भारतात रंगणार ६४ घरांचा आखाडा

   


     येत्या गुरुवार पासून अर्थात २८ जुलैपासून  आपल्या भारतात एक युद्ध बघायला मिळणार आहे या युद्धात आधुनिक शस्त्रात्रे वापरली जाणार नाहीत तर पारंपरिक  हत्ती उंट घोडा आणि एक वजीर  एका राजा तसेच पायी चालणाऱ्या सैनिकाचा यात वापर होणार आहे . महाभारतातील युद्ध १८ दिवस चालले  हे युद्ध पुढील १४ दिवस अर्थात १० ऑगस्टपर्यंत  चालणार आहे .या युद्धात जगभरातील १८८ देशांनी सहभाग नोंदवला आहे प्रत्येक देशाचे पाच  बुद्धिमान सैनिक हे युद्ध खेळणार आहे.  त्यांच्या मदतीला ६४ घरांच्या पटांगणात २ उंट २ घोडा २ हत्ती , एक वजीर आणि एका राजा आणि ८ साधे सैनिक असे साथींदार असतील  . या युद्धात सहभागी अस्नणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करणारे सैनिक यांच्या वापर करत प्रतिस्पर्ध्यावर मात करत या युद्धात यशस्वी होण्याचा प्रयत्न करतील . 

 मी बोलत आहे चेन्नईपासून ५० किमी अंतरावर असलेल्या महाबलीपूरम येथे २८ जुलै ते १० ऑगस्ट या दरम्यान होणाऱ्या ४४ व्य बुद्धिबळ ऑलम्पियाडविषयी . या बुद्धिबळ ऑलम्पियाडमध्ये गेल्या काही बुद्धिबळ ऑलम्पियाडचा विचार करता सर्वात जास्त १८८ संघ खुल्या गटात तर १६२ संघ महिला गटात एकमेकांशी सामना करणार आहेत  प्रयेक देशाच्या संघात ५ खेळाडूंच्या सहभाग असेल फिडेच्या नियमानुसार भारत आयोजक देश असल्याने तो त्यांचे दोन संघ या स्पर्धेत उतरवत असताना सहभागी  संघांची संख्या विषम झाल्याने परस्परविरुद्ध खेळताना जोड्या पूर्ण व्हाव्यात यासाठी फिडेच्याच नियमानुसार भा आणखी एक संघ खेळवण्याची संधी भारताला


मिळाली . ,म्हणजेच इतर देशांचे पाच खेळाडूं ऑलम्पियाडमध्ये सहभागी होत असताना भारताचे पंधरा खेळाडूं स्पर्धेत सहभाग नोंदवत आहे . जास्त खेळाडूं म्हणजे विजयाची जास्त संधी असे साधे गणित विचारत घेता भारताला ही स्पर्धा जिंकण्यायाची संधी जास्त असल्याचे आपणस सहज दिसून येते 

बुद्धिबळात खेळाडूंचे गुणांकन हे इलो रेटिंग नुसार होते जे बुद्धिबळाची आंतराष्ट्रीय संघटना "फेडरेशन ऑफ डीईचेस या फिडे नावाने अधिक प्रसिद्ध असलॆल्या संघटनेमार्फत खेळाडूंच्या स्पर्धेतील प्रदर्शनावर देण्यात येते बुद्धिबळ ऑलम्पियाड हा सांघिक खेळ असल्याने संघाचा क्रम निर्धारित करताना संघातील सहभागी खेळाडूंचे सरासरी इलो रेटिंग हे त्या संघाचे रेटिंग समजून त्यानुसार संघाना मानांकन देण्यात आले आहे यानुसार खुल्या गटात भारताचे संघ दुसऱ्या अकराव्या आणि सतराव्या क्रमांकावर आहेत .तर महिलागटातील सहभागी संघ पहिल्या अकराव्या आणि सोळाव्या क्रमांकावर आहेत हा क्रम विचारत घेता आणि गेल्या काही महिन्यातील बुद्धिबळपटूची आंतराष्ट्रीय कामगिरी विचारात घेता भ्रताराला या स्पर्धेत विजयाच्या मोठ्या संधी आहेत हे सहजतेने लक्षात येते स्पर्धा भारतात होत असल्याने हवामान देखील भारतीय बुद्धिबळपटूंना माहिती असणारे असेल . त्याचा सुद्धा फायदा आपल्या बुद्धिबळपटूंना होईल . 

आपल्याकडे सर्वसाधारणपणे वैयक्तिक खेळ म्हटल्यास मैदानी खेळच डोळ्यासमोर येतात . जे प्रामुख्याने शारीरिक क्षमता जोखतात मात्र बुद्धिबळ हा खेळ शारीरिक आणि बौद्धिक दोन्ही प्रकारच्या क्षमता तपासणारा खेळ आहे याचा मात्र आपल्याकडे अनेकांना विसर पडतो बुद्धिबळ हा बैठा खेळ असला तरी एकाच ठिकणी लक्ष केंद्रित करून दोन ते तीन तास बसने एकाच हाताची सत्याने हालचाल करणे ( बुद्धिबळपटूंना खेळताना एक्चग हाताद्वारेसोंगट्या हलवणे आणि सोंगट्या हलवलेल्याच हाताने स्टॉप क्लॉक दाबाने हे कामे करावी लागतात )  तसेच या कालावधीत मेंदू देखील पूर्ण कार्यवानयित ठेवणे यासाठी शारीरिक क्षमता उत्तम आसवाव्याच लागतात उत्तम शरीरतातच निरोगी मेंदू कार्यान्वयीत राहतो हे आपण यावेळी लक्षात घेणे अत्यवश्यक आहे आपले एखादे हाड फॅक्चर असताना आपण पुरेसे लक्ष केंद्रित करू शकत नाही हा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला सुद्धा \असेलच 

तर अश्या ऊत्तम खेळाचे ऑलंपियाड आपल्या भारतात जाहीर झाल्यापासून  अत्यंत विक्रमी अश्या कमी वेळात होत आहे हि खरोखरीच कौतुकास्पद कामगिरी आहे मुळात हे आयोजन रशियामध्ये होणार होते मात्र रशिया युक्रेन युद्धामुळे रशियाला धडा शिकवण्याची त्यांच्याकडील आयोजन काढून घेण्यात आले जी जवाबदरी भारताने आपल्या खांद्यावर घेतली जी त्याच्या तयारीच्या ज्या बातम्या येत आहेत ते बघता आतापर्यन्त अत्यंत त्यस्वी होताना दिसत आहे जे खरोखरीच कौतुकास्पद आहे याबाबत तामिळनाडूचे राज्य सरकार केंद्र सरकारची साई हे प्राधिकरण आणि ऑल;इंडिया चेस फेडरेशन (ए  आय सी एफ )यांचे कौतुक करायलाच हवे या  खेळाशी संबंधित यंत्रणा त्यांचे त्यांचे काम करत आहेच गरज आहे टायचे हात बळकट करण्याची जेआपण हि स्पर्धा बघून सहजतेने करू शकतो मग बघणार ना या स्पर्धा 

#ही_माझी_एक_हजार_अठ्ठाविसावी_ब्लॉगपोस्ट आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?