मानसिक अनारोग्याची राजधानी नाशिक ?

   


  मानसिक अनारोग्याची राजधानी नाशिक तर नाहीना  ? अशी शंका यावी,  अश्या घटना गेल्या सहा महिन्यापासून नाशिक शहरात  घडताना दिसत आहे . शहरात वाढलेल्या आत्महत्येच्या घटना कमी की काय म्हणून आता अत्यंत शुल्लक कारणामुळे लोक हिंसक होत आहे शुल्लक कारण अत्यंत महत्त्वाचे वाटल्याने लोक हिंसक होत आहे शुल्लक कारण अत्यंत महत्त्वाचे दुसऱ्याचा जीव घेण्यासारखे वाटणे हे संबंधित व्यक्तीचे मानसिक स्वास्थ उत्तम नसल्यचे प्रतीक म्हणता येईल   आणि या घटना वाढल्यामुळे   मानसिक अनारोग्याची राजधानी नाशिक तर नाहीना  ? अशा प्रश्न उपस्थित आहे 

         समर्थ रामदास स्वामी यांच्या जगी सर्व सुखी अशा कोण आहे ? विचारी मना तोच शोधूनि पाहे या संत वचनानुसार जगातील प्रत्येकाला काहींना काही समस्या असणार किंवा स्वामी विवेकांनद यांच्या विचाराचा आधार घेतल्यास रोजच्या जीवनात काहीतरी समस्या असणे हे जीवन योग्य मार्गवर चालत असल्याचे लक्षण आहे सबब समस्या हा जीवनाचा आधार आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही तसेच जीवनातील कोणतीही समस्या कायमस्वरूपी नसते काही काळानंतर समस्या सुटतेच याचा अनुभव देखील आपण अनेकदा घेत असतो काही लोक मात्र त्यांना त्या त्या वेळी भेडसावणारी समस्या अत्यंत मोठी समजून त्या समस्येला उत्तर नाहीच या समस्येतून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आत्महत्या असे समजून टोकाचे पाऊल उचलतात .आत्महत्या करणारी व्यक्ती मानसिक त्रासाने ग्रस्त असते या त्रासातुनच ती हे मोठे पाऊल उहचलते आणि नाशिकमधील पोलिसी दफ्तरी आत्महत्या म्हणून नोंदवण्यात आलेल्या गुन्हयाची संख्या मोठी आहे आत्महत्या करण्यासाठी घर सोडून गेलेल्या आणि विविध कारणाने अज्ञात व्यक्तीच्या मृत्यू या सदरात मोडणाऱ्या व्यक्तींचा समावेश यात केलेला नाही तो केल्यास ही संख्या अजूनच भयानक स्वरूप धारण करणार यात शंका नसावी .

  तसेच शुल्लक कारणामुळे लोक हिंसक होत आहेत जे लोकांच्या मानसिक अनारोग्याची निशाणी आहे हे सूर्य प्रकाश्याइतके स्वच्छ आहे एखादा नकार  किंवा स्वतःच्या मनाप्रमाणे गोष्ट न झाल्याने त्याची परिणीती लोक दुसऱ्याचा जीव घेण्यात करत असतील तर लोकांचे मानसिक अनारोग्य किती भयानक स्थितीत पोहोचले आहे याचे निदर्शकच म्हणावे लागेल अर्थात याला विविध कारणे आहेत वाढलेली स्पर्धा , अपयशाला यशाची पायरी न मानता भयंकर गुन्हा मानण्याची वाढती प्रवृत्ती , यामुळे तसेच  ज्याप्रमाणे स्वयंपाकघरातील कुकरला जर वाफ  बाहेर पाडण्यासाठी शिट्टी आणि सेफ्टी व्हाँलची सोय असते जर हि यंत्रणा कुचकामी ठरली तर स्फोट अटळ असतो त्या प्रमाणे मानत येणाऱ्या भावना विचार यांना योग्य वाट न मिळण्यास त्यांच्या देखील स्फोट होतो जो आत्महत्या किंवा एखाद्या गोष्टीबाबत अवास्तव हिंसक किंवा हळवा होऊनी बाहेर पडतो हिंसक झाल्यावर खुन होण्याची शक्यता वाढते दुर्दैवाने नाशिकमध्ये हेच होत आहे

    नाशिकमधील  वाढत्या खुनाचा संबंध काही लोक सुस्त पोलिसी यंत्रणेशी जोडतात जे माझ्या मते पूर्णतः चुकीचे आहे विविध गुन्हेगारी टोळ्या एकमेकांचा खून करत असतील तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो असे म्हणता येऊ शकतो नाशिकमधील खून काहीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य जनतेकडून क्षणिक रागाच्या भावनेतून होत आहे  ज्याची आधीची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे त्यावर पोलीस लक्ष ठेवू शकतात सर्वसामान्य व्यक्ती
भावनेच्या भरात काही अनुचित तर करत नाही यावर  पोलिसी नियंत्रण ठेवणे निव्वळ अशक्य नाही तर अशी अपेक्षा ठेवणे देखील चुकीचे आहे यासाठी विविध मानसोपचार तज्ज्ञांनी एकत्र येऊन कृती करण्याची गरज आहे मानसोपचार तज्ज्ञांनी काही कृती केल्याशिवाय नाशिकचा  मानसिक अनारोग्याची राजधानी नाशिक ? हा कलंक पुसणे अशक्यच 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?