इम्रान खान आंदोलनाचा दुसरा अंक सुरु !

 

  पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेचे उपाध्यक्ष दोस्त मोहम्मद यांनी दिलेल्या एका निर्णयामुळे पाकिस्तान अशांत झाला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेतील पाकिस्तानी मुस्लिम लीग कायदे गट (PML Q) या पक्षाचे 10 सदस्य बहुमत सिद्ध करण्याचा प्रकियेसाठी करावयाचा मतदानासाठी अपात्र झाले.शुक्रवार 22 जूलै रोजी पाकिस्तानच्या पंजाबच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करायच्या वेळी त्यांनी हा निर्णय दिला.पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाचा आधार घेत, पाकिस्तानच्या संविधानाच्या कलम 63 च्या उपकलम ए नुसार त्यांनी हा निर्णय दिला. .या निर्णयामुळे पाकिस्तानी पंजाबच्या मुख्यमंत्री हमजा शरीफ यांची खुर्ची वाचली आहे. हमजा शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे पुत्र आहेत. जर पाकिस्तान मुस्लिम लीग कायदे गटाच्या सदस्यांना मतदान करु दिले असते. तर हमजा शरीफ यांना पाय उतार व्हावे लागले असते,आणि पाकिस्तान मुस्लिम लीग कायदे गट आणि पाकिस्तान तेहरीके इंसाफ यांचे सरकार सत्तेत आले असते. जे अस्तित्वात न आल्याने पाकिस्तान तेहरीके इंसाफ या पक्षाकडून पाकिस्तानात मुख्यतः त्यांच्या पंजाबमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. 
या नाट्याची सुरवात होते 17जूलै रोजी झालेल्या पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेच्या पोटनिवडणूकीपासून  20 जागांसाठी झालेल्या या निवडणूकीत 15जागा पाकिस्तान तेहरीके इंसाफ या पक्षाला मिळाल्या.ज्यामुळे त्यांचे संख्याबळ 178 पर्यत पोहोचले.तर सत्ताधिकारी पाकिस्तान मुस्लिम लीग नुर याचे संख्याबळ 174पर्यत झाले. बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या 186  जागा कोणताही पक्ष नव्हता.त्यामुळे पाकिस्तान मुस्लिम लीग कायदे गटाच्या 10 आमदरांचा पाठिंबा घेत  पाकिस्तान तेहरीके इंसाफ  सत्ता स्थापनेचा दावा करणार होता. 
या पाठिंब्यासाठी पाकिस्तान मुस्लिम लीग कायदे गटाने मुख्यमंत्रीपद हातात पाडून घेतले होते.याबाबत पक्षाच्या विधीमंडळ गटाने तसा ठराव समंत केला होता. या ठरावानुसार बहुमत चाचणीच्या वेळी पाकिस्तान मुस्लिम लीग कायदे गटाचे सर्व आमदार आपले मत पाकिस्तान तेहरीके इंसाफ या पक्षाला देणार होते. 
   दरम्यान पाकिस्तान तेहरीके इंसाफ  या पक्षाला सरकार स्थापन करता येवू नये, यासाठी सत्ताधिकारी पक्षाचे मोठे प्रयत्न सुरु होते.ज्या अंतर्गत पाकिस्तान तेहरीके इंसाफ पक्षाच्या दोन आमदार मतदानाचा वेळी अनुपस्थित राहतील असी व्युहरचना आखण्यात आली. ज्यामुळे त्यांचे विधीमंडळातील संख्याबळ 176 झाले. याशिवाय पाकिस्तानी मुस्लिम लीग कायदे गटाच्या अध्यक्षांना विविध प्रकारे धमकवत विनंती करत त्यांंचे सर्व आमदार सत्ताधिकारी पक्षाला मतदान करतील. अस्या आशयाचे पत्र विधानसभेच्या उपाध्यक्षांना 21 तारखेच्या रात्री देण्यात आले.या 10 जणांमध्ये पाकिस्तान तेहरीके इंसाफ या पक्षातर्फे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार सुद्धा होते.  मतदानच्यावेळी पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभा उपाध्यक्षांनी पक्षाचा आदेश मोडला असे कारण देत या दहा जणांना मतदानास अपात्र ठरवले. ज्यामुळे पाकिस्तान तेहरीके इंसाफ या पक्षाला 10 मतांना मुकावे लागले.त्यांचे संख्या बळ 176वरच सिमीत राहिले. यावेळी 5 अपक्षांचा पाठिंबा घेत सत्ताधिकारी पक्षाने बहुमत सिद्ध केले आहे, असी घोषणा विधानसभा उपाध्यक्षांनी केली.
      या नाट्यावर पाकिस्तानच्या संविधानाच्या कलम 63 नुसार पक्षाच्या अध्यक्षांना मतदानासाठी आदेश काढायचा अधिकारच नाही तो अधिकार पक्षाच्या विधीमंडळ गटाला आहे. सबब पाकिस्तान मुस्लिम लीग कायदे गटाच्या अध्यक्षांनी काढलेला आदेशच मुळात गैर आहे. त्यामुळे  गैर आदेशानुसार विधानसभेच्या अध्यक्षांनी केलेली कृतीच अयोग्य आहे. पाकिस्तान मुस्लिम लिगच्या विधीमंडळ गटाचा पाठिंबा पाकिस्तान तेहरीके इंसाफ पक्षाला आहे.सबब उपाध्यक्षांनी केलेली कृती संविधानाचे उल्लंधन आहे, असी प्रतिक्रिया पाकिस्तान तेहरीके इंसाफ या  पक्षाकडून देण्यात येत आहे. आणि पाकिस्तानात देशभर प्रामुख्याने पाकिस्तानी पंजाबमध्ये रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येत आहे.
      पाकिस्तानचे भारताशी असणारे शत्रूत्व बघता, भारताचा दुसरा शत्रू चीन पाकिस्तानला स्थिर करण्यात मोठी भुमिका बजावेल.पाकिस्तान मध्ये चीनने मोठी आर्थिक गुंतवणूक  केली आहे, जी चीन सहजासहजी तोट्यात जावू देणार नाही.त्यामुळे या आंदोलनामुळे चला पाकिस्तानचे आता अंतर्गत युद्धामुळे तूकडे होणार ,असे समजणे भाबडेपणाचे ठरेल.पाकिस्तान ची सध्याची आर्थिक स्थिती अजून खालावेल ,हे मात्र नक्की. ज्याचा फटका तेथील
सर्व सामान्य जनतेला सोसावा लागेल.तेथील राजकीय स्थितीत काहीच फरक पडणार नाही.  पाकिस्तानचे तूकडे पडल्यास त्याची झळ भारताला मोठ्या प्रमाणात सोसावी लागेल. भारताला सुद्धा पाकिस्तान अखंड राहिला तरच फायदा आहे.
#ही_माझी_एक_हजार_सत्तीसावी_ब्लॉगपोस्ट आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?