रशिया युक्रेन युद्धाच्या अप्रकाशीत बाजू

         

    रशियाने युक्रेनवर केलेल्या गोष्टीला आता १०० दिवस झाले आहेत अजूनही युद्ध संपले नाहीये युद्ध कधी संपेल हे आताच सांगणे अवघड आहे युद्धाच्या शेवट कसा होणार कधी होणार याबाबत अनिश्चितता असली तरी त्यांचे परिणाम आता दिसत आहे जगात अन्नधान्याचे भाव प्रचंड वाढले आहेत गव्हाची प्रचंड टंचाई झाली आहे नैसर्गिक इंधनाचे नियंत्रण बऱ्याच मोठ्या प्रमाणत आखाती मध्यपूर्व देशांकडे गेले आहे (पूर्वी जागचे नियंत्रण मोठ्या प्रमाणत युरोप खंडातील देशांकडून होत असल्याने आणि त्यांच्यासाठी सदर प्रदेश पूर्वदिशेच्या मध्यभागी असल्याने त्यास ते मध्यपूर्व म्हणत त्यानंतर  त्याला तेच नाव पडले त्यामुळे आपल्या पश्चिमेला असून देखील आपण तेच म्हणतो असो ) ज्याची परिणीती नैसर्गिक इंधनाचे दर वाढण्यात होत आहे (एखाद्या गोष्टीबाबत एकाधिकारशाही झाल्यास दुसरे काय होणार ) मी वर सांगितलेल्या बाबींवर या आधी माध्यमातून सांगण्यात आले आहेत हे बदल आपण अनुभवत सुद्धा आहोत मात्र युद्धाचे फक्त इतकेच परिणाम नाहीये किंबहुना हे परिणाम म्हणजे फुटकळ चणे फुटाणे वाटावे असे संकट येणार आहे ज्याचा परिणाम पुढील दोन ते तीन पिढ्यापर्यंत राहू शकतो या संकटाचा फटका आपल्याकडील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणत बसू शकतो त्यामुळे या संकटाला सामोरे कसे जायचे याबाबत आपण प्राधान्यक्रमाने नियोजन करावयाला हवे . तर सध्या फारसे लक्षात न आलेले संकट आहे हवामान बदलाचे 
        या युद्धात रशियाच्या क्षेपणास्त्रामुळे युक्रेनच्या अनेक तेलविहिरींना आगी लागल्या . तसेच अनेक हेक्टरवरील जंगलांचा नाश करण्यात आला रशियन क्षेपणास्त्रात वापरलेल्या धातूंमुळे युक्रेनची मोठ्या प्रमाणात  जमीन  नापीक झाली आहे ज्यामध्ये पुढील काही वर्ष गहू सोडा साधे गवताचे पाते उगवले तरी त्या विषारी जमीनीत देव पावला अशी स्थिती आहे सबब युद्ध संपल्यावर पुढील काही वर्षे गव्हाचे संकट आपली पाठ सोडणे अशक्य आहे तेलविहिरींना आगी लागल्यामुळे वातावरणात किती तरी अब्ज मेट्रिक टन कार्बन  डाय ऑकसाईड गेला आहे पृथ्वीचे तापमान वाढायला जे वायू जवाबदार आहेत (या वायूंना ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतात ) त्या वायूच्या गटातील सर्वात जास्त धोकादायक वायू म्हणून  कार्बन  डाय ऑकसाईड ओळखला जातो आणि त्याचेच प्रमाण या युद्धामुळे वाढले आहे ते प्रमाण किती वाढले आहे याविषयी अजून काही माहिती शास्त्रज्ञाना मिळालेली नाही त्यामुळे याचे परिणाम किती अनिष्ट होईल हे अद्याप स्पष्ट झाले नाहीये हवामान बदलाविषयी जी कॉप नावाने ओळखली जाणारी जागतिक परिषद होते तिच्या काही वर्षातील अधिवेशनाचा आढावा घेतल्यास कार्बन  डाय ऑकसाईड या वायूचे प्रमाण कमी कसे करायचे यावर प्रचंड मतभेद झाल्याचे आपणस दिसते ज्या वायूचे प्रमाण कमी करण्यावरून वाद होतात त्याच वायूचे प्रमाण रशिया युक्रेन युद्धामुळे वाढलेलं आहे या युद्धात मोठ्या प्रमाणात  वन संपत्तीचा नाश झाला आहे ज्यामुळे प्रदेशाचे वातवरण थंड ठेवणारा नैसर्गिक घटक नष्ट झाला आहे ज्यामुळे वर्षातील अनेक महिने थंड असणारा हा प्रदेश काही अंशी गरम होणार
आहे हे उघड गुपित आहे ज्याचा परिणाम कशा होतो याबाबत सध्या यासाठी आवश्यक असणारी आकडेवारी नसल्याने अद्याप काही सांगता येणे अशक्य आहे मात्र याचा परिणाम हा वाईटच असणार हे सूर्यप्रकाशाइतकेच स्वच्छ आहे 
           पृथ्वीवरील देश ही मानवनिर्मित संकल्पना आहे निसर्गासाठी फक्त जमीन नई पाणी हे दोनच घटक आहे आपल्याकडील मांसुम वर परिणाम करणारे  अल  निनो आणि ला नीना हे समुद्रप्रवाह  पृथ्वीगोलाच्या विचार करता पूर्णतः नसले तरी बऱ्याच अंशी भारताच्या पूर्णतः विरुद्ध बाजूला तयार होतात तर दुसरा घटक असलेला वेस्टन डिस्टब्सन हा प्रकार स्विझर्लंड मध्ये तयार होतो हे लक्षात घेता या हवामान बदलाचा परिणाम आपल्यावर देखील काही प्रमाणत होणार मात्र तो कमीत कमी कसा होईल याबाबत आपण उपाययोजना करू शकतो तेच आपल्या हातात आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?