मना सज्जना

     


 १८ ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली . आईने मोबईल खेळायला न दिल्याने एका १२ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची ती घटना होती . उद्याचे भविष्य ज्या व्यक्तींच्या हाती आहे तिची मनोवस्था कोणत्या  परिस्थितीत  आहे याचा हा ठसठशीत पुरावाच म्हणता येईल .  हे फक्त एका प्रातिनिधिक उदाहरण आहे जर आपण रोज वर्तमानपत्राचे वाचन केले तर आपणस अश्या अनेक घटना वाचावयास मिळतील .  एक गंभीर समस्या असून देखील आपणाकडे याकडे दुर्दैवाने फारशे काही बॊलले जात नाही . अशी एखादी घटना ऐकल्याने  आई वडिलांनी अति लाड केल्याने त्या मूलने मुलीने असे पाऊल उचलले असे म्हणून सोडून देण्यासारख्या या घटना नाही अति लाडाने १०० मुलामुलींपैकी एखादा असे टोकाचे पाऊल उचलेल मात्र जेव्हा अश्या घटनांची संख्या प्रचंड वाढते तेव्हा ती समस्या फक्त काही लोकांची वैयक्तिक समस्या राहत नाही तर सामाजिक समस्या होते  लहान मुळा मुलींची आत्महत्या  हि सुद्धा अशीच सामाजिक समस्या आहे 

   पूर्वी कधीही होत  नव्हत्या इतक्या मोठ्या प्रमाणात आता सुजाण पालकत्वाबाबत कार्यशाळा होत आहेत . विविध वृत्तवाहिन्यावरील कार्यक्रम आणि वृत्तपत्रातील लेख बघता आपणस सुका पालकत्वाच्या बाबत प्रचंड माहिती मिळू शकते , असे असून देखील पूर्वी होत नव्हत्या इतक्या मोठ्या प्रमाणात मुलं मुलींच्या आत्महत्या आता होत आहेत त्यामुळे नक्की कोणाचे चुकतेय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे ज्यांनी अजून जग फारसे बघितले नाही रोजच्या

जगण्यात किती वेळेस आपले सर्व बरोबर असून देखील नकार पचवावा लागतो याचीजाण नसलेल्या लहान मुळा मुलींकडून हे टोकाचे पाऊल उचलले जात आहे . या बाबत मोठ्या व्यापक प्रमाणात चर्चा होणे आवश्यक असताना ज्या मुद्यांच्या रोजच्या जगण्यात फारसा संबंध येत नाही अश्या भावनिक मुद्यांवर तावातावाने चर्चा केली जाते 

     बदलत्या जीवनशैलीमुळे छोटी झालेली कुटूंबे , माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामुळ प्रचंड प्रमाणात वाढलेले पगार . आपण त्रासात दिवस काढले मात्र आपल्या मुलं मुलींना त्रासात दिवस काढायला लागू नये यासाठी पालकांनी केलेले प्रयत्न .याचा लहान मुलामुलींच्या मानसिकतेवर झालेला परिणाम या सर्व घटकांचा एकत्रित झालेला  कमी अधिक परिणाम म्हणजे या आत्महत्या असे म्हणता येऊ शकते . मात्र त्यामुळे ज्यावर उद्याचे देशाचे भवितव्य आहे अश्या लहान मुलाचे भविष्य नासले जात आहे जर अशी मानसिक कमकुवत पिढी असेल तर ती मोठी आव्हाने कशी पेलणार ? त्यातून कोणत्या मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतील ? याचा विचार आताच करणे आवश्यक आहे    आग दिसण्याच्या आधी धूर आणि वास येतो तेव्हाच पाऊले उचलल्यास मोठी आगा टळते लहान मुलामुलींची आत्महत्या ही धूर आणि वास येण्याची स्थिती आहे सबब आता नाही तर कधीच नाही अशी स्थिती या प्रशांबाबत आपल्याकडे येत आहे गरज आहे यावर पाऊले उचलण्याची 

#ही_माझी_एक_हजारसेहेचाळिसावी _ब्लॉगपोस्ट_आहे




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?