राष्ट्रीय स्तरावर नाशिक चमकणार !

 

   नाशिकमध्ये विविध खेळाचे अनेक गुणवान खेळाडू आहेत. जे आपल्या खेळाद्वारा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडत असतात.नाशिकमध्ये खेळाडूंची मोठी परंपरा असून देखील, नाशिकमध्ये राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा होत नसल्याने, नाशिक मधील क्रीडाविश्व काहीसे निराश झालेले दिसते. मात्र आता हे निराश्याचे दिवस संपले कारण....
  नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेकडून 27 ते 30 एप्रिल दरम्यान राष्ट्रीय स्तरावरच्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. नाशिकमध्ये अनेक वर्षांनी राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.  .   महाराष्ट्राचे पहिले ग्रँडमास्टर अर्जुन पुरस्कार प्राप्त भारतीय टीमचे प्रशिक्षक प्रविण ठिपसे, पदमश्री महिला इंटरनॅशनल मास्टर भाग्यश्री ठिपसे, ग्रँडमास्टर दिव्या देशमुख , या मराठमोळ्या बुद्धिबळपटूंसह ग्रँडमास्टर अर्जुन कल्याण, अरविंद चिदंबरम, निलोपतल दास, गोपाल नारायण , मित्रभ गुहा तसेच इंटरनॅशनल मास्टर प्रणव आनंद, फिडे मास्टर आराध्य गर्ग, निरंजन नवलगुडे आदींचा खेळ बघण्याची तसेच त्यांच्याबरोबर  खेळण्याची संधी नाशिककरांना या निमित्याने मिळणार आहे यावेळेस अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडुंचा खेळ बघण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.  राष्ट्रीय जलद अति जलद बुद्धिबळ निवड स्पर्धेसाठी  ३० पेक्षा अधिक राज्यातून ५०० ते ७५० खेळाडू अपेक्षित आहेत. सर्व खेळाडूंची राहण्याची जेवणाची संपूर्ण व्यवस्था जिल्हा संघटना मोफत करून देत आहे
=. यामुळे नाशिकमधील क्रीडा संजीवनी मिळेल ,यात कोणालाही तिळमात्र शंका नसावी. नाशिकमधील मुळातच कुशाग्र बुध्दीचे असणारे नागरिक यामुळे अजूनच तीव्र बुद्धीचे होतील.यात शंका  नसावी.नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना ही धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आलेली बुद्धिबळचा प्रसार प्रचार करण्यासाठी 1976पासून कार्यरत संस्था आहे. ही संस्था महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेशी सलग्न आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना , आँल इंडिया चेस फेडरेशनसी संलग्न आहे. आँल इंडिया चेस फेडरेशन बुद्धिबळाची आंतरराष्ट्रीय संघटना फिडेशी संलग्न आहे. नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेने बुद्धिबळ विकासासाठी खुप प्रयत्न केले आहे. आज नाशिकमध्ये कुमार गटातील विश्वविजेते,भारताच्या संघाचे कप्तान विदीत गुजराथी ,प्रचिती चंद्रात्रे, आदि अनेक बुद्धिबळ खेळाडू राहतात, त्यांना या पातळीवर येण्यासाठी नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेने खुप प्रयत्न केले आहेत.  
        या स्पर्धेत सहभाग पक्का केलेल्या दिव्या देशमुख यांनी काही महिन्यापूर्वीच भुवनेश्वर येथे झालेली महिला राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. अश्या दर्जेदार खेळाडूंचा बुद्धिबळ डावांचा आनंद घेण्यासाठी भारतभरातील तमाम बुद्धिबळ प्रेमी या बुद्धिबळ सोहळ्यानिमित्त्याने स्पर्धेस भेट देतील. या राष्ट्रीय जलद व अतिजलद निवड बुद्धिबळ स्पर्धेतून निवडलेले खेळाडू जागतिक जलद व अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेसाठी देशाचे प्रतिनिधित्व करतील. सदर स्पर्धेचे थेट प्रक्षेपण विविध डिजिटल माध्यमांतून केले जाईल. या स्पर्धेत २७ , २८ , २९ एप्रिल या तीन दिवशी मिळून जलद बुद्धीबळ स्पर्धेचे एकूण ९ सामने खेळण्यात येणार आहे तर ३० एप्रिल या दिवशी अति जलद या बुद्धिबळाच्या प्रकारातील ११ डाव खेळवण्यात येणार आहेत. नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एकूण ६ लाख ५० हजारांचे बक्षिसे देण्यात येणार आहेत.
        `1नाशिकमध्ये  राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होत असल्याने, नाशिकच्या पर्यटनास देखील चालना मिळेल. तामिळनाडू,  पासून जम्मू काश्मीर पर्यत गुजरातपासून अरुणाचल प्रदेशापर्यत पसरलेल्या आपल्या भारतातील काना कोपऱ्यातील बुद्धिबळपटू  नाशिकमध्ये येणार असल्याने भारतातील विविधांगी संस्कृतीचे दर्शन नाशिककरांना या निमित्ताने घडण्याचा सुवर्णकांचन योग घडणार आहे. काहीसा निरस समजला जाणारा खेळ मुळात किती रंजक आहे? बुद्धिबळ खेळाचे विविध प्रकार , डावातील रंजकता किती मोठी असते? बुद्धिबळ खेळाचे आंतरराष्ट्रीय नियम काय आहेत? आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाचे नियमन कसे होते? याबाबची नाविण्यपूर्ण माहिती या निमित्ताने नाशिककरांना या निमित्ताने मिळणार आहे.
नाशिककरांनी या स्पर्धेस उचलल्यास अन्य क्रिडा संघटनादेखील नाशिकमध्ये त्यांचा त्यांचा खेळाच्या मोठ्या स्पर्धा आयोजित करण्याचे धाडस करतील जे नाशिककरांसाठी  उत्तमच ठरेल.मग काय नाशिककर होणार या स्पर्धेत सहभागी ! 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?