भारताचा अश्व वेगाने दौडताना

       

     येणारे शतक भारताचे असेल असे विधान मागील शतकाच्या शेवटी अनेक मोठ्या धुरिणींनी केले होते चालू शतकाच्या साधारणतः एक चतुर्थांश भाग सरत असताना या विधानाचा अनुभव येत आहे . मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनी , डेन्मार्क , आणि फ्रांस या देशात केलेले दौरे त्याचीच साक्ष देत आहेत .  रशिया आणि युक्रेन युद्धाच्यावेळी स्वहिताचा बळी न देता या युद्धापासून अलिप्तता  राखत पश्चिम युरोपीय देशांना पूर्णतः अनुकूल भूमिका ना घेता आपली स्वतःची वेगळी ठाम भूमिका  घेण्याचा पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे .
       फ्रान्समध्ये गेल्याच आठवड्यात २४ एप्रिल रोजी अध्यक्षपदाची निवडणूक झाली ज्यामध्ये इमॅन्युएल मॅक्रॉन हे सलग  दुसऱ्यांदा  अध्यक्षपदासाठी निवडून आले पुढल्या पंधरवड्यात तेथील केंद्रीय विधिमंडळाच्या (आपल्या लोकसभा समकक्ष ) निवडणुका आहेत फ्रांस मधील आता पर्यंतच्या कल बघता अध्यक्ष ज्या पक्षाचा तोच पक्ष केंद्रीय विधिमंडळात अधिक जागा मिळवतो . फ्रान्समधील या निवडणुकीचा पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद मोदी यांची फ्रान्सची भेट मोठी महत्त्वाची आहे .फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन  हे सलग दुसऱ्यांदा निवडून आल्यावर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाहिलेंच परकीय नेते आहेत त्यामुळे फ्रान्सच्या दृष्टीने भारत किती म्हत्त्वावाचा आहे हे समजून येते फ्रान्सच्या काही वसाहती भारतात देखील होत्या ज्यांना आपण दक्षिण
भारतातील पद्दुचेरीच्या वसाहती तसेच पश्चिम बंगालमधील चंद्रनगरची म्हणून ओळखतो ( आता पश्चिम बंगालमधील एक जिल्हा म्हणून ओळख असलेला चंद्रनगर हा जिल्हा मुळात फ्रेंच वसाहत होता स्वातंत्र्यानंतर त्यास केंद्रशासित प्रदेशचा दर्जा ना देता त्याचे पश्चिम बंगालमध्ये पूर्णतः विलीनीकरण करण्यात आले ) पद्दुचेरीमध्ये अजूनही सुमारे ४ ते ५ हजार फ्रेंच नागरिक वास्तव्यास आहेत जे विविध प्रसांगी मतदान देखील करतात . 
              जर्मनीचा विचार करता भारतासारखाच लोकशाहीप्रधान देश म्हणजे जर्मनी /.शीत युद्धाच्या काळात हा देश पूर्व आणि  पश्चिम असा विभागाला होता पूर्व जर्मनीवर साम्यवादाचा प्रभाव होता तर पूर्व जर्मनीवर भांडवलशही विचारांचा प्रभाव होता . भारताला स्वातंर्त्य मिळल्यावरचा प्रारंभीच्या काळात आपल्या  अणूविषयक कार्यक्रमास गती देण्यासाठी पश्चिम जर्मनीने खूप मोठ्या प्रमाणात साह्य केले होते आपल्या अनेक अणुभट्या त्यांच्या मदतीने आपण उभरल्या आहेत युरोपीय युनियनमधीलच नव्हे तर संपूर्ण जगातील एका महत्त्ववाची अर्थव्यवस्था म्हणून जर्मनी परिचित आहे सन २००८ -२००९ दरम्यान युरोपात उद्भवलेल्या पिग्स ( पोर्तुगाल .आयर्लंड ग्रीस स्पेन )या आर्थिक  समस्येतून युरोपला सही सलामत काढण्याच्या प्रयत्ननात जर्मनीचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे .
जर्मनीची प्रमुख भाषा असणारी जर्मन आणि संस्कृत या दोन भाषेत अनेक साम्यस्थळे आहेत  भारतीय स्वातंत्र्यलढयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि इतर अनेक क्रांतिकारकांनी जर्मनीची मदत घेण्याचा प्रयत्न केला
होता भारतातील मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे जोजर्मनीसाठी हक्काची बाजरपेठ होऊ शकतो . सध्या जर्मनीला बाजरपेठची नितांत आवश्यकता आहे  
         डेमार्कचा विचार करता भारतात १९ व्या शतकाच्या पहिल्या पन्नास वर्षापर्यंत त्यांचे राज्य होते , सन १८५० च्या सुमारास त्यांनी आपल्या वसाहती ब्रिटिशाना विकल्या त्यानंतर भारतातून त्यांच्या सर्व वसाहती नाहिस्या झाल्या त्यानंतर डेमार्कच्या सरकारने आपले सर्व लक्ष आग्नेय आशिया आणि आफ्रिका खंडाकडे दिले , भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर  पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 1957 मध्ये डेन्मार्क भेटीमुळे भारत आणि डेन्मार्क यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचा पाया घातला गेला जो तेव्हापासून कायम आहे. भारत आणि डेन्मार्कमधील द्विपक्षीय संबंध राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील सहकार्यावर आधारित सौहार्दपूर्ण आणि मैत्रीपूर्ण आहेत. दोन्ही देशांमध्ये वेळोवेळी उच्चस्तरीय भेटी झाल्या आहेत डेन्मार्कची राजधानी असलेले कोपेनहोगेन  हे शहर  जागतिक दृष्ट्या अनेक अनेक महतवाच्या घडामोडींचे केंद्र आहे 
भारत नव्या युगात जगाचे आशास्थान होत असल्याचेच यातून सिद्ध होत आहे जी आपल्या भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?