेथील बातमीतून दिसत आहे. जे अमेरीकेसाठी धोकादायक आहे. हा बाँम्ब लवकरात लवकर डिफ्युज होणे यातच अमेरीकेचे आणि अमेरीकेवर जग.मोठ्या प्रमाणात अवलूंबून असल्याने जगाचे कल्याण आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?